Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

कुकडा [ कौक्कुटिक = कुकडा] कुकडा म्ह० ढोंगी, लुच्चा.

कुकरा [ कुकर: = कुकरा] आखूड हाताचा मनुष्य.

कुकवाकू [ कृकवाकु = कुकवाकू. कृकवाकु म्ह० मोर ] गांडींत नाहीं गू आणि कावळा करतो कुकवाकू म्हणजे अंगांत तें सामर्थ्य नसतांना कावळा मोराचा शब्द जो कृकवाकू तो काढूं पहातो. (भा. इ. १८३२ )

कुचकट [ कुचक: = कुचक + ट = कुचकट. कुचु, खुजु स्तेयकरणे ] कुचकट म्ह० चोर.

कुचका १ [ कुच् कौटिल्ये. कुचक: = कुचका ]

-२ [कुशिक: = कुचिका, कुचका ] मुली द्वाड मुलांना कुचका वगैरे शब्द लावतात. येथें कुचका म्ह० चकणा असा अर्थ असतो. (भा. इ. १८३५)

कुचकुच [ कुच् शब्दे ( तक्रारीचा अस्पष्ट शब्द ) द्विरुक्तीनें कुचकुच ] अस्पष्ट रीतीनें तत्कार करणें.

कुचर [ कुचर ( वाईट चालीचा) = कुचर ] (भा. इ. १८३३)

कुचरट [ कूचिदर्थिन् = कुचरट ] having errands every where म्हणजे कोठें च कांहीं काम न करणारा.

कुचराई [ कुसृति ] (कुसूर पहा)

कुंचा [ कूर्च: = कुंचा] डोक्याच्या केसाचा हजामानें काढलेला.

कुचाळी [ कुत्स् १० अवक्षेपणे. कुत्सालुता = कुचाळी]

कुचिद्य [ कुश्चितं:= कुचिद्य ] निवृत्तिराम-१५ वा समास ओंवी २४

(गल्ली) कुच्ची [कुत्सित = कुच्चिअ = कुच्ची ] गल्ली कुच्ची = कुत्सित, घाणेरडी गल्ली. (भा. इ. १८३२)

कुटाळ [ कूट = खोटा; आळ हा प्रत्यय लागून कूटाळ. त्याचें र्‍हस्व उकार होऊन कुटाळ ] (भा. इ. १८३२ )

कुंठणें [ कुंठनं] ( धातुकोश-कुंठ पहा)

कुठून [ कुठ्ण कुठ्ण पहा ]

कुठ्ण कुठ्ण [ कृत्स्न = कुठ्दण ] कुठ्ण कुठ्ण प्रश्न विचारतो = कृत्स्नकृत्स्नप्रश्नान् अनुयंक्ते. (भा. इ. १८३४ )

कुंड (डा-डी ) [ कुंडक = कुंडा. कुंडिका = कुंडी ] घटिका कृतिमुपमृद्य कुंडिकाः क्रियंते । ( पतंजलि-महाभाष्य- Vol. I. P.७. Kielhorn) (भा. इ. १८३३)