[ ५७१ ]
श्री.
पो। छ ८ मोहरम.
राजश्री दामोदर महादेऊ गोसावी यासीः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। खंडेराऊ होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें, प्रविष्ट होऊन लेखनाभिप्राय सविस्तर कळों आला. नवाबाचे बाहिरीचा मजकूर लिहिला, तरी, पठाण रामगंगेच्या पलीकडे गेला. याउपरि त्याचा वसवास धरावा ऐसें नाहीं. समागमेंच असो द्यावी. नदीपलीकडे फौज जाऊन शत्रूचें पारपत्य करावयाचा प्रसंग लिहिला. बहुत उत्तम. नवाब आलियावरी पायाबा दाखवितील, अथवा पूल बांधून देतील, तेथें उतरून नतिजा दिल्हा जाईल. भेटीचा विचार तरी तीर्थरूप राजश्री सुभेदार पुलाजवळ संनिधच आहेत. नवाब कोसी दुकोसी आल्यास तेही अलीकडे उतरून भेटी होतील. मुख्य गोष्टी याउपरि विलंब केल्यास पठाण पलायन करील. मग आजिपर्यंत केल्याचें सार्थिक काय ? यास्तव नवाब जलदीनें आल्यास बहुत उत्तम आहे. जाणिजे. छ ७ मोहरम प्रथम प्रहर. बहूत काय लिहिणें ?
( मोर्तबसुद )
मल्हारी सुत खंडेरायस्य मुद्रेयं.