Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
आचारी - आर्यवैद्यकांत आचारिकं म्ह० आरोग्यरक्षणार्थ अन्नपाण्याच्या ग्रहणाचे नियम ज्यांत सांगितले आहेत तें प्रकरण. ह्या प्रकरणांतील नियमाप्रमाणें जो अन्नादि पदार्थ तयार करण्याची कला उत्तम जाणतो तो आचारिकिक:; त्यापासून मराठी आचारी. आचारिन् या शब्दाशीं मराठी आचारी या शब्दाचा कांहीं एक संबंध नाहीं. (भा. इ. १८३७ )
आचुक [ आशकु (अकच्क) = आचकु ] आचुक म्हणजे ताबडतोब. ( भा. इ. १८३४)
आज [ अद्य = अज्ज = आज. कल्य = कल्ल = काल.
उदये = उदयां = उद्यां. परवासर = परवा ( सरचा लोप ) उद्यांच्या पुढल्या व कालच्या मागल्या दिवशीं. तृतीयवासर = तेरवा ( सरचा लोप) ] (ग्रंथमाला)
आजकालचें [आद्यकालीयं = आजकालचें ]
आजा [ आर्यक = अज्जअ = आजा ] (सरस्वती मंदिर )
आजोळ [ आर्यालय = आज्जालअ = आजोळ ] ( सरस्वती मंदिर)
आटणें [ अट्ट कमी होणें, शुष्क होणें, अट्टन = आटणँ = आटणें ] तळे आटतें = तडागः अट्टते. गाय अटते = गौः अट्टते. (भा. इ. १८३३)
आटपाट नगर [ अट् गमने व पट् गमने. आटपाट नगर= आलें गेलें नगर ] कोणतें तरी निनांवी रहदारीचें गांव म्ह० आटपाट नगर (ग्रंथमाला)
आटोका १ [ आ+तुज् (Vaidik) to bring near: आतोज:, आतोक: = आटोका, अटोका ] nearness, compass. माझ्या आटोक्यांत आले come within my proximity, compass.
-२ [ आ + टौक् to approach नाम आटौक: approach = आटोका approach.] तें माझ्या आटोक्यांत आहे it is within approach of my efforts
आठवडा हा शब्द अशिष्ट लोक अठावडा असा उच्चारतात व तोच उच्चार व्युत्पतिदृष्ट्या युक्त आहे. अष्टावर्त (स्वाथें क) = अठ्ठावडअ = अठावडा = आठवडा. आठव्या दिवशीं ज्या कालमानांत त्याच वाराची आवृत्ते अथवा आवर्त होतो तो आठवडा. दुधाचा आठवडा = दुग्धस्य अष्टदिवसावृत्तिः (भा. इ. १८३३)
आठवण [ अर्थ् १० याचने. अर्थापन = आठवण ] संकटीं देवाची आठवण करितो. ( धा. सा. श. )
आंठवण, आठवण [ आस्थापन = आठ्ठावण - आठवण, आंठवण ] (भा. इ. १८३२)