Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

शेव १ [ सेवि (बोर) = शेव] शेव म्हणजे फळफळावळ.

-२ [ सेवं (शेवफळ) = शेव ]

शेवगा १ [शिग्व्रा = शेगवा, शेवगा (गर्दे-वाग्भट ) ] ( भा. इ. १८३४)

-२ [ शिग्रुकः = शेउगा = शेवगा ]

शेवट [ छंबट् ! ( नाशदर्शक अव्यय) = शेंवट] शेंवट ! तो मेला = छंबट् स मृतः. महाभारत ३-१८-२६ त हा शब्द येतो.

शेंबट [ सीमन्= शिवँ = शींव = शींवट (अतिशयदर्शक) = शेवट ] ( ग्रंथमाला)

शेवती [ शतपत्री = शेवती ]

शेवा [ शेव् सेवने = शेवा, सेवा ] म्हणजे सेवा शब्दाप्रमाणें शेवा शब्द हि शुद्ध संस्कृत आहे. (भा. इ.१८३३) शेळ [ शीश् ( शब्द: ) ] ( शीट पहा)

शेळपट [ चिल्लपट्टः = शेळपट ] चिल्ल म्हणजे सैल व पट्ट म्हणजे वस्त्र आहे ज्याचें तो. शेळपट म्हणजे अजागळ, चापून-चोपून धोतर, वस्त्रें न नेसणारा.

शेळी [ छेलिका = शेळी. छगली = शअळी = शेळी ] छलिका हा शेळी ह्या मराठी प्राकृत शब्दावरून बनविलेला संस्कृत शब्द आहे; मूळ शब्द छागः (भा. इ. १८३५)

शोकी [ सौखिक: = शोकी ] सुखाभिलाषी.

शोफा [ शतपुष्पा = शअउप्फा = शोफा ]

शौनिक [ शाकुनिक: = शौनिक:] शौनिक हा संस्कृत शब्द शाकुनिक या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. शकुनान् हंति शाकुनिक: ( ४-४-३५ )

श्यानी - करूनश्यानी, जेऊनश्यानी, घेऊनश्यानी इ० धातुसाधित अव्ययांतलें. हा श्यानी प्रत्यय वैदिक भाषेंत तुरळक आहे. हा पाणिनीय संस्कृत भाषेंत नाहीं व कोणत्याही प्राकृत भाषांत नाहीं. वैदिक भाषेंत सन् ला इ प्रत्यय लागून सनि असें सप्तम्यंत रूप धातूना जेडून कांहीं थोडीं धातुसाधित अव्ययें बनतात. जसें-गृणषिणि, तरीषणि, नेषणि इ. ह्या सनि-षणि प्रत्ययापासून मराठी श्यानि प्रत्यय आला आहे. (राधामाधव विलासचंपू पृ. १८५)

श्रद्धा १ [ श्रद्धा ( शौच ) = श्रद्धा ] शौच, परसाकडेस.

-२ शुधा ( पादणे ) = शर्धा, श्रध्धा ] पादपें. भिक्षुक लोक सोंवळ्यांत असतांना हा शब्द योजतात.
श्रध्धेला गेला म्हणजे अपानद्वारा वायू सोडण्या करितां गेला. ( भा. इ. १८३७ )

श्रद्धासु [ श्रत् + धा-धास् ( सिच्) श्रद्धासुः = श्रद्धासु ] faithful.

श्रध्धा [ शर्धा = श्रध्धा ] श्रध्धेला जातो म्हणजे वायू सरण्याला जातो.
श्रु-श्रवति = सराव. अक्षुणोत् = सुनणें, सुनावणें ( भा. इ. १८३४)