Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ई
ईट घे, मार [ यष्टिग्राहं हंति इटघे, हणतो ] इटघे हें अव्यय आहे.
ईर - हा मराठींतला शब्द वेदकालीन आहे. ह्याचा संबंध कंड्वादिकांतील इरस् ( इरस्यति ) इर्ष्यायां ह्या धातूशीं येतो. इरेस पडला = इर्ष्येस पडला. प्यादा इरेंत पडला = प्यादा इर्ष्येंत पडला. ( भा. इ. १८३२ )
उ
उकडणें [उत्कथनं = उक्कढणँ = उकडणें ] (भा. इ. १८३७)
उकलणें [उत्कलनं = उकलणें ] (भा. इ. १८३७)
उकलीव, उकलींव [ कल् १० क्षेपे. उत्कलिम = उकलीव, उकलींव ( उकललेलें ) ] ( धा. सा. श.)
उकळणें [ अवक्षल् = ओखळ = उखळ = उकळणें ] अवक्षल् म्ह० बडवून धुणें. (भा. इ. १८३६)
उकळी [उत्कलिका = उक्कळिआ = उकळी ] उत्कलिका म्ह० उत्कंठा. (भा. इ. १८३७)
उकळींव १ [उत्कथिम = उकळींव = (उकळलेलें) ]
-२ [ क्कथ् १ निष्पाके. उत्कथिम = उकळींव (उकळलेलें)
क्कथ = कट (वरणाचा कट)
क्काथपानीयं = कटवणी
क्काथ:निक्काथ = काढानिकाढा ] ( धा. सा. श. )
उकिडव ( वा-वी-वें ) १ [ उत्कुटुक: = उक्कुड़आ = उकुडवा = उकिडवा ] उत्कुटुकासन नांवाचें एक आसन आहे ( जैनग्रंथ ). पादाभ्यां अवस्थितः उत्कुटुकः
-२ [ उत्कटक = उक्कडअ = उकडव = उकिडव ( वा-वी-वें ). नासीतोत्कटकस्थितः । वाग्भट-अष्टांगहृदयसूत्रस्थान - द्वितीयाध्याय श्लोक ३६. उत्कटिक = उक्कडिअ = उकिडव. डवरील इ क वर नेली. ] (भा. इ. १८३४)
उकिडवा [ कुट् ६ कौटिल्ये. उत्कुटक = उकिडवा उ = इ ) ] ( घा. सा. श. )
उकिरडा - ह्या शब्दावरून असें दिसतें कीं दारिल व केशव हे दोघे हि secondary प्राकृत म्हणजे प्राकृतिक, मराठी वगैरे भाषा बोलणारे होते.
कौशिक सूत्र २८।२
दारिल:- अवकर = उकुरटिकातृणानि
केशवः- उकरिडिका मार्जनिकातृणं
अर्थात् केशव हा महाराष्ट्रब्राह्मण आहे. ( भा. इ. १८३२ )
उक्ते [ अवक्रयः = मोल ( अमर, द्वितीयकांड: ७९ वैश्यवर्गः ) अवक्रीत = ओकत = ओक्त = उक्त ] साक्षात् मोल देऊन आयतें तयार केलेलें द्रव्य. (भा. इ. १८३२)