[ ५७७ ]
श्री.
पौ। छ २८ साबान.
राजश्री दामोधर महादेऊ, व राजश्री पुरुशोत्तम महादेऊ, व राजश्री देवराऊ महादेऊ गोसावी यासीः---
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। मल्लारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहित जाणें. विशेष. पत्र पाठविले ते पावून वर्तमान कळों आलें. अबदाली दिल्लीपलीकडे गेला. गाजुद्दीखान अंतरवेद प्रांतें पठाण रोहिल्यासी मिळोन आहे; दोन शाहाजादे समागमें आहेत; नजीबखान दिल्लीस आहे; यास्तव आपलें आगमन या प्रांतें जालियाने सर्व बंदोबस्त होईल; ह्मणोन विस्तरे लिहिलें कळों आले. ऐसियासी, प्रस्तुत त्याच प्रांते यावयाचा विचार केला, परंतु, जैपूरचे मामलतीमुळें गुंता जाला आहे. येथील निर्गम करून सत्वरीच त्या प्रांते येत असो. तिकडे आलियानंतर उपयोगी अर्थ पाहून कर्तव्य तो केला जाईल. रा॥ छ १३ साबान. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. ( मोर्तबमुद )
श्रीह्माळसाकांत च-
रणीं तत्पर, खंडो-
जी सुत मल्हारजी
होळकर.