Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

शक १०६० त १३५ मिळविले म्हणजे संवत् ११९५ आले पाहिजेत, संवत् ११२५ येणार नाहींत, हें वालजी पाटलाला कळलें नसतें इतका तो मूढ होता असें म्हणवत नाहीं. त्याचा दोष एवढा च कीं आपण जो मजकूर नकलीत आहों त्यांत विसंगतपणा कोठें आहे की काय तें पाहून नक्क्ल करण्याचा अभ्यास त्याला नव्हता. नकलेची नक्कल-शब्दाला शब्द व अक्षराला अक्षर-बिनचुक केली म्हणजे आपलें काम यथाशास्त्र झालें, अशी वालजीची समजूत होती. त्या समजुतीला अनुसरून शक १०६० च्या आंकड्या बरोबर संवत् ११२५ चा आंकडा वालजीनें जसा चा तसा उतरून घेतला. पृष्ट ४१ वरील संवत् १२२८ चा आंकडा हि वालजीनें असा च भोळ्या भावानें जसा चा तसा उतरून घेतला व शालिवाहनशक ११६३ हा हि आंकडा जसा चा तसा संवत् १२२८ खालीं नकल करून ठेविला. शक ११६३ त १३५ मिळविले म्हणजे संवत् १२९८ येतात, ही साधी बाब त्यानें पडताळून पाहिली नाहीं. वालजीच्या व वालजीनें ज्या नकले वरून आपली नकल केली त्या नकलेच्या कर्त्याच्या ह्या दोन साध्या चुक्या इतक्या आश्चर्यकारक नाहींत. पृष्ट ६६ त खालून ६ व्या ओळींत तर वालजीनें व वालजीनें ज्या नकले वरून आपली नक्कल केली त्या नकलेच्या लेखकानें एक फार च घबाड चूकी नकलून ठेविली आहे. बिंबदेव कोंकणांत संवत् ११३५ त उतरला, हें वाक्य वालजीनें व त्याच्या पूर्वीच्या नकलकारानें बिनतक्रार, बिनसंशय व बिनतपास सबंद चें सबंद स्वीकारून, हलगर्जीपणाचा केवळ कळस करून टाकला. चुकीचा कां होई ना, पृष्ट ३२ वर बिंबदेवाचा कोंकणांत उतरण्याचा संवत् ११२५ वालजीनें स्वतः लिहिला आहे. तो च काल पृष्ट ६६ वर संवत् ११३५ म्हणून नकलतांना वालजीला जरा संशय यावयाला हवा होता. परंतु, चुकीचें हें हि घोडें वालजीनें, फाल्गुनांतील गाठीच्या गोड पदका प्रमाणें, सबंद चें सबंद मटकावून पचनीं पाडलें ! एवढ्यावर च वालजी थांबला नाहीं, पृष्ट ७० वर बिंबराजा अहिनळवाड्या हून कोंकणांत संवत् १२५ त आला, असें वालजीबोवांनी आपल्या नकलेंत सुंदर व स्वच्छ अक्षरांनीं साक्षेपानें लिहून ठेविलें आहे ! ! ! ११२५ ह्या संवताच्या आंकड्यांतील एकाच्या एका आंकड्यास वालजीबोवांनीं येथें लीलेनें काट दिला. तो काट प्रस्तुत छापील बखरींत लेखकाची नजरचूक म्हणून जसा चा तसा छापला नाहीं, दुरुस्त करून ११२५ असा पाठ छापला आहे. एवंच, ११९५ बद्दल ११२५, ११९५ बद्दल ११३५, १२९८ बद्दल १२२८ आणि ११२५ बद्दल १२५ असे अपपाठ वालजीच्या नकलेंत जे सांपडतात व जे सहज दुरुस्त होण्या सारखे होते त्यांचें पाप वालजीच्या, नाहीं तर वालजीच्या पूर्वीच्या नकलकाराच्या, माथ्या वर मारण्यास कोणती च हरकत दिसत नाहीं. सहज समजणारे हे दुरुस्त केलेले पाठ घेतले म्हणजे महिकावतीच्या ह्या बखरींत शकसंवताच्या आंकड्यां बद्दल कोणत्या हि प्रकारचा संशय घेण्यास फार च स्वल्प जागा रहात्ये.

६. सहज दुरुस्त होण्या सारख्या आंकड्याच्या वाचनाच्या ह्या चुक्या लक्ष्य देण्या सारख्या हि नाहींत असा पक्ष कोणी केल्यास, त्याला उत्तर एवढें च कीं चिकित्सेच्या चापांत मोठ्या बाबी जश्या पकडून रंधाव्या लागतात, त्या च प्रमाणें क्षुद्र बाबी हि कानसून झिलवल्या विना बिनपूस निसटूं जाऊं देतां येत नाहींत. नकलांच्या नकला होतांना ह्या बखरींत आंकड्यांच्या ढोबळ चुक्या झाल्या आहेत, हें निर्विवाद आहे. तसेंच, जुन्या भाषेंतील शक १३७० तील प्रत्ययांचीं रूपें हि नकलांच्या नकला होतांना ह्या बखरींत अर्वाचीनलेलीं आहेत, हें चौथ्या कलमांत दर्शविलें आहे व अर्वाचीनलेले प्रत्यय वगळून, शक १३७० तील भाषेचा कोणता अवशेष प्रस्तुत छापल्या गेलेल्या बखरींत कायम राहिला आहे त्याचा तपास करूं. सर्वत्र महिकावती प्रांतांत म्लेच्छार्णव झाला, अशी ओरड केशवाचार्यानें व नायकोरावानें स्वत:च केली असल्या मुळें, ह्या म्लेच्छाक्रान्त कोंकणप्रांतांतील मराठी भाषेंत कांहीं यावनी शब्द सांपडल्यास त्यानें अजाण वाचक हि बिचकून जाण्याचा संभव नाहीं,