[ ५७८ ]
श्री.
पौ। छ २८ साबान.
राजश्री दामोधर माहादेऊ, व पुरुशोत्तम माहादेऊ, व देवराऊ माहादेऊ, गोसावी यासीः--
अखंडिलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो मल्लारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन करणे. विशेष. छ २६ रजबचें पत्र पाठविलें तें पावलें. अबदाली दरमजल लाहोराकडे गेला. गाजुदीखानाचा लेंक व अहमदखान बंगस मैनपुरीवर एकत्र होते. तेथून आह्मांस पत्रें आली की, सांप्रत्य कितेक कामेंकाजें जरूरीची आहेत, तुह्मी एकजण सत्वर येणें. यास्तव एकजण तिकडे जाऊं, एकजण आपणपासी येतों ; सारांष कीं, पातशहासी व वजिरासी चित्त शुद्ध नाही. तो यांचे वज़िरातीसी राजी नाहीं. पातशहांनी नजीबखानाकडून फौज ठेवविली आहे. त्याजकडून वजिरास शिक्षा करणार ऐसा प्रसंग दिसतो. यास्तव आपलें आगमन या प्रांतें ऐशा प्रसंगांत जालियानें उत्तम आहे, ह्मणोन, तपशिले लिहिलें, कळों आलें. ऐसियासी, प्रस्तुत जैपूर प्रांतें आलों आहों. येथील कामकाजाचा गुंता सत्वरीच उरकून त्या प्रांते येत असों. तिकडे. आलियाउपरि जो मजकूर उपयोगी पडेल तो केला जाईल. जलदीनेंच येत असें. रा। छ ११ साबान. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
( मोर्तब )
( सुद )
श्रीह्माळसाकांत चरणीं
तत्पर, खंडोजीसुत
मल्हारजी
होळकर.