Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
तासडपट्टी १ [त्रस्+ पट्] (धातुकोश-तासड २ पहा)
-२ [ तृस (बोलणें ) व पट (बोलणें). तृस + पट = तस + पट = तासट + पट्टी = तासडपट्टी ] (ग्रंथमाला) तिउड [ त्रिवृत = तिउड, तेड ] (भा. इ. १८३४)
तिखें [ तीक्ष्ण = तिखें ( लोखंडाची जात ) ] (भा. इ. १८३४)
तिटकारा [ तिरस्कारः = तिटकारा. र = ट ] (भा. इ. १८३३, ३७)
तिडवा [ तिर्यञ्च् = तिडवा-वी-वे ] going across.
तिढा [ तिरस्= तिढह् = तिढा. र = ढ ] तिढा म्हणजे तिरका. ( भा. इ. १८३६)
तिढें [ तिरस् = तिढ ( ढा-ढी-ढें ) ] जसें पुरस् पासून पुढ़ें तसें तिरस्। पासून तिढें. तिढें बोलू नको म्हणजे वांकडें बोलूं नको. ( भा. इ. १८३६ )
तिनसांज [ त्रिसंध्या = तिनसांज ]
तिन्ही [ त्रीणि = तिनि = तिन्ही ( जोरदार व कठोर ) ] तिनि ' हें रूप जुन्नर येथील नंबर १४ च्या शिलालेखांत आलें आहे. तीन व हि यांचा संधि होऊन तिन्ही शब्द साधला अशी सर्वत्र समजूत आहे; पण ती चुकीची दिसते. (ग्रंथमाला)
तिंबणें, तिमणें [ तिम् आर्द्रीभावे ] ( ग्रंथमाला )
तिरक [ त्रिक = तिरक ] एक तिरक तीन, या वाक्यांत तिरक शब्द येतो. (ग्रंथमाला)
तिरकून [ तिर्यवक्कृत्य = तिरकून] तो तिरकून वागतो म्हणजे बाकून वागते. (भा. इ. १८३६)
तिरकें [ तिर्यक् = तिरक् = तिरकें-का-की ] (ग्रंथमाला)
तिरपें ( वाईट ) [ तृप्र = तिरप (पा-पी-पें ) ] तृप्र म्हणजे दुःख. (भा. इ. १८३४)
तिरमिर १ [ तैमिर्यं. तिमिर (अंधेरी ) = तिरमिर. र inserted sympathitically ) डोळ्यापुढें तिरमिर आली म्हणजे अंधेरी आली.
-२ [ तिमिर = तिरमिर ] ति पुढील र केवळ दुसर्या रच्या अनुषंगानें उच्चारलेला आहे. नेत्रयो: पुरतः तिमिरं यातं = डोळ्यापुढें तिरमिर आली. (भा. इ. १८३४)
-३ [ तैमिर्य = तिरमिर (darkening ). पहिला र आगंतुक. ] (भा. इ. १८३५) ना. को. १२