Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
आरोगणें [ आरोचनं ] to be agreeable रुचूं लागणें. (ज्ञा. अ. ९ पृ. १४५)
आरोळी [ रु २ शब्दे. आरावालिः = आरौळी = आरोळी] लांब हाक. ( धा. सा. श. )
आर्ये ! [ शाकटायनस्तु आर्य इति प्रतिबंधे (अष्टाध्यायीतत्त्वबोधिनी-अव्ययप्रकरणम्) ] आर्ये, अर्ये हे निपात मराठींत प्रतिबंधार्थक आहेत. अर्ये ! अथवा अरे ! गप्प बैस. किंवा नुसतें अरे ! आर्ये ! (भा. इ. १८३४)
आलमाल [ आळुमाळु पहा]
आलाडपालाड [ आरात्तातपरात्तात् - आलाडपालाड, अल्याडपल्याड ] जवळून आणि दुरून. (भा. इ. १८३४) आवई [ आहवय (currency, news) = आवई ] आवई उठली म्ह० लोकप्रवाद उठला.
आवकजावक [ आयक + व्ययक = आवकजावक credit and debit. य = व; व्य = ज. आय income, व्यय expenditure ] आवक जावक म्ह. income व expenditure.
आळणी [ अव् १ वृद्धौ. अवनिः = आवणी = धान्यवृद्धि ] ( धा. सा. शब्द )
आवंतणें [आमंत्रणं = आवंतणें] (भा. इ. १८३४)
आवति, आवती [ आहुति ] (आउति पहा)
आवत्या [ आहूतय: = आवत्या. हु अदने ] आवत्या म्ह० लहान घास.
आवत्याजिवत्या [आहूतयः=आवल्या] आवत्याजिवत्यांची महाराष्ट्रांत चातुर्मासांत पूजा करतात.
आंवदा [ आइंदह् (फा.) ] ( यंदा पहा)
आवरण [ आपारणम् ] (धातुकोश-आवर १ पहा)
आवर्जून [ वृज् १० वर्जने. आवर्जिताः = संमानिताः एते जामातरः परमगौरवेण आवर्जिताः स्वानि गृहाणि न गच्छंति ॥ पंचतंत्र-चतुर्थतंत्र-कथा ६ ] आवर्जून सांगणें म्ह० सन्मान करून सांगणें, मुद्दाम आग्रह करून सांगणें इ. इ. इ. ( धा. सा. श. )
आवल [ आमूलम्] (आवलात पहा)
आवलात [ आमूलम् = आवल, आव्वल. आमूलात् = आवलात. आमूले = आवलीं ] हें आवल, आवलात, आवलीं खोटें आहे म्हणजे मूळांत खोटें आहे.
आवलीं [ आमूले ] ( आवलात पहा)
आवशीं [ आवसति: night = आवशीं, औशीं at night ]