Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
आडमार्ग १ [मृग् १० अन्वेषणे. अर्धमार्गः= आडमार्ग ] ( धा. सा. श. )
-२ [अंतर्मार्ग = आडमार्ग ] (भा. इ. १८३३)
आडमुठ [ अर्धमुष्टि = आडमुठ, आडमुठ्या (मुष्टिक) ] (भा. इ. १८३३)
आडमूठ १ [ मुह् ४ वैचित्ये. अर्धमूढः = अडमूढ = आडमूठ ] ( धा. सा. श.)
-२ [अनेडमूक = अडमूठ (क स्थाने ड) ] मूळ अनेडमूक म्ह० बहिरा असून मुका तो. नंतर अडाणी असा अर्थ पडला. (भा. इ. १८३६)
आडरात [ अर्धरात्र = आडरात ] (भा. इ. १८३३)
आडवंगी [अन्तरंगता interiorness, private intertainment = आडवंगी] गुप्त स्वीकार.
उ० वांचौनि आपुलेया काजा लागि । प्राणिजाताचां हित भागीं । संकल्पाची ही आडवंगी । न करणें जें । ज्ञा. १६-२०१
आडवस्त्र [ अर्धवस्त्र किंवा अंतर्वत्र = आडवस्त्र ] (भा. इ. १८३३)
आडवा [ अर्वांच्= आडवा-वी-वें ] hitherwards.
आडवाट [अंतर्वांट: = आँडवाट = आडवाट] (भा. इ. १८३३)
आंडिल ( बैल ) [ अंडीर = आंडील, आंडिल ] (भा. इ. १८३६)
आंडील (बैल) [आंडीर = आंडील ]
आडुळसा ( वनस्पति) [आटरूषक = आडळूसअ = अडुळसा ] ( भा. इ. १८३४)
आढी [ धि ६ धारणे. आधि ( ठेव ) = आढी (आंब्याची ) ] ( धा. सा. श. )
आणखी [ अन्यत् + एक ] (आणीक २ पहा)
आण ने [ आनयनं नयनं = आणने ]
आणा १ [ (कार्ष ) आपणक = आअणअ = आणा ] (भा. इ. १८३२ )
-२ [ अंकनक = अँअणअ = आणा ] (भा. इ. १८३२)
आणि - आणू - आन् - न - नि १
मराठींत कित्येक वक्ते असे प्रयोग करितात:-
(१) अश्या प्रकारची व्यवस्था आणि सरकारनें केली.
(२) तो आणि तसा वागेल, हें संभवत नाहीं.
(३) ब्राह्मण नि दारू पिईल, हें होणार नाहीं.
ह्या स्थलीं आणि, नि हे शब्द हन्त, हान या शब्दांचे अपभ्रंश आहेत.
(सं.) हन्त = (ज्ञानेश्वर) हान = हानि = आणि = णि = आन् = न = नि. हान शब्द ज्ञानेश्वर असाच येोजतोः-
उ०- म्हणौनि उदकीं हान रसु । कां पवनीं जो स्पर्श ॥
शशिसूर्यां जो प्रकाशु । तो मी चि जाण ॥ ज्ञा. अ. ७-३२ (भा. इ. १८३२)