Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
आधव्याचा [ आदिद्यवीयः = आधव्याचा ] आधव्याचा माणूस म्ह० कालचा माणूस, आदल्या दिवसाचा माणूस.
आंधळी कोशिंबीर - ” अंधा कौशांबी ” नांवाचा खेळ कौशांबी नामक शहरांत खेळत. कौशांबी शब्दाला र जोडला आहे. असा र लंडनांतील कनिष्ट लोक शब्दाच्या शेवटीं जोडतात. कोशिंबीर हा वनस्पतीचा वाचक शब्द हि सुचला.
१ इटीदांडू, २ लगोर्या, ३ मलखांब, ४ जोडी, ५ चाक, ६ गदगाफरी, ७ दंड, ८ नमस्कार, ९ उठाबशा, १० घोडी, ११ पाळणा, १२ झोंबी, १३ जेठी, १४ कुरघोडी, १५ आट्यापाट्या, १६ आंधळी कोशिंबीर, १७ हुतूतू, १८ हमामा, १९ झिम्मा, २० फुगडी, २१ कोंबडा, २२ गोट्या, २३ गल, २४ सागरगोटे, २५ टिपरी, २६ फांसा, २७ सोकटी किंवा सोंगटी, २८ चिंचोके, २९ खडे, ३० कानीं खडा, ३१ वाघमेंढ्या, ३२ टाळी, ३३ लोण वगैरे शेंकडों शब्द प्राकृतांतून मराठींत आले आहेत. (भा. इ. १८३२)
आंधळी कोशिंबीर (खेळ) [ आंधिका (खेळ) + (स्वार्थे ल) = आंधळी कोशिंबीर] (भा. इ. १८३६)
आधीं [ आदिची सप्तमी आदिँ, आदीँ; (याचा कठोर उच्चार आधीं. आदीँ शब्द ज्ञानेश्वरींत येती. ] (स. मं.)
आनाठाईं [ अन्यस्मिन् स्थास्नि = आना (सप्तमी ) ठाई ( सप्तमी ) (भा. इ. १८३६)
आपटणें [ आपट् - फोडणें (चुरादि) आपटनं = आपटणें, हापटणें. ] (भा. इ. १८३३) आपटशील - बिपटशील [ आपतविपत् = आपटबिपट] (भा. इ. १८३४)
आपरूप [ आपर्तुक (अप + ऋतु = अपर्तु) = आपरुक = आपरूप. क-स्थाने अज्ञानेन प: ] आपरूप म्हणजे विलक्षण. हें फळ या दिवसांत आपरूप आहे म्ह० आपर्तुक आहे. (भा. इ. १८३४)
आपलपोट्या [पुप् ४ पुष्टौ. आत्मपुष्ट = आपलपोट्या ] ( धा. सा. श. )
आपसुक-का [ अम् शुकं (अम् शैघर्ये , शुकं शैघर्ये)= आमसुक = आपसुक ( शीघ्र निपात ) ] आपसुक म्हणजे अति शीघ्र. आपसुक या सर्वनामाहून निराळा. (भा. इ. १८३४)
आपसुक, आपसुका [ आत्मसुखेन = आपसुक. आत्मसुखात् = आपसुका ]
आपा [ आत्मा = अप्पा = आपा (मुख्य जीव ) ] ( स. मं.)