Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
-३ [ क्षतिः = खइ = खय = खै ]
खरकटणें, खरकाटणें, खरकुटणें [ खरकटें den मराठी ] to be fould with खरकटें.
खरखरित [ खर (harsh, rough) = (द्विरुक्त) खरखरित ]
खरखरीत [ खरखरित = खरखरित-रीत. स्वरः सूक्ष्मश्चलोऽनिल: । वाग्भट-सूत्रस्थान ] खर म्हणजे खडबडित. (भा. इ. १८३४)
खरडपट्टी [ खर्दपट्टिका = खरडपट्टी] खरडपट्टी म्ह. कठोर बोलणें. मूळ अर्थ दंश करून कातडीचा टवका काढणें.
खरपूस १ [ खलपू: (खलं पुनाति) = खरपूस समाचार, मार (असा मार कीं मारलेल्याचा दुष्टपणा नाहींसा होईल) ]
-२ [खलपूः (खले पूयते) = खरपूस धिरडें (खलांत म्हणजे तव्यांत पूर्ण भाजलेलें धिरडें)]
खरपें [ खरत्व roughness, harshness = खरपें ] रूक्षपणा.
खरांटणें [खरांटा den मराठी ] to become like a खराटा, a tree etc.
खराटी [क्षरयष्टि = खराटी (स्त्री.) खराटा (पु.) ] स्त्रीलिंगापासून पुल्लिंग निघालें आहे. (भा. इ. १८३४)
खराब [खर्बः mutilated= खराब] dwarfed, low. तो खराब माणूस आहे, he is a cripple, low fellow.
खरारा [ खरालिक: razor = खरारा]
खरूज १ [ खर्जू = खरूज ] (भा. इ. १८३४)
-२ [ खरु (द्वाड माणूस, मूर्ख) + ज = खरूज ] ही खरूज कोठून आणलीस ? म्हणजे हा मूर्ख किंवा द्वाड माणूस कोठून आणलास ? (भा. इ. १८३६ )
खरखटें [ कुर्कुट: (केरकचरा) = खुर्खुटें = खर्खटें. उ = अ ] एकदां खर्खटें काढून टाका म्ह० केरकचरा काढून टाका.
खर्डा [ खर्दः = खर्डा. खर्द् हिंसायां ] खर्डा म्ह० हिंस्त्र वाघ.
खल [खल्ल: = खल (दगडाचा ) ]
खलक १ [खलुंक: (जैनग्रंथ) = खलक खळक, खलुंकः अविनीतः ]
-२ [ खल एव खलक: खल = कर्णेजपेऽधमे (हेमचंद्र १२०८ ) ]
खलक म्ह० फितुरी, असा शब्द व अर्थ मराठ्यांच्या इतिहासाच्या आठव्या खंडांतील २८ व्या लेखांत आला आहे. हा २८ वा लेख शिवाजीचा आहे. (ग्रंथमाला)