Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लेखांक १८१                                                                                                                            १६४१                                     

             

तकरीरकर्दे कालोजी बिन जोगोजी पटेल काउजी बिन भागोजी पटेल का। उबरज पा। कर्‍हाड सु॥ अशरीन मया अलफ छ माहे शौवाल केली तकरीर ऐसी जे साहेबी पूसिले की तुमचा मूळपुरुष व सटवोजी बिन समनाजी व तिमाजी बिन नरसोजी याचा व तुमचा मूळपुरुष कैसा आहे हरदोजणापासी जमान घेऊन विचारिले तरी आपला हरदोजणाचा मूळपुरुष दयापाटिल त्यास लेक दोघे आपला वडील जाखोजी पाटिल व सटवोजीचा वडील पाकोजी पाटिल आमचा वडील जाखो पाटिल यानि पाटिलकी केली पाको पाटील धाकटा आपली तकसीम खाऊन होता आमचा वडिल जाखो पाटिल त्याचा लेक मादो पाटिल हा पटेलकी करीत होता दामो पाटलाची बायको कमाई पाटलीण पाटिलकी करीत होती तिचे लेक तिघे जण जाले त्यास वडील लेक पाटीलकी करीत होता वडील लेक मादो पाटील दुसरा लेक माबो पाटील तिसरा लेक बहिरोजी यास हाती करून कामाई पाटलीण पटेलिकी करीत होती त्यास मादो पाटील यास लेक कालोजी पाटील जाहला माबोपाटीलास लेक धुलोजी पाटील जाहला हे पटेलकी करीत होते कालोपाटील याचा लेक अपाजी पाटील वडील धाकटा लेक नरसोजी पाटील व लेकी चादाव जाली व अपाजी पाटीलाचा लेक तीन वरसाचा आवाजी पाटील व अबाजी पाटलाचा चुलता नरसोजी पाटीलाची व आपाजी पाटीलाची बहीण चादावा नागोजीराऊ पाटणकर यास दिल्ही होती त्यास अबाजी पाटिल व नरसोजी पाटिल हे धाकटी मुले होती त्यास कालोजी पाटिलास व आपाजी पाटिलास जीवकणेचे जननी चेवगत जाहाली त्याने मृत्य पावले त्यावरी मादो पाटिलाचा लेक धुलोजी पाटिल पाटिलकी करावयासी लागला तो एकनिस्टी पाहून सटवोजीच्या वडिलानी मारिला तीन वरसाचा अबाजी पाटील होता अबाजी पाटीलाचा चुलता नरसोजी पाटील याचा वारसाचा होता व धुलोजी पाटीलाचे लेक पाचजण होते व अबाजी पाटीलाची आई रखमावा व धुलोजी पाटीलाची बायको पिलावा हे पटेलकी करीत होती

असता त्या बाईका दुदील जाल्या मग त्या बाईकानी आपले मिरास भाऊ गावकर व कुलकर्णी व चौगला व सेट्या व कोष्टयाचा मेहत्र्या व माली याचा मेहत्र्या ऐसे बोलाऊन व बैते व जे मिरासदार होते तितके बोलऊन अणून त्यास विचारिले की आपला दादले मारिले मारा करून पळोन इदोलीस गेले आपणास तुह्मी भाऊ आहा काय सागता त्यावरी ते बोलिले जे सटवोजीचे वडील नाइकजी अबाजी आपली तकसीम खात असता हाक नाहक मारा करून गेले त्यास सुखरूप जाऊत तुमची मुले नेणती आहेत धीर टाकू नका तुह्मी आपला कारभार करा ऐसा धीर भरवसा देऊन सर्वस्वे अगीकार करून बाईकाच्या हाते कारभार घेऊ लागले त्यावरी सटवोजीच्या वडिलानी इदोलीहून एऊन कुलकरणी मा।रिला व चौगुला मा।रिला व सेट्या मा।रिला कोस्टेचा मेहेत्र्या व माळियाचा मेहेत्र्या हे हि मारिले ऐस पाच खून केले जे बाईकास धीर देऊन कारभार करित होते त्यानिमित्य मारिलेवरि बाईका घाबिर्‍या जाल्या मग रखमावा व पिलावा मुले हाती धरून मुलास मारावया जपो लागले मग कालो पाटीलाची लेक चादावा पाटणकर नागोजीराऊ यास दिली होती त्या आश्रयाने रखमावा व पिलावा मुले घेऊन पळोन गेली सटवोजीचे वडिल मारा करून पळोन इदोलीस गेले त्यास दुसरा मोकासी आला त्यास भेटोन कौल घेऊन गावात आले जोरावारीने पटेलकी करू लागले त्यास मुले व बाईका पाटणी होती त्यास नागोजीराऊ पाटणकर यास देवाज्ञा जाली त्याचा लेक हिरोजीराऊ बारा वरसाचा होता त्याचे बापभाऊ त्यास मारावया जपो लागले त्याची आई चादावाने आपल्या लेकास पळऊन भाडळेयास पाळविले

श्री.
ज्येष्ठ व. १२ शुक्रवार शके १७१५.
विनंति उपरी. कल्याणराव प्रकर्ण.-------

१ "कल्याणराव यांस आणून जलसा करणें हें कश्यावरून तुम्हीं लिहिलें ऐसें राजश्री नानानीं मला पुसिलें. याचें उत्तर मीं केलें कीं, कल्याणराव मजकडे येऊन आपल्यासि असें बोलणें जालें म्हणोन सांगत होते, त्याजवरून लिहिले. तेव्हां बोलिलें कीं, कल्याणराव यांस इतके चिकटून द्यावेयाचे नाहीं, याजकरितां वरचेवर उत्तर सांगितलें. त्याचा ग्रंथ इतका मध्यस्तापरियेंत जाला.” म्हणोन विस्तारें म।।र लिहिला तो कळला त्यास तिसरा गृहस्थ कामांत आला, तेव्हां थोड्या गोष्टीवरून मोठे ग्रंथच होतील; असाच काल आहे. आणि प्रसंगहि सर्व नमुदितच आहेत. याजकरितां बहुत सावधपणें वर्तत जावें. इकडेहि सुचविणें असेल तें सुचवावें. आळस करीत न जावा. कलम १

आदवनी वगैरे कलमें निवडून पाठविणार त्या कलमांची याद पाठविली ती पावली. ठराव करून याद येईल ते वेळेस उलगडून लिहावें. ह्मणजे त्याप्रमाणें मध्यस्तासि बलावयास येईल. कलम ----१

“फर्दा कामाच्या दाखवीत नाहीं असे तो ह्मणतां नये. याजकरितां आदवनी वगैरे औघड कामें आहेत त्याची भवति न भवति करून रघोत्तमराव यांस सांगावें; आपलेकडे लिहून पाठवावें; यांत कल्याणराव यांस बोलावुं नये; आपण बाबाराव यांस घेऊन मध्यस्तासि बोलावें. आह्मी फैसल्ले करून देवितों ऐसें ह्मणतात याचाहि अनुभव याजवरून समजण्यांत येईल.'' ऐसा बेत ठरला ह्मणोन लिहिलें; त्यास यांतील एक गोष्ट असी आहे कीं आतां तोडमोडीचा जाबसाल करूं नये. तोडमोडीचा प्रकार कोठपर्यंत कीं, सोहलतीनें, स्नेहाचे रीतीनें जाबसाल करते तर सर्व होते. तो प्रकार वास्तवीक नाहीं. आमचेच मानेवर बसून आम्हांकडील सरकारचे कामाचा फैसला न करितां वरती आणखी इच्छा ठेवणें अश्या चालीस तोडजोडीचा कारभार कां करावा ? याजकरितां कुलफडश्या वाजवीचे मार्गे करून घ्यावा. तरच कलमाचे फडचे. ऐसें नेटानें, केलियास चांगलें. पोंचट कारभार करणें असल्यास दाब राहील हें समजलेच आहे. दौलतीचे कपाळीं असेल तें खरें ! यास कोणाचा उपाय नाहीं. कलम----

तीन कलमें र॥ छ, २४ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ व. ११ गुरुवार शके, १७२५.

विनंति उपरी. “आवरंगाबादचे तनरव्यापैकीं आजपावेतों वसूल आला त्याची याद पाठविली त्याजवरून ध्यानांत येईल. मदारुलमाहम रोज कळवितात तेव्हां उगेंच खालें पाहवें. असो ! हाल्लीं वसूल जाऊन बाकी येणें त्याची याद पाठविली. मनन होऊन मध्यस्तांसि बोलोन जगधन सावकार याजवर चिठी द्यावी. अथवा रद कर्जी ऐवज कांहीं देऊन बाकी जगधन यांजवर चिठी द्यावी. सारांश ऐवज याउपरि सत्वर ठिकाणीं लागावा म्हणोन लि. “ त्यास तुमचे लिहिल्याप्रमाणें मध्यस्तासि दोन तीन वेळा बोलणें जालें, तुम्हांकडील वसूल बाकीची याद आली ती बाजिनस यांस दाखविली. त्याजवरून यांचे येथें बाळाजी नायक व आहत गुदौला यांचे मेहरनसी वसुलाची यादी आली आहे. एक लाख येकावन हजार दोनशे रुपये सव्वा तेरा आणे १५१२००।।।-। याच्या रसीदाच्या नकलाहि आल्यात; त्या याणीं दाखविल्या. त्यास तुम्हीं यादी पाठविली त्यास व यांजकडील वसूलाचे यादीसी मुकाबला पडत नाहीं. बाकीचे ऐवजाची चिठी जगधन याचे दुकानीं द्यावी. याजपैकीं कांहीं ऐवज रदकर्जात लाऊन द्यावा, हुंडावणीचा म।।र तुमचे लिहिण्याप्रमाणें दोन रु।। सेंकडा बोलण्यांत सरासरी आला आहे. येविषीं मध्यस्ताचें बोलणें कीं मी याचा म।।र राज्याजीसी बोलतो. ते तुम्हांस सांगतील त्यास पाच सात दिवस राज्याजी आपले लग्नाचे गडबडींत आहेत. मध्यस्ताचें याचे बोलणें जालें नाहीं. याउपरि राज्याजी दरबारास गेल्यानंतर जसें ठरेल तसें व यांजकडील वसुलाची यादी आली आहे त्याच्या व रसीदाच्या नकला वगैरे मागाहून रवाना करण्यांत येतील. सध्यां तुम्हांस कळावयाकरितां म।।र लिहिला आहे. र।। छ. २४ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ व. ११ गुरुवार, शके. १७२५
छ २४ रोज रवाना टपा पुण्यास

राजश्री गोविंदराव स्वामीचें सेवेसी विनंति, उपरी तुम्ही छ १२ जिल्कादची पत्रें पाठविलीं तीं छ १८ माहे मजकुरीं पावली त्याची उत्तरें.

१ राजश्री आबाचिटणीस व तात्या जोसी यांस बेदरी पिकदाण्या पाहिजेत. याजकरितां चार पिकदाण्या चांगल्या घेऊन पाठवावयासी आज्ञा म्हणोन लिं त्यास नबाब येथें आलियापासून जकातीचे उपद्रवामुळें माल निघत नाहीं. कारीगराचे मुचलका घेतले आहेत याजकरितां पिकदाण्या मिळत नाहींत. पूर्वी बेदरी सरंजाम फर्मायेषी आह्मी करविला त्यांत पिकदाण्या आहेत. बाळाजी रघुनाथ यास सांगून त्यापैकीं प्रस्तुत दोन पिकदाण्या चांगल्या बारामतीहून आणवून उभयतां दोन घ्याव्या. कलम.

१ मिस्तर मालीट यानें सरकारांत विनंति केली कीं दिलावरजंग यास लाड साहेबाचें पत्र आलें कीं नबाबाचा इरादा पुण्याकडे, यांत आमची खुषी नाहीं ऐसे नवाबासी स्पष्ट बोलावे, त्यास यांचा उद्गार मध्यस्त आपले जवळ करितात किंवा जिरवितात हे समजावें ह्मणोन लि। त्यास मध्यस्ताचा उद्गार अद्याप निघाला नाहीं. उणेपणाची गोष्ट याजकरिता कळविणार नाहीत असे वाटते. कलम ।

१ होळकर यांचे पुत्र मल्हाराव गेले. यांनीं बापु होळकर यांचे विद्यमानें सिंद्याकडील गोपाळराव यासी स्नेह जाला असतां तो मोडून पुन्हा विरुद्ध करून लढाई केली, षीकस्त खाऊन फरारी झाले. याविषयीं दोन तीन पुरवण्या तपसीलवार लिहिल्या याजवरून सर्व मजकूर ध्यानांत आला. आर्भकाचे बुद्धीनें जें करणे त्याचा परिणाम, समज कचा आहे; परंतु बादलौकिक वाइट झाला. कलम.

१ इंग्रजासी व फरासिसासी लढाई विलायतेंत सुरु जाली याचा तपसिलें मजकूर लिहिला तो कळला. येथेंहि हें वर्तमान कळलें, त्याजवरून राजश्री नानांचे पत्रांत पेशजी लिहिलें आहे. कलम.

१ मालीट वगैरे बोलणें लिहितो ह्मणोन राजश्री नानांचे पत्रांत दाखला कोठें नसावा ह्मणोन लि तें समजलें. तसेंच घडलें. कलम.

१ कोणी मुसलमान स्वार ठेवीत होता तो धरला, बीडवाल्याचें नांव घेतो. लोक ठेवावे याचा दस्ता ऐवज व्याज वगैरेचा तपसील लिहिला तो सर्व कळला.
त्यास स्वारापासून दस्तऐवज लिहून घेणें तो संप्रदाय येथील संप्रदायास मिळाला. गुंता नाहीं. यांस वर्तमान कळलें, दबून राहिले, बोलत नाहींत. कलम.------६
साहा कलमखाना छ. २४ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ व. १० बुधवार शके १७१५.

विनंति उपरि
प्रांत बालाघाट येथील मामलन सन १२०२ चीनले गांवकर व उदगीरकरकरांनी केली माजी बाकी बालाजी महिपतराव यांनी लिहून दिल्हीं. त्याप्रो। पंचवीस हजार त्यास द्यावे. बाकी नवे मामलेदारानीं निशा केली. दोघांचाहि ऐवज एकदांच देणें लागेल, आपण जमा करून ठेविला असेल ह्मणोन लि।। त्यास बाबतीवाल्याचा ऐवज ता॥ १२०१ पावेतो एकंदर घासीमियां सरवुलंदजंगाचे भरण्यांत आहे. वसूल आला त्याचा झाड। लिहिल्यावरून कळेल. बाकी ऐवज घासीमियांकडून आला ह्मणजे जमा होईल, बाबतीवाल्याकडे माहली वसूल पावला, तो वजा होऊन हिसेबी बाकी निघेल ते घ्यावयास येईल. कलम १
बाजी खंडेराव सर॥ मुख यांचे हप्त्या ब।। ऐवज देणें ते हाका मारितात, ऐवजाची निकड करितात. ऐवज रोख असावा आगर नबाबाचे रदकर्जास पावावा म्हणोन लि। त्यास बाजीं खंडेराव यांस ऐवज देणें पेकीं हरीपंतास रोख दहा हजार तुम्ही दिले आहे. शिवाय माहली फडचे होऊन रसीदा आल्या. हिसेबी बाकी राहील त्याची रुजुवात त्यांजकडील लक्ष्मण संगो येथें आहे त्यासि करून जो। ऐवज देणें तो घासीमीयाकडून ऐवज आला म्हणजे द्यावयास येईल, अथवा तुम्हांकडे पत्र पाठवूं त्या प्र॥ तुम्हीं तेथें द्यावा. कलम १
दोन कलमें रवाना छ २३ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ व. १० बुधवार शके १७१५.

विनंति उपरि जगधनाकडे रदकर्जी ऐवज पावला असावा. पहिले हत्याबाबत दीडलक्ष व गदवालकराबाबद साडेबावीस व घटाले साडे सतरा व हुंड्याबाबत तीस व वसमतेपो वीस हजार. या प्रा। दोन लक्ष चाळीस हजार पावले असावें. ऐसें असतां येक लाख बतीस हजार पावले म्हणोन लेख हे काय ? येविषी त।। लिहिलें, त्यास मामलेदारा बाबत ऐवज आजपर्येत आला व गदवालकराकडील हुंड्या बाबत तीस हजार एकंदर जमा धरून याचा झाडा दोन यादी अलाहिदा पाठविल्यावरून घटाल्याकडील पंधरा हजार आले. पो परत वजा पन्नास जातां चौदा हजार नऊशें पंनास रुपये नन्हुमल याचे दुकानीं जमा केले आहेत. वसुमतेपो वीस हजारहि साहुका-यांत आहेत. जगधनाकडे दिल्हे असते परंतु वसमतेचे ऐवजाची परवानगी पाठवितों ऐसें तुंम्हीं लिहिल्यावरून ऐवज साहुका-यांत ठेविला. परवानगी अद्याप आली नाहीं. त्यास घटाल्या बाबत व वसमतेचा ऐवज जगधनाकडे घ्यावा ऐसें लिहिल्यास भरणाकरितां येईल. उत्तर यावें. दुसरे वीस हजार वसमतचे तनख्याबाबत खोलंबून पडले आहेत. याजविषी दोन चार वेळ लिहिले असतां उत्तर नाहीं. यास काय करावें ? येक वेल नानास स्मरणपूर्वक यादींत लिहून पुसावें म्हणजे पहिले वीस हजार घेतले त्या सुद्धा माघारे द्यावें किंवा कसें हें। समजेल. पुढें वीस यावयाचे ते घ्यावे न घ्यावे होंहि समजावें म्हणजे तसें करावयासी येईल. हें काम विशेष अडचणीचें नाहीं. या विषई राजश्री नानाचें पत्र घेऊन पाठवावें. म्हणजे पुढें पाटी चांगलें र॥ छ २३ जिल्काद हे विनंति.

लेखांक १८०                                                                                                                             १६२१ आषाढ शुध्द ३                                      

             

राजश्री पंतप्रतिनिधि स्वामीचे सेवेसी

2 1 श्री सकलगुणअलंकर्ण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक चांदजीराऊ पापीकर दंडवत विनंति उपरि एथील क्षेम ता। छ २२ मोहरम पावेतो स्वामीचे कृपेकरून यथास्थित असे का। उंबरजेमध्ये खून जाहाला नाईकजी जाधव शरमैदा जाहाला + + + + + + + संभर स्वार मोजदार त्याचा आहे ते हुजूर चाकरी करावयासी जिवेसी रजावद आहेत आणि खून जाहाला ते समई ७।८ हजार रुपयाची लुटी नागावा जाहाला वघोडी नेली आहेत आणि मागती नाईकजी जाधवास त्वस्ट लागले आहे तरी स्वामीने पदरचे लोक खटे केले न पाहिजे पुढे फौजा जोरावार करून औरंगजेब घेणे ह्मणऊन नजर धरितां आणि हत्यारमारते लोक कस्टी करणे हे उचित नव्हे या उपरि जैसे आह्मी पदरचे लोक तैसे च ते हि पदरचे लोक आहेत त्यास कोणे गोस्टीचा तगादा होऊन दिल्हा न पाहिजे या उपरि साहेब धणी आहेत आह्मी सेवक असो रा। मामा कृपा करितात तैसी च आपण कृपा केली पाहिजे विशेष काय लिहिणे हे विनंति

63                                                                                   160

श्री.

यादी महमद अजीमखा यांजकडे घासीमीयां व सरबुलंदजंग यांजकडील माहाला बाबत स्वराज्याचे मामलतीचा ऐवज येणें ता। सन १२० १ पावेतों.
५६९४५४ चिन्ह बमोजी बदस्तऐवज मारनिले रूपये

श्री.
ज्येष्ठ व. १० बुधवार शके १७१५.

विनंति उपरि घासीमीयां व सरबुलंदजंगा बाबत न हप्त्याचा ऐवज येणें दोन हप्त तरि जगधनाकडे पावले असावे ऐवजाची व्यवस्था कसी ? आज्ञा यावी ह्मणोन ता लिहिलेंल्यास उभयतांकडील ऐवज महमद अजीमखां यांचे मारफातीनें आला त्याचे झाड्याची याद आलाहिदा ता। वार लिहिल्यावरून कळेल. सरबुलंद जंगाकडील ऐवजाचा फडच्या जाला थोडी बाकी येणें राहिली. घासीमीयांकडे भरणा भारी कारमार वोडग्रस्त, आरंभापासोन खांसाहेबास निकड करण्यांत गुंता नाहीं परंतु आजपर्यंत ऐवजाची सरबराई जाली नाहीं, तीमाराव व गोविंदराव पालीमलार दोन आमीलाकडून वसूल ती-याणव हजार पांचशें पावला. कांहीं माहुली मामलेदाराकडे फडच्या होऊन रसीदाही आल्या. त्या रुजु करण्याकरितां चिमणलाल आला होता. सांप्रत तिमात्र ही आले. खां साहेबास निकड लाविली आहे. पांच सात दिवसांत हिसेब रुजू होऊन बाकीचा फडच्या कसा करून देतात हें समजोन लिहिण्यांत येईल. रा। छ २३ जिल्काद हे विनंति.

लेखांक १७९                                                                                                                             १६२१ आषाढ शुध्द ३                                      

              179 2          179 1                           

स्वस्ति श्री राज्याभिषेकशके २६ प्रमाथी नाम संवत्सरे आषाढ शुध त्रितीया भौमवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजाराम छत्रपती याणी नाईकजी जाधव मोकदम + + + उंबरज यासि दिल्हे अभयपत्र ऐसे जे तुजपासून खून जाला याकरिता तू परागंदा होऊन गेला होतास त्याउपरि राजश्री कृष्णाजी परशराम याणी तुझे वर्तमान मनास आणून तुज कौल दिल्हा आहे परतु तू स्वामीचे अभयपत्र नाही ह्मणून गावावरी राहोन कीर्दमामूरी करीत नाही ऐसे विदित जाले त्यावरून हे अभयपत्र सादर केले असे तरी तू कोणे बाबे शक न धरिता एऊन गावावरी राहाणे आणि गावची मामूरी करणे ज्याप्रमाणे तुझा निर्वाह कृष्णाजी परशराम याणी करून कौल लिहून दिल्हा असेल तेणेप्रमाणे स्वामी चालवितील अभय असे जाणिजे निदेश समक्ष

                                                                                 161 3

रुजू
सुरू सूद