Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
तां [ कृत्वा = करतां. एतत् कृत्वा हानि: भवति = हें करतां हानि होते. कृते = करतां. तस्य कृते = त्या करतां.
ताकतय [(स्त्री) तक्रत्वच् = ताकतय (स्त्री ) ] ताकाची साल म्हणजे तापवलेलें अति पातळ ताक.
ताकतोय [ तक्रतोयः = ताकतोय, ताकतय] (भा. इ. १८३४)
तागडी [ तर्कुयष्टि = तागडी ]
ताजी [ ताजिक: = ताजी (अरब घोडा ) ] अरबांना पूर्वी ताजिक ही संज्ञा असे व ते जे घोडे विकावयास आणित त्यांना ताजिक संस्कृतांत म्हणत.
ताटी १ [ त्वष्टिका = ताटी ] बांबूची ताटी.
-२ [ तंत्रिका ( अलंकृत मखर) = तांटी, ताटी.
तांटी [ तंत्रिका] (ताटी २ पहा)
ए १ ताठ तास्था (यङ्लुक्) । तास्थाति = ताठे ।
ताठ १ [ स्था-तास्था ]
-२ [ तस्यु stationary, immovable = ताठ ]
-३ [ दृढ = तठ्ठ= ताठ. दृढतर= तठ्ठअर ताठर=ताठर] (भा. इ. १८३२)
ताठर [दृढतर ] (ताठ ३ पहा)
ताठा [ तास्था ] ( धातुकोश ताठ १ पहा)
ताडा [ ताल span between end of thumb and end of middle fingure = ताड ] सीता चौदा ताल किंवा ताड उंच होती म्हणजे चौदा विती उंच होती. (वैजयंती कोश)
ताडकन्, ताडदिनि [ चटकर पहा ]
तांडा [ तंडक: (संघात, मेळा) = तांडा (समास) ] शब्दसमासाला तंडक म्हणतात. त्यावरून सादृश्यानें बैलांच्या व माणसांच्या एका प्रकारच्या समुदायाला तांडा म्हणतात.
ताडी [ ताली = ताडी ]
ताण [ तान (thread) = ताण ] (भा. इ. १८३५)
ताणा [ (प्र) तानक = ताणा ] वेलीचा शेवटला भाग.
तांतड [ तंति = तांत + ड = तांतड ] गाथासप्तशतींत ३-७३ त तंति शब्द आला आहे. ( भा. इ. १८३२)
तातल (ला-ली-लें ) [तप्त+ल=तातल (heated)] तातणें असें कियापद माडगांवकर धरतो तें चूक, तापणें या धातूची निष्टा जुनी तातल.
ताता, ताती, [ तात] (तात्या २ पहा)
तातू [ तातगु ] (तात्या १ पहा)