[ ३३४ ]
श्री
शके १६०६.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदरपंत स्वामी गोसावी यांसिः--
पो। सखाराम भगवंत सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशळ लेखन करणें. विशेष. अंतरवेदीचे माहाल तुह्मांकडे आहेत. तेथील हिसेबासी दोनचार पत्रें पाठविली, त्यांचें उत्तर आलें नाहीं. तु्ह्मांसहि एकदां रुबरूं सांगितलेंच होते. तीन सालें हिसेब नाहीं, तरी पत्र पावतांच अजीतागाईत हिसेब लौकर ये, तें करणे. दो चौ रोजांत हिसेब येसें करणें. तुह्मी कदाचित् ह्मणाल; वसुलाचे दिवस आहेत तर मागील हिसेब मागेंच व्हावे. दोनदोन तीनतीन वर्षे कोठें हिसेबाचा गुंत राहिला आहे की काय ? हे गोष्टी फटकाळ आहे. पत्रदर्शनी हिसेब ये तें करणें. याउपरीहि तपसील लाविला तरी उत्तमच आहे. बहुत काय लिहिणे ? लोभ असो दीजे हे विनंति.