Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
तात्या १ [ तातगु = तातऊ = तातू. तातिकः = तातिआ = तात्या. तातगु म्हणजे धाकटा किंवा वडील चुलता. ( भा. इ. १८३३)
-२ [ तात = तात्या, ताता ( आर्य, श्रेष्ठ, प्रिय ), ताती ] (स. मं.)
तांदुळजा १ [ तंडुलीयः = तांदुळीजा = तांदुळजा ] एक भाजी. (भा. इ. १८३७)
-२ [ तंदुलीयः = तांदुळजा ] (भा. इ. १८३४)
तांदूळजा [ तंदुलीयः = तंदुलिज्जा = तांदूळजा ]
तानगाभी [ स्तन्यगर्भिणी = तानगाभी ] दूध देत असता गाभण होणारी गाय, बायकी. इ.
तानमान [ यथा तानं विना रागो यथा मानं विना नृप: (भामिनीविलास-जगन्नाथ ) ] तानमान पाहून बोलावें.
तानवट [ तानपट्ट = तानवटा, तानवट ] कोष्ट्याचा माग.
तनवड [ तालपत्रं = ताणवड = तानवड ] अलंकारविशेष. तान्हें १ [ स्तनंधयं = थानहअँ = थान्हें = तान्हें ] -२ [स्तन्य =थन्न = तन्ह=तान्हँ= तान्हें बाळ ] (ग्रंथमाला)
ताफा [ तल्प = तप्प = ताप = ताफ = ताफा ] ( भा. इ. १८३३)
तांबूस [ताम्रश = तांबूस ] किंचित् तांबडें.
ताम्हण [ ताम्रभांड = तामहाण = ताम्हाण = ताम्हण] ताम्हाण असें रूप जुन्या ग्रंथांत व अद्यापि अशिष्ट लोकांत सांपडतें. (भा. इ. १८३६)
तायघाट [तायु (वैदिक) = ताय. तायुः ( चोरः, स्तेनः )] चोरांचा घाट म्हणजे तायघाट.
तायित १ [ ताय् to protect तायित = तायित ] तायित is a talisman which protects from evil.
-२ [ ताय् to stretch ] तायित म्हणजे ताणलेला दोरा.
तारणे [त्रैः = तारणे ] देवः त्रायति = देव तारतो. (भा. इ. १८३६ )
तारा [ तारा = तारा] (स. मं.)
ताली [ तल्लिका = ताली ] किल्ली
ताव [ तापः = ताव. तप् ऐश्वर्ये] किती जरी ताव आणलास म्हणजे ऐश्वर्य आणलेंस.
तावून सुलाकून, तावून सुलाखून [तप्त्वा शूलाकृत्य ] तावून सुलाखून म्हणजे तापवून व सुळावर भाजून. (आवा ३ पहा)