श्री.
ज्येष्ठ व. ११ गुरुवार, शके. १७२५
छ २४ रोज रवाना टपा पुण्यास
राजश्री गोविंदराव स्वामीचें सेवेसी विनंति, उपरी तुम्ही छ १२ जिल्कादची पत्रें पाठविलीं तीं छ १८ माहे मजकुरीं पावली त्याची उत्तरें.
१ राजश्री आबाचिटणीस व तात्या जोसी यांस बेदरी पिकदाण्या पाहिजेत. याजकरितां चार पिकदाण्या चांगल्या घेऊन पाठवावयासी आज्ञा म्हणोन लिं त्यास नबाब येथें आलियापासून जकातीचे उपद्रवामुळें माल निघत नाहीं. कारीगराचे मुचलका घेतले आहेत याजकरितां पिकदाण्या मिळत नाहींत. पूर्वी बेदरी सरंजाम फर्मायेषी आह्मी करविला त्यांत पिकदाण्या आहेत. बाळाजी रघुनाथ यास सांगून त्यापैकीं प्रस्तुत दोन पिकदाण्या चांगल्या बारामतीहून आणवून उभयतां दोन घ्याव्या. कलम.
१ मिस्तर मालीट यानें सरकारांत विनंति केली कीं दिलावरजंग यास लाड साहेबाचें पत्र आलें कीं नबाबाचा इरादा पुण्याकडे, यांत आमची खुषी नाहीं ऐसे नवाबासी स्पष्ट बोलावे, त्यास यांचा उद्गार मध्यस्त आपले जवळ करितात किंवा जिरवितात हे समजावें ह्मणोन लि। त्यास मध्यस्ताचा उद्गार अद्याप निघाला नाहीं. उणेपणाची गोष्ट याजकरिता कळविणार नाहीत असे वाटते. कलम ।
१ होळकर यांचे पुत्र मल्हाराव गेले. यांनीं बापु होळकर यांचे विद्यमानें सिंद्याकडील गोपाळराव यासी स्नेह जाला असतां तो मोडून पुन्हा विरुद्ध करून लढाई केली, षीकस्त खाऊन फरारी झाले. याविषयीं दोन तीन पुरवण्या तपसीलवार लिहिल्या याजवरून सर्व मजकूर ध्यानांत आला. आर्भकाचे बुद्धीनें जें करणे त्याचा परिणाम, समज कचा आहे; परंतु बादलौकिक वाइट झाला. कलम.
१ इंग्रजासी व फरासिसासी लढाई विलायतेंत सुरु जाली याचा तपसिलें मजकूर लिहिला तो कळला. येथेंहि हें वर्तमान कळलें, त्याजवरून राजश्री नानांचे पत्रांत पेशजी लिहिलें आहे. कलम.
१ मालीट वगैरे बोलणें लिहितो ह्मणोन राजश्री नानांचे पत्रांत दाखला कोठें नसावा ह्मणोन लि तें समजलें. तसेंच घडलें. कलम.
१ कोणी मुसलमान स्वार ठेवीत होता तो धरला, बीडवाल्याचें नांव घेतो. लोक ठेवावे याचा दस्ता ऐवज व्याज वगैरेचा तपसील लिहिला तो सर्व कळला.
त्यास स्वारापासून दस्तऐवज लिहून घेणें तो संप्रदाय येथील संप्रदायास मिळाला. गुंता नाहीं. यांस वर्तमान कळलें, दबून राहिले, बोलत नाहींत. कलम.------६
साहा कलमखाना छ. २४ जिल्काद हे विनंति.