Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

तुणीची शिवण [तुन्नसेवनी] (तूण पहा)

तुथें [ तुत्थ (मोरचूत) = तुथें]

तुथ्थ [ तुष्ट = तुठ्ठ = तुथ्थ ] मंद. (भा. इ. १८३२ )

तुप [ तुप् हंसायां] मारलेल्या पशूची चर्बी हा तुप ह्या शब्दाचा मूलार्थ. नंतर, हिंसा बंद झाल्यावर दुधांतून घुसळून काढिलेल्या चर्बीला तुप म्हणूं लागले. दुधांतल्या चर्बीला घृत शब्द पूर्वी होता. (ग्रंथमाला)

तुफान [ तुफ् १ हिंसायां. तुफाना = तुफान ] तुफान बायको म्हणजे उन्मत्त स्त्री. तुफा = तोफ. तोफ आली = भांडखोर बाई आली. ( धा. सा. श. )

तुंबळ [ तुमुल = तुंबळ ]

तुम्हां [ युष्माकं = तुम्हँ = तुम्हहँ = तुम्हाँ ] ( ज्ञा- अ. ९ पृ. ३ )

तुरट [ तुवरिष्ट = तुअरिट्ट = तुरिट = तुरट. तुवर स्तु कषायः ( अमर ) ] (भा. इ. १८३४)

तुरटी [ तुवरिष्टा = तुरटी ] तुराटी [ तूर यष्टि = तुराटी ] (भा. इ. १८३४)

तुरी [ आढक्यां तुवरी वर्णा (हेमचंद्र-निघंटुशेष-संवत १२०८ ) ] (ग्रंथमाला)

तुरुत् [ तूर्तं ] ( तूर्त पहा)

तुलटी [तुलायष्टि ] (भा. इ. १८३४)

तुळई [ तुला (खांबावरचें आडवें लांकूड) = तुळी = तुळई ]

तुळतुळित [ तूल (कापूस) नामधातू = तुळतुळित] as soft and glossy as cotton. तुळतुळित केस.

तू कां दुखतोस ? [ कंड्वादि गणांत दुःख (दुःख्यति ) दु:खं अनुभवति धातु आहे ] तू, कां दुखतोस ? तू कां दु:ख अनुभवतोस ? (भा. इ. १८३२)

तूण [ तुन्नसेवनी = तुणीची शिवण (गर्दे-वाग्भट) तुन्न = तूण ] (भा. इ. १८३४)

तून [ अन्तितः] ( तें पहा)

तूप [ त्मूत (वैदिक) = तूप ] त्मूत म्हणजे चवीनें माखलेलें. (भा. इ. १८३४)

तूर्त [ तूर्त (जलद) = तूर्त (ताबडतोब, सध्यां), तुरुत ( त्वरेनें) ]

तूसधान्य [ तुच्छधान्यं = तूसधान्य स्यात्पुलाकस्तुच्छधान्ये (अमरकोश ) तुष = तूस ]