लेखांक १८० १६२१ आषाढ शुध्द ३
राजश्री पंतप्रतिनिधि स्वामीचे सेवेसी
श्री सकलगुणअलंकर्ण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक चांदजीराऊ पापीकर दंडवत विनंति उपरि एथील क्षेम ता। छ २२ मोहरम पावेतो स्वामीचे कृपेकरून यथास्थित असे का। उंबरजेमध्ये खून जाहाला नाईकजी जाधव शरमैदा जाहाला + + + + + + + संभर स्वार मोजदार त्याचा आहे ते हुजूर चाकरी करावयासी जिवेसी रजावद आहेत आणि खून जाहाला ते समई ७।८ हजार रुपयाची लुटी नागावा जाहाला वघोडी नेली आहेत आणि मागती नाईकजी जाधवास त्वस्ट लागले आहे तरी स्वामीने पदरचे लोक खटे केले न पाहिजे पुढे फौजा जोरावार करून औरंगजेब घेणे ह्मणऊन नजर धरितां आणि हत्यारमारते लोक कस्टी करणे हे उचित नव्हे या उपरि जैसे आह्मी पदरचे लोक तैसे च ते हि पदरचे लोक आहेत त्यास कोणे गोस्टीचा तगादा होऊन दिल्हा न पाहिजे या उपरि साहेब धणी आहेत आह्मी सेवक असो रा। मामा कृपा करितात तैसी च आपण कृपा केली पाहिजे विशेष काय लिहिणे हे विनंति