Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
० शीर, ० सर [ शील = शीर = सीर = सर.
प्रमाणशीलं = प्रमाणशीर, प्रमाणसर.
रीतिशीलं = रीतशीर, रीतसर ]
शीळ [ शीश् (शब्द: ) ] whistle ( शीट १ पहा)
शुक् [ शुक् to move गतौ to gate away = शुक् ] get away, to a cat
शुक्क्, पुक्क् [ पुक्क् = शुक्क् ] पुक्क् जाणें असा संस्कृत धातू आहे. मांजराला शुक्क् किंवा षुक्क् म्हणून महाराष्ट्रांत हांकलतात. ज्या वेळेस संस्कृत भाषा बोलण्यांत होती म्हणजे पाणिनीच्या वेळेस मांजराला जा, नीघ, असें सांगावयाचें म्हणजे षुक्कस्व असें रूप योजीत. त्यावरून मराठींत आज्ञार्थोंचें द्वितीयेचें एकवचन षुक्क असें परंपरमें आलें आहे. ह्या मराठींत षुक्क रूपावरून पाणिनीय षुक्क, ष्वक्क, ष्वस्क् स्वस्क् हे धातू रोजच्या बोलण्यांतले होते, केवळ पाणिनिकल्पित नव्हते, हें उघड होतें. इतकेंच नव्हे तर सिद्ध होतें. मराठी व्युत्पत्तीवरून पाणिनीय धातुपाठावर प्रकाश हा असा पडतो. (भा. इ. १८३५)
शुंभ [ शोभार्थे ] निव्वळ शोभेचा जो माणूस तो शृंभ. (ग्रंथमाला)
शेक [ सेक = शेक ] अग्निसेक: - आगीचा शेक = अग्नीयशेक ( भा. इ. १८३४)
शेखी [ शेक्ष्यं skill, learning = शेखी ] प्रौढी.
शेगटवणी [ शिग्रुकपानीयं = शेगटवणी ] शेगटाच्या शेंगाचा काढा.
शेगडी [ शकटी = शगडी = शेगडी ] अंगारशकटी = आगीची शेगडी ( भा. इ. १८३६)
शेगवा [ शिग्व्रा] (शेवगा पहा)
शेज [ शय्या = शेज] ओळी, अन्योन्यसंनिकर्ष.
या पदानां परान्योन्यं मैत्री शय्येति कथ्यते ।
(प्रतापरुद्रीययं - काव्यप्रकरणम्)
पुस्तकें एका शेजेनें लावणें म्हणजे ओळीनें एकमेकांना चिकटून ठेवणें. (भा. इ. १८३४)
शेजार १ [ सज्जगृह = सज्जार = सेजार = शेजार ] शेजार म्हणजे जवळचें घर. (भा. इ. १८३६)
-२ [ सज्जकार = सज्जार = सेजार = शेजार ] सज्जकार म्हणजे जवळीक, जवळ करणें. त्या पुस्तका शेजारीं हें पुस्तक्र ठेव = तस्य पुस्तकस्य सज्जकारे इदं स्थापय.
सज्ज चिकटणें, जवळ होणें. (भा. इ. १८३६)
-३ [ शय्यागृह = शेजार, सेजार] (भा. इ. १८३६)