[ ५७६ ]
श्री.
राजश्री दामोधर माहादेऊ व पुरुषात्ताम माहादेऊ गोसावी यासीः--
छ अखंडिलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मलारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन करीत असावें. विशेष. पत्र पाठविलें तें पावोन वर्तमान कळों आले. नवाबांनी इसमालखान व रामनारायेण व अलाकुलीखान व बालाउल्लाखां वगैरे सरदार, मातबर फौजसुद्धां, व भारी तोपखान्यासुद्धां, पुढें आपणांकडे पाठविले आहेत; नवाबही लांब लांब मजला करून येत आहेत, ह्मणोन लिहिलें कळों आलें. त्यास, इकडील वर्तमान तरी रोहिले शणवारचे रात्री पळोन गेले; पठाण राववारीं त्रितिये प्रहरी पळोन गेले. त्यास रामगंगेस पूल सिद्ध केला. याउपरि फौजा रवाना होतील. लुगारे राऊत हजार दोन हजार तापे बांधोन त्यांचे पाठीवर गेले. या प्रकारचे वर्तमान जालें. त्यास नवाबांनी सत्वर आलिया उत्तम आहे. दिरंग लावलियाचा प्रसंग नाहीं. तुह्मी सर्व वृत्त नबाबास निवेदन करून सत्वर येत, तें करावें. छ १० मोहरम. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. ( मोर्तबसुद )
श्रीह्माळसाकांत चरणीं
तत्पर, खंडोजीसुत म-
ल्हारजी होळकर.