लेखांक १७९ १६२१ आषाढ शुध्द ३
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके २६ प्रमाथी नाम संवत्सरे आषाढ शुध त्रितीया भौमवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजाराम छत्रपती याणी नाईकजी जाधव मोकदम + + + उंबरज यासि दिल्हे अभयपत्र ऐसे जे तुजपासून खून जाला याकरिता तू परागंदा होऊन गेला होतास त्याउपरि राजश्री कृष्णाजी परशराम याणी तुझे वर्तमान मनास आणून तुज कौल दिल्हा आहे परतु तू स्वामीचे अभयपत्र नाही ह्मणून गावावरी राहोन कीर्दमामूरी करीत नाही ऐसे विदित जाले त्यावरून हे अभयपत्र सादर केले असे तरी तू कोणे बाबे शक न धरिता एऊन गावावरी राहाणे आणि गावची मामूरी करणे ज्याप्रमाणे तुझा निर्वाह कृष्णाजी परशराम याणी करून कौल लिहून दिल्हा असेल तेणेप्रमाणे स्वामी चालवितील अभय असे जाणिजे निदेश१ समक्ष
रुजू
सुरू सूद