Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३३७ ]
श्री
शके १६७६.
श्रीमंत राजश्री पंत स्वामीचे सेवेसी :--
विनंति सेवक आज्ञाधारक शिवजी नाईक अणजूरकर सरपाटील सेवेसी विज्ञापना. ता। छ. शाबानपावेतों स्वामीचे कृपावलोकनेकरून सेवकांचे व प्रांतमजकूरचें वर्तमान यथास्थित असे. बहुत दिवस जाले, परंतु लेखणआज्ञा करूवून सेवकाचा परामृष न केला. रा। बाबाजी नाईक यांसी कैलासवास जाला. सेवकाचें समाधान पत्रीं करावें तेंहि समर्थांहीं न केलें. विशेष :– गनीमाची बातमी तरी : वलंदेजाचीं हुपरगाणें नव आलीं आहेत. चार मुंबैचे बार्यावर आहेत. पांच महासमुद्रांत नाटी आहेत. चार बार्यावर आहेत. त्याजमध्यें शिपाई भांडायाचें सामान आहे. हजार दीड हजार माणूस आहे. आणीक चाळीस गलबतें मागें येणार. त्यास फतीमारी रवाना केली आहे. मागोन फिरंगीहि येणार, ऐशी खबर मुंबैस दाट आहे. कोण्ही कोण्हाजवळ बोलत नाहीं. अंतस्थें गुळमुळ आहे. फिरंगी दोघे मुंबैस आहेत. त्यांस खर्चवेंच गोव्याहून येतो. त्यास, मुंबैस फिरंगी आहेत त्यांणी दोन गुराबा बांधिल्या. त्याजपैकी एक पाण्यांत लोटली. एक लोटावयाची आहे. गोव्यास दोघे विजुरेल आहेत; ते उंचे रक्ताचे आहेत. त्यांजवर पाशाचा यखत्यार आहे. त्यांनी केलें तें पातशास प्रमाण आहे. सारांश दिसोन येतें कीं, फिरंग्याचें, वलंदेजाचें एकसूत्र आहे, ऐसी माव दिसतें. ऐसें असोन येथील अमलदार रा। रामाजीपंत हजूर बोलाविले. रा। रामाजीपंत यांचा नफ्त टोपीकरावर बरा आहे. मौजे मुर्धे येथील भांडणांत व पाणबुरुजावर फिरंगी आला होता ते समयींही हेंच पुढें होऊन गनीम परामविला. साष्टींत उतरतां सेवकाचे पाठीवर हेच धारिष्ट करून आले, ह्मणून कार्यसिद्धी जाली ! नाहीं तरी वसईसारिखें होतें. मग उपाय न होता ! परंतु, स्वामीचे प्रतापेंकरून सर्व सिद्धीतें पावलें. हालीं शकट वोडवळ आहे, ऐसें सेवकास दिसोन येतें. याजकरितां खामींनीं रा। रामाजीपंतांस सरंजाम देऊन फौजेसुद्धां आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. गनीम भाद्रपद आश्विन या दोहो मासांत, येणार तरी येईल. पुढें न ये. त्यास राउतांचें भय आहे, ऐसें वर्तमान तेथें आहे. स्वामीचा प्रताप भूमंडळी भरून उरला आहे, हा सेवकास भरवसा आहे. वरकड गनीमाची माव खरीच असे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३३६ ]
श्रीशंकर.
१६७६.
श्रीमत महाराज मातुश्री आई साहेबाचे सेवेशीः--
विनंति सेवक बाळाजी बाजीराव प्रधान विज्ञापना. येथील कुशल तागाईत छ. १६ रमजानपर्यंत साहेबाचे कृपेंकरून वर्तमान यथास्थित असों. विशेष. साहेबाचे सेवेसी विनंतीपत्रें सेवकांनी पाठविलीं होती. ता।वार यादबंदी कलमवार लिहून पाठविलीं ती पावली. त्याचे जाबसाल पुरवणी पत्री सेवेशी लिहिले आहेत. त्याजवरून विदित होईल. पत्री आज्ञा की साहेबच पुणियास लौकरच येणार. त्यास, फौजांनी कूच करून जावें ह्मणून आज्ञा. त्यास, साहेबांचा निघावयाचा मुहूर्तनिश्चय जाला, ह्मणजे तेथें राजश्री तुकोजी शिंदे आहेत त्यांस आज्ञा करावी. साहेब निघणार. त्याचे पूर्व दिवशीं तमाम फौजा कुच करून पूर्वेस्थलीं जाऊन राहतील. दक्षणेकडे फौज आहे तीही कुच करून तिकडेच यावयाची सोई पाहून सरून राहील. साहेबाचे आज्ञेप्रमाणें तुकोजी शिंदे वगैरे साहेबांबरोबर येतील. याउपरि लटके कुतर्क संशय साहेबीं किमपि चित्तांत न आणावे. साहेबांचे पायांखेरीज व मर्जीपेक्षां सेवकास कांहीं अधिकोत्तर नाहीं. कैलासवासी शाहूमहाराजांहीं सेवकांस वाढविलें राज्य भाराची यख्तियार ठेविला. सेवकांविषई त्यासमईं वाईट बरें सांगणार सांगत होते. परंतु चित्तांत किमपि संशय न आणितां अधिकोत्तर कृपाच करीत होते. सेवकानेंही निष्टेनें सेवा केली व करित आहों. त्याचप्रकारें चित्ताची निर्मलता करून राज्याचे बंदोबस्ताचा आखतीयार सेवकावर ठेवून कृपा करून सेवकाचें समाधान केल्यास सेवकही चित्तांतील संशय असतील ते अर्ज करून दूर करून घेईल. एकमतें करून राज्याचा बंदोबस्त जाल्यास जनाचें कल्याण होऊन, सिंव्हासनास शोभा येऊन, सेवक लोकांचे सेवेचें सार्थक होईल. सेवकाकडील कारकुनास समक्ष नेऊन कृपापूर्वक सेवकाची विनंति श्रवण करावी. सत्वर कृपा करावी. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३३५ ]
श्री
शके १६७६.
राजश्रियाविराजि राजमान्य राजश्री पुरुषोत्तमपंत स्वामी गोसावी यांसीः--
पो। महादाजी अंबाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. लिहिलें वर्तमान कळलें. पत्रांची उत्तरें श्रीमंतांनी लिहिलीं आहेत याजवरून कळेल बहुत काय लिहिणें ! हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३३४ ]
श्री
शके १६०६.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदरपंत स्वामी गोसावी यांसिः--
पो। सखाराम भगवंत सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशळ लेखन करणें. विशेष. अंतरवेदीचे माहाल तुह्मांकडे आहेत. तेथील हिसेबासी दोनचार पत्रें पाठविली, त्यांचें उत्तर आलें नाहीं. तु्ह्मांसहि एकदां रुबरूं सांगितलेंच होते. तीन सालें हिसेब नाहीं, तरी पत्र पावतांच अजीतागाईत हिसेब लौकर ये, तें करणे. दो चौ रोजांत हिसेब येसें करणें. तुह्मी कदाचित् ह्मणाल; वसुलाचे दिवस आहेत तर मागील हिसेब मागेंच व्हावे. दोनदोन तीनतीन वर्षे कोठें हिसेबाचा गुंत राहिला आहे की काय ? हे गोष्टी फटकाळ आहे. पत्रदर्शनी हिसेब ये तें करणें. याउपरीहि तपसील लाविला तरी उत्तमच आहे. बहुत काय लिहिणे ? लोभ असो दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३३३ ]
श्री
शके १६७६.
राजश्री जयाजी सिंदे गोसावी यांसीः--
अखंडिलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
बाळाजी बाजीराऊ प्रधान आशिर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणें. विशेष. काकाजी नाईक यांचे स्त्रीस सालगु॥प्रमाणें साल मजकुरीं रुपये ३०० तीनसे देविले आहेत, ( पुढें फाटलें ).
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७९
श्री १५९७
नकल
किले रोहिड्याचे मुकामी करीणा लेहून दिल्हा आहे
करीना जेधे व खोपडे देशमुख ता। रोहिडखोरे सु॥ सीत सबैन मया अलफ
चिखलघोलगाऊ नरघोलगाऊ
१ मौजे चिखलगाऊ १ मौजे उत्रवली
१ मौजे करनवड १ मौजे नेरे
१ मौजे अगसोल १ मौजे पाले
१ मौजे न्हावी १ मौजे खानापूर
१ मौजे वनवडी १ मौजे वडगाव
१ मौजे सिरवली १ मौजे पलसोसी
------- --------
६ ६
एकूण देहे बारा पूर्वीपासून देशमुखी हाडे का। जुनर प्रा। याची मुतालकी जमिदारीचा बसला मौजे पलसोसी येथील मु॥ चालवीत होते कलम १
हाडे याची कन्या रामाजी बिन हिरजी दगडे पा। मौजे करनवडे ता। मा।र यास दिल्ही त्यास सदरहू बारा गावची मुतालकी सागोन वहिवाट करित आले दगडे पा। याणी देशमुखी अनभवली मग गोकाजी पा। जेथे मौजे नेरे प्रा। बुधे मानदेस हे चारणीस मौजे उत्रवली येथे येऊन राहिले मग रामाजीराऊ दगडे पा। देशमुख याजकडे गोकाजी जेधे चाकरीस राहिले आणि देशमुखीचा कारभार मुतालकी सागितली त्याप्रमाणे जमीदारीचा कारभार करीत होते त्याचे पुत्र दोघे खेलोजी नाईक जेधे व बाजीनाईक जेधे पुत्र दोघ कलम १
रामाजी नाईक दगडे याचे पोटी पुत्रसतान नाही ह्मणौन दुसरी स्त्री मौजे पसवे येथील पा। याची कन्या मौजे खोपडे प्रा। वाई येथील खोपडे यास दिल्ही होती तिचा नवरा मेला होता ती माहेरी होती ती रामाजी दगडे देशमुख यानी बायको केली तिचे मागे पहिले घरचे मूल खोपडे याचे होते त्याचे नाव आकोजी खोपडे रामजी दगडे याणी गधर्वविवाह केला सा। आकोजी आला काही दिवसी रामजी दगडे यास देवआज्ञा जाली मग कजिया जाला सा। प्रभु देशकुलकर्णी भानजीबावा याचा पुत्र नरसप्रभु खानापुरी नादत होता त्याजकडे येऊन हकिकत त्यास सागितली व त्यास हि माहितगारी होती च तेव्हा त्याने उभयताने समजून चालावे मोगलाई ठाणे जवळ आहे कटकट करू नये त्याप्रमाणे काही दिवस एकविचारे चालले कलम १
पुढे पातशाई ठाण्यात आले त्याणी किल्यास खेळोजी जेधे यास नेले नतर खेळोजी जेधे ठाणे सिरवळ येथे गेले तेथून ठाणेदार याने माघारा लाविला नतर मतलब करून हिशेब द्यावयाकरिता बेदरीस गेले तेथे पातशाहास सर्व मजकूर मागील सागितला बेवारसी वतन रोहिडखोरे येथील ह्मणोन सागोन पातशाई फरमान खेळोजी नाईक जेधे याणी देशमुखी करून घेऊन सिरवळी ठाणेदार याजकडे आले तो आकोराजी रविवार बाजार सिरवळी होता तेथे गेले तो हा कारभार कळला नतर माघारा खोपीस येऊन आपले भाऊ आप्तास खोपडे आकोजी खोपडे घेऊन मेडखिडीत रानात दबा धरून बसले तो खेलोजी नाइक जेधे तेथे आले तो मारले आणि कागद पातशाई फरमान पागोट्यात होते ते इगच्या डोहात नेऊन बुडविले हे वर्तमान बाजी नाईक जेधे यास कळले नतर गुजणमावळ येथे वागणीत काकडेराव होते तिकडे गेले तो त्यानी या गोष्टीचा अभिमान धरून बाजी नाईक जेधे यास आपली कन्या दिली आणि वतन साध्य करून देतो करार केला
(पुढे खोपडे याचे लग्न मारिले व शेवटी वतन उभयतामध्ये वाटून दिले वगैरे मजकूर दुसरीकडे आला आहे)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३३२ ]
श्री शके १६७६ फाल्गुन वद्य १२.
राजश्री दामोदर महादेव गोसावी यांसीः--
ऊपरि. येथें रुपये जरूर पाहिजे. खर्चाची ओढी बहुत. याजकरितां रा। तुकाजी शिवराम पाठविले असेत. तरी तुर्त एक लक्ष रुपये अगत्य अगत्य सीताबीनें याजबराबरी पाठवणें. जाणिजे. छ. २५ जमादिलावल.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३३१ ]
श्री शके १६७६ फाल्गुन वद्य १.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री विसाजी हरि कमाविसदार जकात सरकार संगमनेर, गोसावी यासि :--
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु॥ खमस खमसेन मया व अलफ. राजश्री दामोदर माहादेव यांची लाकडें गाडे सुमारें पाऊणशें ननाशी व माहाजे येथून नाशिकास आणितील. त्यास जकातीचा तगादा न करणें. जाणिजे. छ. १५ जमादिलावल. आज्ञा प्रमाण.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३३० ]
श्री शके १६७६ फाल्गुन वद्य १.
राजमान्य राजश्री अंताजी त्रिंबक गोसावी यांस. सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु॥ खमस खमसैन मैया व अलफ. राजश्री दामोदर महादेव यांची लांकडे गाडे सुमारें ७५ पाऊणशें ननासी व माहाजे येथून भरून नाशिकास आणितील. त्यास जकातीचा तगादा न करणें. जाणिजे. छ १५ जमादिलावल. आज्ञ प्रमाण.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३२९ ]
श्री शके १६७६ माघ वद्य १२.
राजश्री दामोदर महादेव गोसावी यांसीः--
उपरि. तुह्मीं बेल व पुष्पें पाठविलीं तीं प्रविष्ट जाहलीं. जाणिजे छ २६ रबिलाखर. बहुत काय लिहिणें.
लेखन
सीमा.