Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

इखीविखी [ ईक्ष् १ दर्शने. ईक्षावीक्षा = इखीविखी ] हा शब्द जुन्या मराठी ग्रंथांत येतो. ( धा. सा. श. )

इंगा [ इंग् १ गतौ. इंगः = इंगा ] इंग: म्हणजे अभिनयानें हेतू कळविणें. शनीचा इंगा म्ह० शनीच्या येण्याचा हेतू. ( धा. सा. श. )

इचणें [एज् १ कम्पने = इचणें ] असा इचूं नको म्ह. कांपूं नको. (धा. सा. श. )

इछित [ ईप्सित = इछित; इष्ट = इष्ट] इष्ट आाणि इछित असे दोन्ही शब्द मराठींत आहेत व त्यांचे उगम भिन्नभिन्न आहत. ईप्सितं अभीप्सितं = इच्छिलेंबिछिलें (अ लोप व स्वार्थे ल) ( धा. सा. श. )

इच्छित [ ईप्सितं = इच्छित (प्राकृत)=इच्छित (मराठी) चंडस्य प्राकृतव्याकरणं P. १४ text, Hoerule

इजर १ [ इज्जर = इज्जर = इजर ] एका प्रकारचा वेत. (भा. इ. १८३६)

-२ [ हिज्जल: = इजर]

इजा [ ईज् कुत्सने. ईजा = इजा = विजा ] इजा म्ह० निंदा, शब्दानें दुखवणें, ( नंतर ) शरीरदु:ख. ( धा. सा. श.)

इतकुलीमितकुली [इतुक (ल स्वार्थे)= इतुकल (ला- ली-लें) इतुकल = इतकुल. मित ( क स्वार्थे व ल स्वार्थ ) = मितकल (ला-ली-लें) (इतुकलच्या अनुकरणानें) = मितुकल] मित म्ह० मोजकें, अल्प. इतुक म्ह० एवढ. इतकुलीमितकुली गोष्ट = एवढी लहान गोष्ट. पोरांच्या बालकथांत हे शब्द येतात. (भा. इ. १८३३)

इटीदांडू [ यष्टिदंड = इट्टिदंडु = इटदाँडू ] (भा. इ. १८३२)

इटेकरी [ यप्टिकर = इष्टिकर = इट्टिकर = इटीकर = इटेकर-री. ] (भा. इ. १८३२)

इतक ( का-की-कें ) [ इयत्तक ( वैदिक) = इतक ( का-की-कें) ] (भा. इ. १८३६)

इतिश्री [ विश्र (मृत्यु ) = इश्री = इतिश्री ] इतिश्री (म्हणजे समाप्ति) या शब्दाच्या धर्तीवर ति मध्यें घुसडली. ' विश्रे ? ' पासून निघालेली इतिश्री म्हणजे मृत्यू. इति + श्री म्हणजे समाप्ति. (भा. इ. १८३४)

इत्सा [ आदित्सा ( घेण्याची इछा ) = आइत्सा = इत्सा ] वस्तूची इत्सा = वस्तु मिळविण्याची इच्छा. इत्सा आणि इछा हे मराठींत दोन भिन्न शब्द आहेत. ( भा. इ. १८३४ )

इथंतथं [ आयथातथ्यं = इथंतथं ]
इथंतथं करूं नको म्ह० खोटें करूं नको.