लेखांक ५.

१४९८ पौष शुध्द १०.

''अज रख्तखाने राजश्री अंकुसराऊ राजे गोसावी बजानेबू कारकुनानी तपे खेडबारे बिदानद सु॥ सीत सबैन व तिसा मया देसमुखानी तपे मजकूर व इनामती व हकलाजिमा व बाजे इनामती व सेते संभुजी व बाबरोजी व देसकु तपे मजकूर ब॥ भोगवटे तसरफाती वजिरानी कारकिर्दी दर कारकिर्दी पेसजी ता। मलिक सर्क मलिक कामन मुलूक चालिले आहे तैसे चालवणे. ऐसी खुर्दखताची रजा होए. मालूम जाहाले देसमुखाची इसाबती व इनामती व हकलाजिमा व बाजे इनामती व सेत संभुजी व बाबरोजी व देसकु तपे मजकूर बा। कोल भोगवटे तसरफती ता। कारकिर्दी पेसजी वजिरानी चालिले आहे तेणेप्रमाणे चालविजे. असेली खुर्दखत देसमुखापासी असो दीजे. तालिक लिहून घेईजे. मोर्तब.

तेरीख ८ माहे सौवाल सलास.''

लेखांक ६.

श्री

''हजरत साहेबाचे
खाने अजम अकरम नवाब
साहेब दाईम दौलतहू
अर्जदास्त अर्ज दर बांदगी                सेरीकर महीपाजी हैबतराऊ देशमुख ता।
गुंजणमावळ बांदगीस अर्ज ता। छ ११ जमादिलावल साहेबाचे नेक नजरे करून सेरीकराची बखैर सलाबत असे.

दर्या साहेबाचे * * * * ता। साहेबाचे * * * लक्षीत राहिलो आहे. रावसाहेब ह्मणतील की * * * * * नाहीस तरी पायाची आपले वडिलानी एखतारी धरून खिजमती बहुतच केली; त्यामुळे या राज्यांत आपले वडिलास तलबखाने व कितेक प्रकारे खराबी जाली. आपले दादे हैबतराव तोरणे गडावर बंदखानी कितेक दिवस कुदलो. अखेर खंडदंड देऊन जीवमात्र सुटलो. काही उबर राहिला नाही. हाली साहेबाचे बांदगीस कागदपत्र पाठविला नाहीं. तूर्त आपले शरीरीं आजार आहे ह्मणून बांदगीस यावयास अनुकूल पडिले नाहीं. आपले भाऊ बांदगीस आले आहेती. आमचे तख्त ते जागा साहेब आहेती ते आह्मांस जागा आहेती. आपली सर्फराजी करावयासी धणी मायबाप आहेती. बांदगीस रोशन होए हे अर्जदास्त.''