Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
शिपतर [ शिफास्तर = शिपतर ] शिफास्तर म्हणजे लवचीक फांद्यांचें टोपलें. शिफा तरुप्ररोहः
शिबें [ सिध्म = सव्व = शिबें ] (भा. इ. १८३४ )
शिमगा [ शृंगार = शिमगाअ = शिमगा ] शृंगार म्हणजे काम, कंदर्प. शिमगा म्हणजे कंदर्पक्रीडा, लक्षणेनें कंदर्पक्रीडेचा वार्षिक दिवस म्हणजे शिमगा. शिमगा करा = शृंगारं कुरु. शृंगार म्हणजे कंदर्पक्रीडेचीं वस्त्रादिक भूषणें. ( भा. इ. १८३३)
शिरकणें [ स्त्रेकृ गतौ । धातुपाठ, भ्वादिः । स्नेक्=शिरक् ] तो इकडे शिरकत नाहीं म्हणजे गमन करीत नाहीं. शिरणें धातू, निराळा. ( भा. इ. १८३४)
शिरचेंच्या [ छिद् ७ द्वैधीकरणे. शीर्पछेद्यः = शिरचेंच्या ] ( धा. सा. श. )
शिरड [श्रेधी, श्रेढी = शिरड ] मडक्यांची शिरड म्हणजे एकावर एक ओळ, रांग, उतरंड.
शिरणें [ श्रि = शिर ( शिरणें ). श्रि म्हणजे जाणें ] तो घरांत शिरला = सः गृहं श्रितः ( भा. इ. १८३६ )
शिरशिरी [ चिरि ५ हिंसायाम्] ( धातुकोश-शिर १ पहा)
शिरा १ [ शै, श्रै, श्रा, श्री १ पाके ] (शिज ५ पहा )
-२ [ श्रायः = शिरा ] पक्वान्न, पाक.
-३ [ श्रा = शिरा ] कोणत्याही पदार्थाचा पाक. (भा. इ. १८३३)
शिराणी [ श्रि प्राप्तौ. श्रयणी = शिरअणी = शिराणी ] प्राप्ति, आश्रय. ( भा. इ. १८३३)
शिरावेध [ सिराव्यधः = शिरावेध ] (भा. इ. १८३७)
शिराळें [ शिरालं = शिराळें. शिरालं शिरासंपन्नं फलं ] फलविशेष.
शिरें १ [ क्षीरं (juice ) = सिरें, शिरें ] juice for ink.
-२ [ श्रृतं = शिरें (शाई करण्याचें ) ]
-३ [ श्रीञ् पाके. श्रीः = शिरा (गव्हाचा )
श्री = शिरें (पकवलेला शाईचा रस )
शिलक [ शिल (कापणीनंतर शेतांत राहिलेले दाणे)
अकच् = शिलक, शिल्लक ] remaining portion leavings.
शिल्लक [ शिल (कापणीनंतर शेतांत राहिलेलें धान्य) = शिल्लक ] (शिलक पहा)