Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ ५७८ ]

श्री.

पौ। छ २८ साबान.

राजश्री दामोधर माहादेऊ, व पुरुशोत्तम माहादेऊ, व देवराऊ माहादेऊ, गोसावी यासीः--

अखंडिलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो मल्लारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन करणे. विशेष. छ २६ रजबचें पत्र पाठविलें तें पावलें. अबदाली दरमजल लाहोराकडे गेला. गाजुदीखानाचा लेंक व अहमदखान बंगस मैनपुरीवर एकत्र होते. तेथून आह्मांस पत्रें आली की, सांप्रत्य कितेक कामेंकाजें जरूरीची आहेत, तुह्मी एकजण सत्वर येणें. यास्तव एकजण तिकडे जाऊं, एकजण आपणपासी येतों ; सारांष कीं, पातशहासी व वजिरासी चित्त शुद्ध नाही. तो यांचे वज़िरातीसी राजी नाहीं. पातशहांनी नजीबखानाकडून फौज ठेवविली आहे. त्याजकडून वजिरास शिक्षा करणार ऐसा प्रसंग दिसतो. यास्तव आपलें आगमन या प्रांतें ऐशा प्रसंगांत जालियानें उत्तम आहे, ह्मणोन, तपशिले लिहिलें, कळों आलें. ऐसियासी, प्रस्तुत जैपूर प्रांतें आलों आहों. येथील कामकाजाचा गुंता सत्वरीच उरकून त्या प्रांते येत असों. तिकडे. आलियाउपरि जो मजकूर उपयोगी पडेल तो केला जाईल. जलदीनेंच येत असें. रा। छ ११ साबान. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

( मोर्तब )
( सुद )

श्रीह्माळसाकांत चरणीं
तत्पर, खंडोजीसुत
मल्हारजी
होळकर.

[ ५७७ ]

श्री.

पौ। छ २८ साबान.

राजश्री दामोधर महादेऊ, व राजश्री पुरुशोत्तम महादेऊ, व राजश्री देवराऊ महादेऊ गोसावी यासीः---
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। मल्लारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहित जाणें. विशेष. पत्र पाठविले ते पावून वर्तमान कळों आलें. अबदाली दिल्लीपलीकडे गेला. गाजुद्दीखान अंतरवेद प्रांतें पठाण रोहिल्यासी मिळोन आहे; दोन शाहाजादे समागमें आहेत; नजीबखान दिल्लीस आहे; यास्तव आपलें आगमन या प्रांतें जालियाने सर्व बंदोबस्त होईल; ह्मणोन विस्तरे लिहिलें कळों आले. ऐसियासी, प्रस्तुत त्याच प्रांते यावयाचा विचार केला, परंतु, जैपूरचे मामलतीमुळें गुंता जाला आहे. येथील निर्गम करून सत्वरीच त्या प्रांते येत असो. तिकडे आलियानंतर उपयोगी अर्थ पाहून कर्तव्य तो केला जाईल. रा॥ छ १३ साबान. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. ( मोर्तबमुद )

श्रीह्माळसाकांत च-
रणीं तत्पर, खंडो-
जी सुत मल्हारजी
होळकर.

[ ५७६ ]

श्री.

राजश्री दामोधर माहादेऊ व पुरुषात्ताम माहादेऊ गोसावी यासीः--

छ अखंडिलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मलारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन करीत असावें. विशेष. पत्र पाठविलें तें पावोन वर्तमान कळों आले. नवाबांनी इसमालखान व रामनारायेण व अलाकुलीखान व बालाउल्लाखां वगैरे सरदार, मातबर फौजसुद्धां, व भारी तोपखान्यासुद्धां, पुढें आपणांकडे पाठविले आहेत; नवाबही लांब लांब मजला करून येत आहेत, ह्मणोन लिहिलें कळों आलें. त्यास, इकडील वर्तमान तरी रोहिले शणवारचे रात्री पळोन गेले; पठाण राववारीं त्रितिये प्रहरी पळोन गेले. त्यास रामगंगेस पूल सिद्ध केला. याउपरि फौजा रवाना होतील. लुगारे राऊत हजार दोन हजार तापे बांधोन त्यांचे पाठीवर गेले. या प्रकारचे वर्तमान जालें. त्यास नवाबांनी सत्वर आलिया उत्तम आहे. दिरंग लावलियाचा प्रसंग नाहीं. तुह्मी सर्व वृत्त नबाबास निवेदन करून सत्वर येत, तें करावें. छ १० मोहरम. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. ( मोर्तबसुद )

श्रीह्माळसाकांत चरणीं
तत्पर, खंडोजीसुत म-
ल्हारजी होळकर.

[ ५७५ ]

श्री.
पौ छ १७ जिल्काद.

राजश्री दामोदर माहादेव वकील गोसावी यासीः--

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मल्हारराऊ होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लेखन करीत असावें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें पावोन वर्तमान विदित जालें. तुह्मी कोट्यास आला, ह्मणोन विदित जालें. ऐसियासी, तुमचे आमचे भेटीनंतर सविस्तर कळो येईल. बहुत काय लिहिणें ? रा॥ छ २८ सवाल. हे विनंति.

मोर्तबमुद.

श्रीह्माळसाकांत चरणीतत्पर,
खंडोजीसुत मल्हारजी होळकर.

[ ५७४ ]

श्री.

पौ। छ ४ जिल्काद.

राजश्री दामोदर माहादेव गोसावी यासी:-

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। मल्हारजी होळकर व जयाजी सिंदे दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहीत जाणे. विशेष. राजश्री कृष्णाजी दादाजी आठवले यांजबराबरी यात्रा ५०० पाचसे, व स्वार्या पडथळें, डोल्या, बगैरे भास्भारदारी कासीहून देशीं जात असेत. याजला राहा–दर्म्यान कोणविसी उपसर्ग न लागावा. येतद्विषयीं नबाबाची पत्रे, दस्तकें, जसीजसीं लागतील, ती तुह्मी नवाबास अर्ज करून याजबराबर सजावळसुद्धां पत्रें देऊन सुरक्षित यमुनापार होऊन येत, ते गोष्ट करणें. यांचे साहित्यास अंतर न करणें. रा।. छ २६ सवाल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

( लेखन )
( सीमा)

श्री
राजा शाहू
नरपति हर्षनिधान,
बाळाजी बाजीराव
प्रधान.

                                                                                  लेखांक ३०७

जाला महजर ऐसा जे दादाजी नरस प्रभु देशकुलकर्णी व गाउकुलकर्णी ता। भोर व ता। उत्रोली दुतर्फा किलेमजकूर व ता। वेलवंडखोरे याचा व बाबाजी सिवदेऊ सोनटके कारकून लिहिणार नि॥ दादाजी नरस प्रभु देशकुलकर्णी गाउकुलकर्णी ता। मजकूर या हरदोजणामध्ये गरगसा होऊन ता। मजकूरची विलायत खराब जाली हरदोजणाचा गरगसा होण्याचे कारण जे बाबाजी सिवदेऊ याणी मतलबानी खोटाई करून ता। उत्रोलीचे देशकुलकर्णाचे वतन आपल्यास असावे जे ध्यानी देशमुखी पेशजी खोपडे यापासून निमे घेतली त्याप्रमाणे गरगसा आपण केला असता आपणास हि वतन मिळेल याजकरिता उत्रोली तर्फेचे देशकुलकर्ण आपले ह्मणून कोठे कोठे महजरावर खोटाईने बिकलम घालून गरगसा माडला याजमुळे दादाजी नरस प्रभु देशकुलकर्णी गाउकुलकर्णी ता। मजकूर याणी फिर्याद वजारतमाह सीवाजीराजे फरजद शाहाजीराजे व हमशाही देशमुख व मावळानिहाये या हुजूर उभा राहिला आणि बोलिला जे माझे वतन सदरहू माहालचे असता बाबाजी सिवदेऊ माझा चाकार खोटाईने आपले देशकुलकर्ण उत्रोली तर्फेचे ह्मणून कोठे कोठे बिकलम आपले घातले आहे त्यास त्याजला आणून चौकसी करून त्याजपाशी खोटपत्र घेऊन माझे वतन मजला बाहाल करून दिल्हे पाहिजे त्याजवरून बाबाजी सिवदेव यास राजे मशारनिले यानी नेऊन चौकसी केली तो दाद प्रभुचे वतन असता बाबाजीने खोटाईने बिकलम घातले हे लागू जाल्यावरून त्याजपासून खोटपत्र राजे यानी लिहून घेऊन हरदुजणा दाद प्रभूस किले मजकुरी पाठविले जे दाद प्रभु हा नरस प्रभु याचा फरजद त्याचे गोत्र पुरुशगुप्‍त भनजी प्रभु धाकटे भाऊ याचा ++ बेलवडखोरियातून पेशजी सिरवलास नगराणा लाऊन दोन्ही वतनास आधिकारी करून नरस प्रभु हा भानजी देशपांडे चे भाउ सबब फरजद देशकाचे वकील मजकूरचे साक्षीने पेशजी जाला त्याचे कागद दखल जाले दादाजी नरस प्रभु दोन्ही खोरियाचा वतनदार खरा बाबाजी सिवदेऊ खोटा जाला येविसीची चौकसी राजे याणी हि केली वकील मजकुरी हि देसक मेलऊन चौकसी पाहिली तो दादाजी नरस प्रभु देसकुलकर्णी गावकुलकर्णी दुतर्फा किलेमजकूर ता। वेलवडखोरे येथील वतनदार मलिक +++++ कारकिर्दीपासून व पेशजीपासून नरस प्रभूचा फरजद ठरून वतन अनुभवी +++++ जावे तेणेप्रमाणे मनास ++++++++ यास महजर करून दिल्हा असे ++++++++++++++ महजर तारीख २५ जिलकाद बिहुजूर हजीरमजालसी किले रोहिडा +++++ सलास खमसैन अलफ

→पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा

[ ५७३ ]

श्री.

राजश्री पुरुषोत्तम माहादेव गोसावी यासीः--

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मल्हारजी होळकर दंडवत उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करणे. विशेष. तुह्मी पत्र पा। ते पावोन लेखनार्थ अवगत जाला. फौजेचा मा।र लि॥. त्यास, तावजीखटके यांसी मात्र तेथें राहावयासी लिहिलें, तेणेंप्रमाणे ते राहातील. वरकड लुगारे व मकाजीगीते व बीर भान हाजारी वगैरे यांसी तेथून रवाना करावें. एक घडी विलंब न करणें. जलद रवाना करणें. जाणिजे. छ ९ साबान. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

मोर्तबसूद

+ श्री ँ
ह्माळसाकांत
चरणीं तत्पर,
खंडोजीसुत
मल्हारजी होळकर.

[ ५७२ ]

श्री.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गंगाधरपंत स्वामीचे सेवेसी :-

पो। बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ १५ रजब यथास्थित जाणोन स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें पावलें. सविस्तर कळलें. नाक्याच्या अमलाविसी लि॥. त्यास, श्रीमंतांस सविस्तर विदित केलें. आज्ञा जाली कीं, तूर्त जाबसाल होत नाही ; राजश्री रघुनाथपंत दिवाणजी आले, ह्मणजे समजोन सांगणें तें सांगू; तूर्त जसें चालतें, तसें चालवावें. त्यास आपण उपाध न करावी. दिवाणजी आले ह्मणजे जाबसाल होईल. कळावें. आपण छावणीकरितां लि॥, त्यास, आह्मांस श्रीमंत तात्याच्या कृपेचें प्रयोजन आहे. आणखी हेत ठेवीत नाहीं. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असो दीजे. हे विनंति.

[ ५७१ ]

श्री.

पो। छ ८ मोहरम.

राजश्री दामोदर महादेऊ गोसावी यासीः--

छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। खंडेराऊ होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें, प्रविष्ट होऊन लेखनाभिप्राय सविस्तर कळों आला. नवाबाचे बाहिरीचा मजकूर लिहिला, तरी, पठाण रामगंगेच्या पलीकडे गेला. याउपरि त्याचा वसवास धरावा ऐसें नाहीं. समागमेंच असो द्यावी. नदीपलीकडे फौज जाऊन शत्रूचें पारपत्य करावयाचा प्रसंग लिहिला. बहुत उत्तम. नवाब आलियावरी पायाबा दाखवितील, अथवा पूल बांधून देतील, तेथें उतरून नतिजा दिल्हा जाईल. भेटीचा विचार तरी तीर्थरूप राजश्री सुभेदार पुलाजवळ संनिधच आहेत. नवाब कोसी दुकोसी आल्यास तेही अलीकडे उतरून भेटी होतील. मुख्य गोष्टी याउपरि विलंब केल्यास पठाण पलायन करील. मग आजिपर्यंत केल्याचें सार्थिक काय ? यास्तव नवाब जलदीनें आल्यास बहुत उत्तम आहे. जाणिजे. छ ७ मोहरम प्रथम प्रहर. बहूत काय लिहिणें ?

( मोर्तबसुद )

मल्हारी सुत खंडेरायस्य मुद्रेयं.

[ ५७० ]

श्रीगणराज

चिरंजीव राजश्री गणपतराव बाबा यासी प्रतीः--

पुरुषोत्तम माहादेव व देवराव माहादेव अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ २१ सफर मु॥ पुणें जाणोन स्वक्षेम लेखन करणें. यानंतर तुह्मांकडील पत्र येऊन वर्तमान कळत नाही, तर साकल्य लिहिणे. पूर्वी तीन च्यार पत्रे पाठविली आहेत, त्याजवरून कळले असेल. चांदोरीच्या पाटलाचा व राजश्री कृष्णराव गोविंद यांचा कर्जाचा लढा; त्याचा मजकूर लिहिला होता; त्याचे पत्नोत्तरी साकल्य लिहिले आहे. राजश्री व्यंकटभट जोगळेकर यांचे विचारें बंदोबस्त करून कर्तव्य ते करावें. येथील मजकूर तरः सिंदे होळकर यांची रवानगी दो चौ रोजांनी होणार. होळकराकडील कारभार राजश्री नारो गणेश यांजकडे सांगतात. राजश्री गंगाधर यशवंत यांचा खंड तीस लक्ष रुपये ठरला. मुक्तता शपथ घेऊन केली की, इजार. आपल्यापाशी द्रव्य न निघाल्यास दुप्पट देऊ. याप्रमाणें होऊन पुणियासी राहाणार राजश्री सदासिव रामचंद्र, राजश्री गोपाळराव गोविंद, यांचे विद्यमानें येऊन भेटले. अबरू मात्र संरक्षणार्थ माध्यस्थ गोपाळराव आले. वरकड बंदोबस्त कांहींच न जाला. पुढें होईल ते खरें. वरकड मंडळीचे खंड होतात. आपणास सुटका नाहीं. सख्ती बहुत आहे. दिल्लीस पत्रें क्रुद्धतेचीं जातात. संशय निघत नाहीं. वरकड पूर्वी साकल्य लिहिलें आहे, त्याजवरून कळेल. श्री कृपा करील. चिंता न करणें. बहुत काय लिहिणें ? भेट होईल तो सुदिन ! हे आशीर्वाद.