लेखांक २७९
श्री १५९७
नकल
किले रोहिड्याचे मुकामी करीणा लेहून दिल्हा आहे
करीना जेधे व खोपडे देशमुख ता। रोहिडखोरे सु॥ सीत सबैन मया अलफ
चिखलघोलगाऊ नरघोलगाऊ
१ मौजे चिखलगाऊ १ मौजे उत्रवली
१ मौजे करनवड १ मौजे नेरे
१ मौजे अगसोल १ मौजे पाले
१ मौजे न्हावी १ मौजे खानापूर
१ मौजे वनवडी १ मौजे वडगाव
१ मौजे सिरवली १ मौजे पलसोसी
------- --------
६ ६
एकूण देहे बारा पूर्वीपासून देशमुखी हाडे का। जुनर प्रा। याची मुतालकी जमिदारीचा बसला मौजे पलसोसी येथील मु॥ चालवीत होते कलम १
हाडे याची कन्या रामाजी बिन हिरजी दगडे पा। मौजे करनवडे ता। मा।र यास दिल्ही त्यास सदरहू बारा गावची मुतालकी सागोन वहिवाट करित आले दगडे पा। याणी देशमुखी अनभवली मग गोकाजी पा। जेथे मौजे नेरे प्रा। बुधे मानदेस हे चारणीस मौजे उत्रवली येथे येऊन राहिले मग रामाजीराऊ दगडे पा। देशमुख याजकडे गोकाजी जेधे चाकरीस राहिले आणि देशमुखीचा कारभार मुतालकी सागितली त्याप्रमाणे जमीदारीचा कारभार करीत होते त्याचे पुत्र दोघे खेलोजी नाईक जेधे व बाजीनाईक जेधे पुत्र दोघ कलम १
रामाजी नाईक दगडे याचे पोटी पुत्रसतान नाही ह्मणौन दुसरी स्त्री मौजे पसवे येथील पा। याची कन्या मौजे खोपडे प्रा। वाई येथील खोपडे यास दिल्ही होती तिचा नवरा मेला होता ती माहेरी होती ती रामाजी दगडे देशमुख यानी बायको केली तिचे मागे पहिले घरचे मूल खोपडे याचे होते त्याचे नाव आकोजी खोपडे रामजी दगडे याणी गधर्वविवाह केला सा। आकोजी आला काही दिवसी रामजी दगडे यास देवआज्ञा जाली मग कजिया जाला सा। प्रभु देशकुलकर्णी भानजीबावा याचा पुत्र नरसप्रभु खानापुरी नादत होता त्याजकडे येऊन हकिकत त्यास सागितली व त्यास हि माहितगारी होती च तेव्हा त्याने उभयताने समजून चालावे मोगलाई ठाणे जवळ आहे कटकट करू नये त्याप्रमाणे काही दिवस एकविचारे चालले कलम १
पुढे पातशाई ठाण्यात आले त्याणी किल्यास खेळोजी जेधे यास नेले नतर खेळोजी जेधे ठाणे सिरवळ येथे गेले तेथून ठाणेदार याने माघारा लाविला नतर मतलब करून हिशेब द्यावयाकरिता बेदरीस गेले तेथे पातशाहास सर्व मजकूर मागील सागितला बेवारसी वतन रोहिडखोरे येथील ह्मणोन सागोन पातशाई फरमान खेळोजी नाईक जेधे याणी देशमुखी करून घेऊन सिरवळी ठाणेदार याजकडे आले तो आकोराजी रविवार बाजार सिरवळी होता तेथे गेले तो हा कारभार कळला नतर माघारा खोपीस येऊन आपले भाऊ आप्तास खोपडे आकोजी खोपडे घेऊन मेडखिडीत रानात दबा धरून बसले तो खेलोजी नाइक जेधे तेथे आले तो मारले आणि कागद पातशाई फरमान पागोट्यात होते ते इगच्या डोहात नेऊन बुडविले हे वर्तमान बाजी नाईक जेधे यास कळले नतर गुजणमावळ येथे वागणीत काकडेराव होते तिकडे गेले तो त्यानी या गोष्टीचा अभिमान धरून बाजी नाईक जेधे यास आपली कन्या दिली आणि वतन साध्य करून देतो करार केला
(पुढे खोपडे याचे लग्न मारिले व शेवटी वतन उभयतामध्ये वाटून दिले वगैरे मजकूर दुसरीकडे आला आहे)