Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

-२ [ अन्यत् ] ( न पहा )

-३ [अणि boundary, limit= आणि = (limit) लयनि resting place = लाणि = (resting place) ]

उ०- ह्मणोनि समर्थु जो एथें । आणि लाणि सर्वज्ञते । तेणें सविशेष कर्मातें । त्यजावें ना ॥ ज्ञा. ३-१६६.

-४ [ अन् ]

-५ [अन्या = आणिआ = आणि ] ( ज्ञा. अ. ९ )

आणिक [ अन्यकत्] ( ज्ञा. अ. ९ पृ. ३७)

आणीक १ सेतुबंध काव्याच्या नवव्या आश्वासकाच्या ८६ व्या पद्याच्या टिकेंत रामसेतुप्रदीपकार येणेंप्रमाणें लिहितो:-
” आणिक्क तिर्यगर्थे देशी ”

मराठींत हि आणीक ह्या शब्दाचा प्रयोग तिरकें, वाकडें, कांहींच्या बाहीं, ह्या अर्थी करतात; उदाहरणार्थ,
त्याचें तर पहाणें आणिकच आह.

[ आणिक्क = आणीक, आणिक ] (भा. इ. १८३२)

-२ [ अन्यत् + एक = आण+एक = आणेक= आणीक= आणिकु = आणीकु (ज्ञानेश्वरी) = आणखी ] (ग्रंथमाला)

आणीकु [ अन्यत् + एक ] (आणीक २ पहा)

आणीबाणी [ आ + अन् : नाम आनिः breathing in व्या + अन् = नाम वाणिः breathing out आणिबाणिः = आणीबाणी in - breath and out-breath ] सर्वव्यापी प्रसंग.

आण्णाव [अंतर्नाम ] (आडनांव पहा)

आत [ आप्तका ] (आत्या पहा)

आंतकुडा [अंत:कुटिल = आंतकुडा] (भा. इ. १८३६)

आंतडे [अंत्र (सं.) = आंतडें ] (स. मं.)

आतबट्टा [ आत्तवट: = आतबट्टा stripped of, destitute of बट्टा the price of exchange. आत्त stripped off, destitute. आत्तलक्ष्मीः stripped of wealth. आंत in ह्या क्रियाविशेषणाशीं संबंध नाहीं. ]

आंतबट्टा [ भ्रश् ४ अधःपतने. अंतर्भ्रंशः ( अंतर्भ्रष्टः ) = आंतबट्टा ] आंतून नाश. ( धा. सा. श. )

आता ? १. [ तो आला नाहीं, आता ? आदह (अव्यय-प्रकरणम्, कुत्सने ) ] (भा. इ. १८३४)