Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.
आषाढ शु. ८ मंगळवार शके १७१५.

विनंति, उपरि रावरंभा यांचे बोलण्यांत कीं करमाळ्यांतील खर्चाबाबत दोन हजार रुपये माहवारीचे ऐवजीं वजा घेण्यांत आले. त्यांस करार असा नाहीं कीं तालुक्यांतील कारखान्याचा खर्च माहवारींत मजुरा घ्यावा. ऐसें असतां तो देखील खर्च माहवारींत वजा करून रोखे घेतात तसे देतों, याप्रा। मध्यस्तासी बो(ल)ले. त्यांनीं बजाजीपंतास विचारिलें कीं याचा ब्याहडा ठरला आहे त्यांत हें कलम कसें उगवलें आहे ? यानीं सांगितलें येक ब्याहडा गोविंदराव यांजपासीं व येक बाजीसाहेबापासीं आहे त्यांत पाहावें लागेल. बाजीचें ह्म(ण)णें तालुक्यातील हाती, घोडे वगैरे खर्च व मोहरमाबाबत ऐवज माहवारीसीवाये. आमचें बोलणें कीं माहवारीचे पोटीं. हे विना ब्याहाड्यासीवाये समजत नाहीं. यास्तव राव रंभा याचें कारभारप्रकर्णी ब्याहाडा जाला आहे त्याची नकल इकडे पाठवून द्यावी. ह्मणजे दोन्हीं रकमा ब्याहाड्यांत उगवल्या असतील त्याप्रा मध्यस्तासीं बोलून अमल होईल. कितेक कलमाचे जाबसाल पडतात. यास्तव ब्याहाड्याची नकल येथें असली ह्मणजे प्रसंगोचित जो जाबसाल नमूद होईल त्याचें निराकरण करावयास नीट पडेल. यास्तव ब्याहाड्याची नकल पाठऊन द्यावी. रा। छ. ७ जिल्हेज. हे विनंति.

श्री.
आषाढ शु. ८ मंगळवार शके १७१५.

विनंति, उपरि राव रंभा यांचे ह्म(ण)णें कीं सालगुदस्तां मोहरमाबाबत साडेसात हजार कर्ज आपल्याकडें होतें तें माहवारीचे ऐवजांत दरमाहा एक हजार प्रा तीन हजार वजईचे पोटीं आदा जाले. माहे जिल्कादपर्यंत मोहरमचा ऐवज फिटून दीडहजार रुपये जाहले. इजाफा जाले आहेत. याचें उत्तर आह्मीं केलें कीं मोहरमचा ऐवज किती व कोटून कोठपर्यंत वजा घेतला असतां फडच्या हें आह्मांस ठाऊक नाहीं. गोविंदराव यानीं माहवारीऐवजीं तीन हजार वजा घेत जावें ऐसें लिहिल्यावरून तीन हजार मात्र वजा होत आले. परंतु यांत मोहरमाबाबत किती? व पटणचे स्वारीचे वगैरे कर्ज किती? हें समजलें नाहीं. बाजीचें ह्म(ण)णें आपण लिहून पाठवावें.याउपरि मोहरमचा ऐवज वजा न करितां माहवारी देत जावी त्यास मोहरमाबाबत ऐवज तुह्मीं यांस किती दिल्हे आहे व त्याचा करार कोणते महिन्यापासोन वजा किती करून घ्यावयाचे ? याचा तपशील लिहून पाठवावा व पटणचे स्वारीबाबत वगैरे कर्ज कोण महिन्या पासून कोठवर आदा व्हावयाचें हेंही ल्याहावें. त्याप्रा समजोन करितां येईल. उत्तर लौकर यावें. र॥ छ ७ जिल्हेज, हे विनंति.

परंतु सोइरे करिता सोइरे मारीत नाहीत तरी साहेबी मेहेरबान होऊन पटेल मजकुरास सोडवावयाचा हुकूम देविला पाहिजे ऐसा अर्ज केला द्यानतरायानी केला त्यावरून पादशाहानी हुकूम दिल्हा तो हुकूम द्यानतरायानी कर्‍हाडास पाठविला मग कर्‍हाडीच्या फौजदाराने तो हुकूम मानून आबाजी पाटिल सोडून दिल्हा मग आबाजी पाटिल गावास आले पटेलगीचा कज्या जाला मग आगासाहेब मोकाशी यानी पटेलगी अमानत ठेविली आणि थळ मौजे मारुल दिल्हे आपण मारलेस गेलो मारलेस गेलेवरी मागे आगासाहेब मोकासी तगीर जाहाला त्यावरी विज्यापुराहून सुलतानखान मोकासी होऊन आला मग गावास आलेवरी हे खबर मारलेमध्ये ऐकिली जे मोकासी गावास नवा आला आहे त्यानी धामधूम फार केली आहे ऐसी खबर ऐकून गावास आले मोकासी याची भेटी घेतली उपरातीक कामकारभार करावा तरी पटेलगी अमानत आगासाहेबाने केली होती मग पुढे सुलतानखान मोकासी याने आमच्या वडिलास व सटवोजीच्या वडिलास बोलाऊन नेले जे तुह्मी दोघे जण कामकारभार करणे दिवाणकाम चालवणे तुमचा हक्क इनाम पालक पटिपछोडी होळीची पोळी व माहार नागर ऐसा दिवाणा आमानत ठेविला आहे जोवरी त्याचा व तुमचा कजा निवडे तोवरी अमानत ठेविला आहे तुह्मी उभयता आपले गाविचा कामकारभार करणे मग इतकी कलमे अमानत ठेविल्यावरी आपले वडिलास व सटवोजीचे आजे वडील कामकारभार करीत असता थोरले माहाराजाची श्वारी आली गाव लुटला गावास खाणतिज्या लाऊन लुटून नेला मग गाव लुटलिआवरी द्यानतरायास मोकासा जाहला मग गावास कौल दिल्हा गाव भरल्या उपरातिक कामकारभार पूर्वी चालत आला मग महाराजानी सारा मुलूक कबज केला महाराजाच्या राज्यामध्ये पूर्वी चालिले तैसे च पुढे ही चालले दोघे कामकारभार करित असता पुढे आबाजी पाटिलाचा लेक आमचा वडील कालो पाटिल व रामजी पाटिलाचा लेक भागो पाटिल व सटवोजीचा वडील लखमोजीचा लेक दताजी व नरसोजी व आमचा वडील ऐसे मिळून दिवाणामध्ये पटेलगीच्या कजिआ निवाडावया बदल उभे राहिले त्यास थोरले माहाराज चदीचे मसलतेस चालिले चदीची मसलत करून आलेवरी तुमचा व त्याचा निवाडा केला जाईल आह्माबराबरी श्वारीस चालणे श्वारी करून एऊन मग तुमचा कज्या निवडून ऐसे माहराज कालो पाटिलास बोलिले मग कालो पाटिलाने अर्ज केला जे आपले वतनाचा कज्या आहे आपणास जागा सोडून एता न ये माहाराज जे चाकरी फर्मावितील ते एथे च करीन मग खटावी साबाजी घाटगे ठाणे घालून मुलुकामध्ये धामधूम करीत होते त्यावरी सखोजी गाइकवाड फौज देऊन रवाना केला त्याबराबरी कालो पाटिल दिल्हे जे एवडी मसलत करून एणे मग खटावावरी श्वारी गेली तेथे जुज जाले त्या जुजामध्ये कालो पाटिल साहेबकामावरी चीज जाहाले साहेबकामावरी पडिलेवरी आमचा कमजोर जाहाला मग सटवोजीचा आजा नरसोजी व लखमोजी याने अमानत सोडून हक दक खाऊ लागले मग चदीचे श्वारीहून माहाराज फिरोन आले आपला बाप जोगोजी पाटिल व भागोजी पाटिल जाऊन उभे राहिले महाराजास अर्ज केला आपला चुलता कालो पाटिल साहेबकामावरी पडिला पुढे बापभावानी कज्या करून अमानत मोडून हक लाजिमा खाताती ह्मणोन माहाराजास अर्ज केला मग हुकूम केला जे तुह्मी सुभा जाऊन उभे राहाणे आपला कज्या निवडून घेणे मग निरोप घेऊन गावास आले सुभेकडे जावे तो माहाराजास कैलासवास जाला त्यावरी माहाराज शभू सिहासनारूढ जालेवरी मग जोगोजी पाटिल व भागोजी पाटिल माहाराजाचे भेटीस गेले भेटी घेतली मग अर्ज केला जे आपल्या वतनाचा कज्या आहे सटवोजीचा वडील नरसोजी व लखमोजी जोरावारीने जे अमानत मोडून पटेलगीचा कारभार करिताती त्यास माहेटीजानी कोनेर रगनाथ सुभेदार यावरी मनसुभी दिल्ही मग निरोप घेऊन गावास आले गावास येऊन सुभेदाराचे भेटीस गेले

श्री.
आषाढ शु. ७ सोमवार शके १७१५.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.

पो गोविंदराव कृष्ण सां। नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लि। जावें. विशेष, राजश्री रंगो प्रल्हाद नि।। सरदेशमुख यांचे मामलतीचा ऐवज ता। सन १२०१ पावेतों. त्यापैकीं साडे सतावीस हजार आह्मीं नगदी वसूल येथें सखाराम अनंत नि।। मारनिले यांस दिल्हा. पन्नास हजार रुपयाची चिठी, तुह्मी तेथें मंत्रीस मारनिलेचे मामलतीबाबत, राजश्री हरिपंत तात्या यांची देविली तो ऐवज अद्याप पावला नाहीं. ह्मणोन रंगोपंत यांजकडील पत्रीं बोभाट आला. त्यास चिठी देऊन फार दिवस जाले. अद्याप ऐवज पटला नाहीं. याचें कारण काय येविषीं तात्या यांस विनंति करून ऐवज यांचा यांस पावता जाल्यांत पेंचांतून मोकळे होतील. येविषीं पेशजी ही ऐक दोन वेळा लिहिलें. त्यास सदरहुप्रा यांजकडील मामलतीसमंधें ऐवज पावे तें करावें. यासिवाय माहालींही वसूल मारनिलेकडें पावला त्याच्या रसीदा आल्या. पन्नास हजारांचा भरणा जाला ह्मणजे यांजकडील उलगडा होतो. यास्तव लिहिल्याप्रा। घडवावें. रा। छ. ६ जिल्हेज बहुत काय लि।? लोभ किजे. हे विनंति.

छ, ७ रोज टपा रवाना
आषाढ शु. ८ मंगळवार शके १७१५.
राजश्री गोविंदराव स्वामीचे शेवेसी.

विनंति. उपरि इकडून पत्राच्या रवानग्या पैहाम बहुत जाल्या. त्याचीं उत्तरें फार येणें तीं यावीं. सांप्रत रावरंभाप्रकर्णी वगैरे मा।र अलाहिदा लिहिल्यावरून कळेल. वरकड इकडील वर्तमान राजश्री नाना यांचे पत्रीं लिहिलें आहे त्यावरून समजेल. वरचेवर पत्रें पाठऊन वर्तमान लिहित जावें. रा। छ ७ जिल्हेज. हे विनंति.
पु।। राजश्री गोविंदराव स्वामीचे शेवेसी.

विनंति, उपरि राजश्री रावरंभा यांस माहवारीचा ऐवज येथें साहा हजार रुपये नगदी देऊन दरमहा अकरा हजाराचे दोन रोखे, करमाळ्यांत दोन हजार व कर्जा बाबत वजाई तीन हजार, याप्रा घेण्यांत आले. त्यास सांप्रत मोहरमचे खर्चाकरितां माहवारीसिवाये सात हजार रुपये द्यावे याप्रमाणें राव रंभा यानीं आह्माकडें सांगोन पाठविलें. याचें उत्तर आह्मीं केलें कीं माहवारी सिवाये ऐवज मिळावयाचा नाहीं. बेदरचे स्वारीस निघते वेळेस माहवारीखेरीज च्यार हजार रुपये नवाब आज मुलउमरा बाहादुर यांनीं सांगितल्यावरुन दिल्हे तेच ज्याजती. ऐसे असतां मोहरमचा ऐवज देण्यास जागा नाहीं, याप्रों साफ सांगितल्यावरून बाजी आजमुल उमराबहादुर यांजकडे जाऊन त्यांस सांगितलें. त्यांनीं बजाजीपंतास विचारलें कीं पहिले मोहरमचा ऐवज देण्याची चाल कसी आहे ? यानीं सांगितलें कीं माहवारी पांच हजार पाहेली होती ते समंई मोहरमचे खर्चास माहवारीशिवाये देण्यांत आले. दाह हजार माहवारीचा नेम ठरल्यापासोन मोहरम बाबत खर्च माहवारीचे पोटीं. पेशजी साल गुदस्तां मोहरमाकरितां ऐवज, पटणचे स्वारींत कर्ज दिल्हे तो ऐवज माहवारींत वजा करून घेत आलो. याप्रमाणें सांगितल्यावर बीजीचें ह्म(ण)णें की सात हजार कसेही करून माहवारीसिवाये द्यावे तर निभाव. तुर्त साहा हजार ऐवज नगदी माह:वारीचा येतो. यांत मोहरमाबाबत वजा केल्यास खर्च कसा चालेल? याप्रा। बाजाही. (?) तेव्हां मध्यस्तानीं तोड सांगितली कीं पांच हजार रुपये मोहरमाकरितां तुह्मास देवितों; सातहजार मिळणार नाहींत. याप्रा करून आह्मांकडें मध्यस्तानीं सांगोन पाठविलें कीं रावरंभा यांस मोहरमचे खर्चास पांच हजार रुपये आपण द्यावे. गोविंदराव यांस लिहावें. त्यांनीं माहवारीसिवाये मोहरमाबाबत द्यावे ऐसें लिहिल्यास दिल्हेच आहेत. कदाचित माहवारीचे ऐवजीं दरमाह एक हजार वजा करून घेत जावें ऐसें लिहिलें आल्यास तसें कारितां येईल. तूर्त दिवस मोहरमचे. साहित्य जालें पाहिजे. यास्तव पांच हजार द्यावे. त्यावरून बाजीचा रोखा घेऊन पांच हजार रुपये दिल्हे. रा। छ. ७ जिल्हेज. हे विनंति.

श्री.
आषाढ शु. १ मंगळवार शके १७१५.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री
गोविंदराव स्वामीचे सेवेसीं.

पो गोविंदराव कृष्ण सां। नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असावें. विशेष मौजे बिरमपूर उर्फ बालेपांसरी वगैरे गांव पा नेवासे हें गांव नवाब बंदगानअली यांचे सरकारांतून महमद रुस्तम अलीखान यांचे जातीचे जागीरींत होऊन सनद खासमोहरी जाली. ऐसीयास राजश्री माहाराव निंबाळकर याणीं राजश्री मोरो हरि कमावीसदार पामारकर यांस सांगोन खान मजकूर यांचा दखल होण्यास दिकत केली व सन १२०२ सालचा यैवज आमानत ठेविला आहे. खान मजकूर यांस देत नाहींत. त्यास याचे बंदोबस्ताविसीं गोविंदराव भगवंत यास पत्र द्यावें ह्मणोन मध्यस्तांनीं व राजश्री रायेरामा बहादूर यांणीं सांगितलें. त्याजवरून हें पत्र लिहिलें असे कीं येविसीं राजश्री नानास विनंती करून देहाये मजकूरचा अमल दखल बंदगान अलीचे सनदे प्रमाणें करून देवावा. कदाचित माहाराव व मोरो हार दिकत करतील तरी त्यासही सरकारांतून ताकीद करवावी. रा छ, २९ जिल्काद बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंति.
माहे जिल्हेज उर्फ आषाढमास. ड-५

छ.६ रोजीं सखाराम अनंत नि।। सरा। मुख्यांनीं मागितलें सबब.

त्यावरी काळो पाटीलाचा लेक आपाजी पाटील व धुलो पाटिलाचे लेक पाच जण वडील लेक रामाजी पाटिल दुसरा चागो पाटिल तिसरा काऊजी पाटील चवथा बहिरोजी पाटील पाचवा मबाजी पाटिल व रखमावा व पिलावा ऐसी पाटणात राहिली पाटणी राहून उबरजेवरी दावे केले दावे करिता करिता चागो पाटिल व काऊजी पाटिल व बहिरोजी पाटिल हे तिघे सटवोजीच्या वडिलानी मारिले त्यावरी हिरोजीराऊ पाटणकर व आपला वडिल अबाजी पाटिल भाडिळेमध्ये होते त्यास गोदाजी घोरपडे भाडळेकर त्यानी आपली कन्या हिरोजीराऊ पाटणकर यासी दिली लग्न जालेवरी हिरोजीराऊ पाटणास यावयास सिध जाले त्याबराबरी अबाजी पाटिल हि निघाले मग गोदाजी घोरपडे यानी सेभर श्वार हिरोजीराया बराबरी देऊन पाटणास जबरदस्तीने पाठविले हिरोजीरायानी आपले भाऊबदास नसीयत करून वतन खाऊन लागले मग हिरोजीरायाची माय चादावाने लेकास सागितले जे तुह्मी आपल्या वतनावरी एऊन बैसला आणि आपले भाचे आपल्या वतनावरी तुह्मी नेऊन बसवा ना तेव्हा थोरले राऊ तुह्मास श्वर्गी हसतील त्यावरी हिरोजीरायानी मान्य करून आपले वचन खरे करितो ऐसी बोली जाहाली हे वर्तमान सटवोजीच्या वडिलानी ऐकिले मग ज्यानी मारा केला होता त्यानी नाईकजी अबाजीने रसद विज्यापुरास जात होती ते लुटली ते दिवाणास कळले त्यानिमित्य कैद करून दिवाणाने नाईकजी अबाजीची डोचकी मारिली नाईकजी अबाजीचा भाऊ दिवजी व त्याचा लेक लखमोजी व अबाजीचा लेक नरसोजी हे सटवोजीचे आजे अबाजी पाटिल व रामजी पाटिल पाटणी होते त्याचे समजाविसीस आले मग अबाजी पाटिलाने हिरोजीरायास सागितले जे आपले भाऊबद गावी हाऊन समजाविसीस आले आहेत त्यास हिरोजीराऊ बोलिला की त्यानी गोत्रहत्या केल्या आहेत त्याचे तोड पाहू नये मग अबाजी पाटिल व रामजी पाटिल बोलिले की आपले मारे केले त्याचा जबाब करितील मग मुतालीक हाती देईन मग त्यास हिरोजीरायाने सटवोजीच्या आज्यास लखमोजीस व नरसोजीस बोलाऊन पुसिले जे तुह्मी मारा केला त्याची वाट काय करिता त्यावरी लखमोजी व नरसोजीने जाब दिल्हा ज्यानी मारा केला ते आपल्या कर्मे गेले आपल्याच्याने खुनाची वाट होती ऐसे नाही आपली तकसीम आह्मी खाऊन राहू त्यानी रामजी पाटिलाने व अबाजी पाटिलाने गावास यावे आह्मी आपला कामकारभार व निमे तकसीम व वडीलपण करावे माहार नागर पटि पछोडी जे वडिलपणाचे मान जे असतील ते खावे ऐसी बोली हिरोजीरायासी त्यानी केली मग हिरोजीरायानी अबाजी पाटिलास रामजी पाटिलास बोलाऊन सागितले जे तुमचे भाऊ न्यावयास आले आहेत तरी तुह्मी गावास जाणे त्यावरून अबाजी पाटिलाने व रामजी पाटिलाने विचार करून हिरोजीरायास जाब दिल्हा जे आपले पोटी सतान नाही हे गावास नेतील आणि दगा करितील आपल्याच्याने गावास जावत नाही लखोजीचे व नरसोजीचे मनामध्ये समजावीस करून न्यावयाचे असेल तरी मुतालीक देऊन त्यावरून लखमोजीने व नरसोजीने आण भाश क्रिया करून हिरोजीरायाचे गुजारतीने आमचा मुतालीक हाती धरून गावास आले गावी मुतालीक आपले वडिलपणाचा काम कारभार करू लागला एक दोनी साले गावी होता त्यावरी हिरोजीरायावरी विज्यापुरीहून मोहीम जाहली ते मोहिमेमध्ये पडिले ऐसे ऐकून त्या माघारे मुतालीक मारला त्यावरी अबाजी पाटिल व रामजी पाटिल या दोघामध्ये सात पाच लेक जालेवरी अबाजी पाटिल व रामजी पाटिल हे गावास आले मुतालिकाची वाजीपुसी केली त्यावरी कर्‍हाडीच्या दिवाणास सटवोजीच्या वडिलाने सागितले की हे ह्मणजे हिरोजीराव पाटणकर याचे मेहुणे आहेत मग कर्‍हाडच्या दिवाणास सांगोन धरून नेले उपरातील कर्‍हाडीच्या फौजदाराने हुजूर पातशाहास लिहिले जे हिरोजीराव पाटणकर याचे मेहुणे आबाजी पाटिल उबरजकर धरून आणिले आहेत त्यासी ठेवावे की जिवे मारावे या बाबे जो हुकूम येईल त्याप्रमाणे वर्तणूक करू ऐसे लिहिले उपरी मग द्यानतरायानी पातशहास अर्ज केला जे हिरोजीराव पाटणकर पुड होता तो मारिला गेला हे त्याचे सोइरे आहेत उबरजचे पाटिल आहेत सोइरे जन जनाचे असताती

श्री.
ज्येष्ठ व. १२ शुक्रवार शके १७१५.

विनंति उपरी. राजश्री जीवनराव पांढरे यांजविषंईचा मजकूर पेशजी तपसिलें तुम्हास लिहिला आहे; त्यावरून कळलें असेल, पत्राची उत्तरें लवकर रवाना करावीं; व हिसेबाच्या यादीच्या नकलाहि पाटवाव्या. ह्मणजे आपले ऐवजाची तोडजोड यांजपासून ठराउन घेउन पुढील क्रम यथास्थित चालेल. उतरें लिहिल्या मजकुराची सविस्तर खोलून पाठवावीं. र॥ छ, २४ जिल्काद हे विनंति.

छ. २४ रोज पत्र आनंदराव नरसिव्ह याजवळ दिल्हे तें, राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.

पो गोविंदराव कृष्ण सांत नमस्कार विनंति उपरि. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष आबदुल गनीखां हाकीमजी पुण्यांत आहेत त्यांचा तुमचा सहवासही विशेष ह्मणोन राजश्री आनंदराव नरसिंव्ह यांचे सांगण्यांत. त्यास हाकीमजी स्नेहास योग्य मनुष्य याजकरितां त्यांचा अगत्य वाद धरून हरयेकविषई साहित्य करीत जावें. र॥ छ. २४ जिल्काद बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हें विनंति. माहे जिल्हेज उर्फ आषाढ मास.

छ. रोज पत्र पंचभाई यांनीं मागिततल्यावरून दिल्हे.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.

पो गोविंदराव कृष्ण स॥ नमस्कार विनंति उपरी, येथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें. विशेष मौजे भोंडणी उर्फ मामुराबाद रसुलपुरा पा। रावेर हा गांव हालीं सरकारांतून मीर मुराद आलीखान बहादूर पंचभई यांस इनाम आहे. त्याचे बंदोबस्ताविसीं पेशजी मिरफेंत अलीखान बहादुर पुण्यास आले. राजश्री नानांची भेट घेतली. बंदोबस्ताविसीं हुजुरे पत्रें करून दिल्हीं आणि मौजे मारी जागिरीचे अमलाचा दखल करून दिल्हा. त्याप्रमाणें चालत आहे. परंतु स्वराज्याचे, अमलाचा बंदोबस्त होत नाहीं. चोपडेकर कमाविसदार याजकडून मौजे मारीं आनंदराव नामें कारकून आहे. ते यांस नाना प्रकारें दिमती घेऊन उपद्रव करितात. याजमुळें हे हैराण होऊन बोभाट सांगतात. पेशजी यांचे बंदोबस्ताविसीं तुम्हांस जाते समई नबाबानीं व मध्यस्तानीं मा।र सांगीतला; व वाटणी वगैरेच्या यादी तुम्हांपाशीं दिल्ह्या आहेत. तुम्हीं सरकारांत बोलून बंदोबस्त करून दिल्हा नाहीं ह्मणोन हालीं खान मा।र यांनीं नबाब बंदगान आलि यास अर्ज केला. त्याजवरून आह्मांस ईर्षाद केला कीं तुह्मीं मदारुल महाम यांस पत्र लिहून बंदोबस्त करून देवावा. स्वराज्याचे अमलाच्या याणीं दोन शकला सांगितल्या आहेत. एक तो वाटणी करून घ्यावी त्याप्रमाणें कमाविसदार घेत जातील; अथवा स्वराज्याचे अमलाचा मख्ता ठरावून घ्यावा त्याप्रमाणें हे सालाबाद ऐवज दाखल करीत जातील, फरफरमास व सोयरे वगैरे यांस हिसा नाहीं. ते यांचे वहेवटीत राहील. ह्या दोन शकलांतून. एक शकल ठराउन दिल्ह्यास गांव यांजकडे निर्बध चालेल. ह्मणोन इर्षाद केल्यावरून आह्मी राजश्री नानांस आपले हातें पत्र लेहून खुलें तुमचे पत्रांत घातलें आहे. हें तुह्मी वाचून पाहून, गोंद लावून, पावते करून, पेशजीच्या यादी तपसीलवार तुम्हापासी आहेत त्या दाखऊन, याचा बंदोबस्त करून देवावा. येविसीची येथें किती किरकिर आहे हे सर्व तुमचे समजण्यांत आहे. याजकरितां उत्तम रीतीनें नानांस विनंति करून बंदोबस्त करून देवावा व खान मा।र यांचे सांगण्यांत कीं गोविंदपंत नाना कोण्ही कारकून तेथें आमचा वकील ह्मणून आला आहे तो आमचेच पैषुन्यच्या गोष्टी सांगतो. त्यास त्याचे बोलणें मंजूर नसावें, याजकरितां तुह्मास लिहिलें आहे कीं गोंविंदपंत यांचें नाहींत; आणि त्यांचे सांगणें सरकारांतही मंजूर न व्हावें, रा। छ. १ जिल्हेज बहुत काय लिहिणें ? लोभ किजे. हे विनंति.
मध्यस्थ व राजे रायेरामा यांचे मागितल्या वरून पत्र लिहिलें असे.

श्री.
ज्येष्ठ व. १२ शुक्रवार शके १७१५.

विनंति उपरि. राजश्री अंताजी निराजी यांनीं मारडीहून ऐवजांच्या हुंडया पुण्यास पाठविल्या. काहीं हुंड्या सोलापुरीहून बापु सिवदत याचे दुकानींहून केल्या. कांहीं तुळजापुरीहून लिंगापा नाइक यांचे दुकानच्या. हा कारभार बापुदेव सोलापूरकर यांचे मार्फतिनें केला. दोन हजार रु।। हुंडयासिवाय व्याजती अंताजीपंत यांनीं भरणा केला तो ऐवज बापुदेव यांस अंताजीपंतांनीं निकड करून मागितला. सबब बापुदेव सोलापुरास जाऊन त्यानें आपले पत्तीनें चौघा सराफासीं ऐवज घेऊन सोळाशें रु।। अंताजीपंत यांचे यांस दिले, ऐसें असतां राजश्री रामचंद्रपंत सुभेदार व रामचंद्र तिमाजी यांनीं अंताजीपंतास पत्रें पाठविली कीं, आमचा माल सराफापासून तुम्हीं नेला, तो देणें. त्यास हा कारभार परभारा बापुदेव यांचे विद्यमानें ऐवज देऊन हुंड्या घेतल्या. इजाफा ऐवज पडला तो बापुदेवापासोन घेतला. ऐसें असोन सोलापूरकर अंताजीपंत यांचे आंगीं लाऊन लिहितात; व बखेडा करणार यास्तव तेथें तुह्मीं या गोष्टीचा बंदोबस्त करून ल्याहावें. कितेक सोलापुराकडील बोभाट ! याजकरितां अंताजी निराजी यांनीं तुम्हांकडे कारकून पत्र देऊन पुण्यास पाठविला आहे. वरचेवर मारडीकडील कामाचा बंदोबस्त करीत जावा. रवाना छ. २४ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ व. १२ शुक्रवार शके १७१५.

विनंति उपरि. बाळाजी व्यंकटेश व येमाखिदमतगार आला तो कारभार ठरला. दस्तक हुजरे सिंध करवितों. गुजराथ प्रांत नेमांत; परंतु श्रीमंताचे म्हणणें मावळही खांचर आहे. चिंता नाहीं ! याची भवति न भवति होऊन उदईक तें लिहीन. सारांश करावें ऐसें जालें. आपण निशा घेतली असेल तो ऐवज हस्तगत होये ऐसें करावें. इकडून कार्य जालें. तिकडे दिकत न पडावी याचा विच्यार करून उत्तर आधीं यावें. उत्तर आलियावर दस्तक हुजरे देऊन सेमास पाठवीन तों पावेतों खोळंबा, यास्तव उत्तर सत्वर यावें म्हणोन लि’ त्यास निश्या घेतली परंतु त्यांत थोडासी आटक आहे. सयद तुम्हांकडून कार्य करून त्याजपासी गेला म्हणजे त्यांनीं चिठी येथें सावकारास पाठवावी; म्हणजे ऐवज हातास येईल ऐसें आहे.

त्यास दस्तक हुजरे तयार करून सयद याजबरोबर पाठवावे. ऐवजाची चिठी त्याची घेऊन पाठवितील. नंतर दस्तक व हुजरे त्यांस रुजु करून द्यावे. याप्रमाणें सैदास सांगून करावें; अथवा सैदास म्हणावें कीं, चिठी ऐवजाची घेऊन या; मग दस्तक हुजरे देईन.'' याजकरितां येमाची व सैदाची अगोधर जलद रवानगी तिकडे करून चिठी आणवावी. तुमचे विच्यारें कसें करावें ? खातरजमा ऐवजाची कसी ? हें सैदास पुसून करावें. आतां आम्हापासीं सावकाराची चिठी आहे. परंतु त्यांत करार कीं, “दुसरें पत्र परवानगीचे आणून दिल्हे म्हणजे तेवेळेस पत्र पावतांच रु। देईन." याजकरितां सैदास सांगून चिठी आणवावी आणि कार्य करावें. सैदाचे रवानगीस आळस करूं नये. मावळ अथवा गुजराथ श्रीमंतांचे व त्यांचे युक्तीस येईल तसें करावें. सैदास पाठवून मावळांतील खांचराचा प्रकार कळवावा; आणि चिठी ऐवजाची आणवावी. मग दस्तक हुजरे द्यावें, हें बरें ! याजवर सैदाचे तुमचे युक्तीस येईल तसें करावें. ऐवजाविसी कसें बोलण्यांत आलें ? आम्ही लि त्याप्रमाणें किंवा कसें ? हें सयेदासही कळवावें. रा छ।। २४ जिल्काद हे विनंति. लि त्यांत उणें बोलण्यांत आलें असल्यास सयेदांस कळवूं नये. अधिक बोलण्यांत आलें असल्यास सांगावें. हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ व. १२ शुक्रवार शके १७१५.

विनंति उपरि.
१ हुंडी केंलियास बट्यामुळें तोटा पडतो याचा तपसील लि।। तो कळला कलम.
१ नांवनिसीवार पत्रकाची नकल पाठविली ती पावली कलम----
१ राजश्री नानाकडील जाब सरासरि पाठविला तो पावला कलम –
१ राजश्री रामचंद्र दादो यांचें पत्र त्यांचे चिरंजीस होते तें पावतें केलें. कलम------
जनार्दनपंत चेनापटणकर यांचे पत्र पावलें, नागपुरास जवाहीर आलें। म्हणोन लि।। व त्याचे बंधूचें पत्र त्यांचे नांवाचे पाठविलें तेंहि पावले. त्यास मध्यस्ताचे कानावर घालून ते सांगतील त्याप्रमाणे जनार्दनपंत यांस लिहिण्यांत येईलं. कलम----
१ “ सिद्दी इमामखान याची मोतीं आलीं. बाळाजी व्यंकटेश यांजबरोबर पाठवितों “ ह्मणोन लि. त्यास सिद्दी इमाम यास कळविलें. कलम-----
१ “भारामल व भावसिंग याची मोतीं आणिलीं " ह्मणोन लि; तें कळले. कलम-----
१ “ पांडोबा बारामतीस गेला. चिरं सौ।। दुर्गाबाई पावली” ह्मणोन लि तें कळलें. कलम-----
१ “घासीमीया याजकडील ऐवजांत माझा ऐवज येणें त्याची नांवनिसीवार याद पाठविली. त्यास दोन हप्त्यांचा ऐवज येईल. त्यांत माझेकडील ऐवज जमा करावा. घासीमीयाकडील दोन हफ्ते उगवले असे मामलेदार यांचे सांगण्यांत." म्हणोन लि. त्यास तुम्हीं यास पाठविली त्याप्रमाणें घांसीमीया यांजकडील हप्त्याचा ऐवज आला म्हणजे तुमचा ऐवज जमा करून लिहून पाठवूं. दोन हफ्ते उगवले किंवा नाहींत याचा तपसील काल तुम्हांकडे याद पाठविली त्याजवरून कळेल. कलम----
१" षमषुल उमरावांचे षादीबद्दल जिनस मंबईहून खरेदी होऊन आला; लवकर एकदोन दिवसांत येथून रवाना होईल. " ह्मणोन लिहिलें ते कळलें. अजमसाहेब यास तुमचे लिहिल्याप्रमाणें कळविलें. कलम----
“पालखीचे सरंजाम फार चांगले आहेत. सरकारांत दाखऊन ठरेल तसें लिहीन ह्मणोन लि. तें कळलें. कलम ----
१ बाळाजी रघुनाथ यांस पाठविण्याविसीं आज्ञा त्यास श्रीमंतास विच्यारता “ थांब” ह्मणतात; तेव्हां लाच्यार त्यास आणीक एक महिना लागेल. लाच्यार पाटील कुळकर्णी याविसी मनसबा आहे. इकडील ठीक न पडल्यास पाटलाचें करावें; याचा ताला माला पाहणें. याजकरितां दिरंग, " ह्मणोन लि. त्यास ठीक पडो, अथवा न पडो ! पाटलाचे करावयाचेंच, तिकडील ठीक जाल्यास पर्याय पाटलासी करणें तो निराळा; तेथील ठीक न जाल्यास पर्याय वेगळा. दोन प्रकार करण्याचे आहेत; त्यांतून एक प्रकार प्रसंगानुसार करावा. तिकडील ठीक न जालें तर करावयाचें. नाहीं तर न करावें असें होऊं नये. जसें तेथील ठरेल त्या धोरणासारखें इकडील करावयाचें; परंतु करावयाचें खरें ! या कामास बाळाजीपंत याचे रहाण्याचा उपयोग कांहींच नाहीं. बाळाजीपंत असला तरी तुम्हीं पत्रांत म॥र लिहिल्यावरच कळेल. बाळाजीपंत आपले बरोबर पत्र मात्र घेऊन येईल; इतकेंच ! विशेष काम नाहीं. येथें बाळाजीपंत यावेगळ फार खोळंबा हें तुमचे ध्यानांतच आहे. लिहावेंसें नाहीं. याजरितां इतकें लि. बाळाजीपंत यांस इकडे पाठविणें त्यांतल्या कामाची खराबी नाहीं; असें आह्मांस वाटतें. तुमचें मनांत काय असेल तें असो !
रवाना छ. २४ जिल्काद हे विनंति.