Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
शिवण [ श्रीपर्णी = शिवण ] वनस्पति.
शिवण गंभारी [श्रीपर्णी = शिवणी = शिवण (वनस्पति)] ( भा. इ. १८३७ )
शिवणें, उसवणें [सो व उत्सो ह्या धातूंपासून शिवणें व उसवणें निघाले आहेत ] ( ग्रंथमाला)
शिवर ( रा-री-रें ) [ शपिरः = शविरा = शिवरा ] शिव्या देणारा, तोंडाळ. (भा. इ. १८३४)
शिवाशवणें [ सिमसिमाय = शिवशिव ( णें ) ] ( भा. इ. १८३३)
शिंवशिंवणें [ चिमिचिमायते = शिंवशिंवते] ( भा. इ. १८३४)
शिवळ [ शीश् (शब्द: ) ] (शीट पहा)
शिवी [ छिका = शिवी ]
शिसव, शिसू [ शिंशपा = शिसवा = शिसव = शिशवी] ( भा. इ. १८३४)
शिसवी [ शिंशपा = शिसवी = सिसवी (वृक्ष ) ]
शिसार [ शीर्षार्शः = शिसार ] headache.
शिसू १ [ शिंशपा ] (शिसव पहा)
-२ [ सुशवी = शिसवी, शिसव, शिसू ( tree ) ]
शिळक [ श्लिष् १ दाहे ] ( शिळख पहा)
शिळख [ श्लिष् १ दाहे. श्लिप्=शिळख, शिळक, शिणक ] भाजून वेदना होतात तशा वेदना. ( धा. सा. श. )
शिळें [ सीतल = सीअळ = सीळ = शिळ (ळा-ळी-ळे) ] (भा. इ. १८३३)
शी ( प्रत्यय ) - सा-सें-
[ भग्नदेशीय = भंगलीशी, भंगलासा, भंगलेंसें.
नग्नदेशीय = नागवासा, नागवीशी, नागवेंसें.
पुत्रकदेशीय = पोरगासा, पोरगीशी, पोरगेसें.
वृद्धदेशीय = वुड्ढासा, बुढ्ढीशी, बुढ्ढेंसें ]
शीट १ [ शीश् (शब्द: ) = शीट, शीळ, शेळ, शिवळ ] शीश् असा शब्द म्हणजे शीळ.
-२ [ शिंघ् १ आघ्राणे. शिक्थ] पांखरांचा गू. ( धातुकोश-शिट १ पहा)
शीण १ [ स्विन्न = सिण्ण = सीण = शीण ] सीण असा उच्चार कित्येक करतात. ( भा. इ. १८३२ )
-२ [ शीर्ण = शीण ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ६७)
शीत [ सिवध = सिथ्ध = शित्त = शीत ] (ग्रंथमाला)
शीर १ [ शिरस = शीर (नपुं.) ]
-२ [ शिरा = शीर ] (स. मं.) म. धा. २५