Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सडक १ [ सरक going = सडक adverb
सडक चालला went on continuously
-२ [ सरकः a continuous road = सडक ]
-३ [ सध्र्यंच् = सडक ] तो सडक निघून गेला म्ह० नीट सरळ निघून गेला. सडक रस्ता = नीट सरळ रस्ता. शेवटीं नीट रस्त्याला सडक म्हणूं लागले. (धा. सा. श. )
सडा १ [ ( शडि संघाते ) शड: = सडा ]
-२ [ स्यदः = सडा ] shower, violent shower.
संडासः [ संदेशः ( जरद्रर्ता ) = संडास ] old pit for night-soil. अथर्ववेद-द्वितीयकांड ४३
सढळ १ [ शिथिर extended (दानार्थं प्रसारित) = सढळ ] देण्याला सढळ हात असणारा.
-२ [ श्रद्धावत् = सड्ढाल = सढळ = सढळ ] सढाळ असा उच्चार गांवढे लोक करतात. (भा. इ. १८३२)
सणा १ [ क्षण: = सण ]
-२ [ शणु ( अथर्ववेद ) = सण ] hemp.
सणई [ सानिका ] ( सनई पहा )
सणंग १ [ सनंगु ( a kind of leather ) = सणंग. ( सनंगुः, चसः, हविस, सक्तुः ) उगवादिभ्यो यत् (५-१-४ पाणिनि ) उकारान्त शब्दांत हा शब्द पाणिनीयांत आहे ] सणंग म्हणजे मराठींत तलम उत्तम कमावलेल्या कातड्यासारखें कापड.
-२ [ सनंगु a kind of leather garment = सणंग (५-१-२ पाणिनि ] सणंग म्हणजे मराठींत कापडविक्ये कापडाच्या, धोत्राच्या किंवा लुगड्याच्या तुकड्याला म्हणतात. अत्यन्त पुरातन कालीं आर्य कातड्याचीं वस्त्रें पांघरीत, नेसत, असें दिसतें.
सणणणण [ सनश्वन्] (सणसणित पहा)
सणवई [ क्षणवृत्तिः = सणवई] सणवई म्हणजे सणाच्या दिवसाचें वाढणें.
सणसणित १ [ सनश्वन् = सणसणित, सणणणण, सणाणणें, खणखणित ]
-२ [ सनीपण (सन् to gain) = सणसणणें, सणसणून बोलणें ]
-३ [ स्वनस्वनितं = सणसणित. स्वन् १ शब्दे ] मोठ्या आवाजाचें. ( धातुकोश-सणसण २ पहा)
सणाणणें [ सनश्वन्] (सणसणित १ पहा)
सणा वारीं [ क्षणस्य वारे = सणा वारी ] सणा ही षष्ठी आहे.