[ ३३१ ]
श्री शके १६७६ फाल्गुन वद्य १.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री विसाजी हरि कमाविसदार जकात सरकार संगमनेर, गोसावी यासि :--
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु॥ खमस खमसेन मया व अलफ. राजश्री दामोदर माहादेव यांची लाकडें गाडे सुमारें पाऊणशें ननाशी व माहाजे येथून नाशिकास आणितील. त्यास जकातीचा तगादा न करणें. जाणिजे. छ. १५ जमादिलावल. आज्ञा प्रमाण.
लेखन
सीमा.