टांगेस धरून वोढून टाकिला व बावाजीसहि ताकीद करून मार केला. वोढून टाकून अदबखाना दिल्हे. यावेरी आपल्या आपणासी खुर्दखत देसमुखीचे देउनु माहालास पाठविले. यावेरी देसमुखी करीत होते. यावेरी मलिकसाहेबी सोलापुरास वेढा घातला होता ! तेथें मेले. यावेरी पातशाहीमधे खलेल जाला. यावेरी बावाजी कृष्णाजी बादल याचेथें जाउनुं पुंडावे करून विलायतीत खलेल केले. याउपरी आपले बाप कान्होजी हैबतराऊ हे हुजूर अमलपन्हा पातशाहापासी गेले. तेथें अर्ज केला की, बावाजी बिन हबाजी येणे कारकिर्दी मा। मा। मलिकअंबर देसमुखी बा। आपणास करकर करून हुजूर आलो यावरी हुजुरुन आपणासी मुनसफी करून बाबाजी दूरी करून आपल्यास करार करून हक लाजिमा व इसापती गहदम सालाबाद प्रमाणे दुमाल करून निवाडीयाची खुर्दखते ३ कि॥ खुर्दखत सन इशरैन अलफ बनाम आपला व खु॥ बाजी व किते २ सन अर्बा इशरैन अलफ बनाम आपले कि॥ दिधले आहेती. तेणेप्रमाणे आपण देसमुखी करितो. यावेरी माहाली कारकून फर्मानाचा उजूर करितात. दरींबाब फर्मान सादर होये. मालूम जाले. बा। इशारती दिवाणताला कान्होजी हैबतराऊ करीत आहे. देसमुख ता। गुंजणखोरे यासी वा बाबाजी बिन हबाजी येणे क॥ मा। मा। मलिक अंबर देसमुखी बा। करकर करीत होता. यावेरी मलिक अजमे हरदो जणाची मुनसुफी करून कान्होजी देसमुख करार करून हकलाजिमा व इसापती गहदम स॥ प्रमाणे देउनु निवाडियाची खु॥ सदरहू दिल्ही तेणेप्रमाणे कदीम अजा जैसे चालिले तेणेप्रमाणे चालवीत जाणे. फर्मान घेउनु माहालास आले. देसमुखी करू लागले. यावेरी बालाजी बांदलांचे होते. त्यास कृष्णाजी नाईक बोलिले की ते पातशाहाचे फर्मान यापासी आहेती. दिवाण आपणास ताकिद करितील. तुह्मी येउनु जा ह्मणौनु बावाजीस दवडिले. यावेरी निजामशा मोगलानी नेलेयावेरी बावाजी कोकणांत गेले. जाउनु दावे करू लागले. धाकोजी सरपला मोकदम मौजे सोंडे व कर्जवणाच्या मोकदमाची बाईल ही जिवेच मारिली व डेराचे माहार तोडिले. ऐसे दावे पुंडावियाने केले. (अपूर्ण)''