Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
तिळेल [ तिलतैलं = तिळैल = तिळेल ] स्नेहे तैलच् (५-२-२८ वार्तिक ) रोहिशतैलं = रोशेल, दीपोच्छिष्ट तैल = दीपोष्टेल. मोगरेल, उंडेल, खोबरेल, एरंडेल, इ. इ. इ.
ती १ [स्त्री = ती wife ] ती आली का? ह्या मराठी प्रश्नांत नवरा मराठींत बायकोला ती म्हणून संबोधितो.
-२ [स्त्री = थी (Hoernle, प्राकृतलक्षण P. ४८ text) = ती ] आमची ती कोठें गेली, तिला विचारा, इत्यादि वाक्यांत ती म्हणजे स्त्री या शब्दाचा अपभ्रंश आहे, सर्वनाम नाहीं.
तीट [त्विट्= तीट. त्विट् शोभा (अमर) ]
ती ती [ त्वं त्वं वस्तु = ती ती वस्तु ] ती ती म्हणजे निरनिराळी. त्व या शब्दाचा अर्थ निरनिराळा, भिन्न असा आहे.
तीरकमान [ तीरकमनं = तीरकमान ] तीरकामटा. तीर म्हणजे बाण व कमन म्हणजे बांबू.
तीस [ त्रिंशत् = तीस ] (विंशति पहा)
तीळ [ तिल = तीळ ] (स. मं.)
तुख्खारा [ तुषाराः तुखाराः Venereal disease very common amongst the तुख्खारs i. e. तुर्कs or Turks. ]
तुझ्या बापाच्यान् मी झवं - हा प्रयोग गांवढे हमेश करतात व हे अपशब्द आहेत अशी सामान्य समजूत आहे. परंतु पुष्कळ सामान्य समजुतींप्रमाणें ही हि समजूत चुकलेली आहे. वरील प्रयोगाची फोड येणेंप्रमाणें:-
देवस्य आज्ञां अहं यावत् त्वा ग्राहयिष्यामि = देवाच्यान मी झवं तुला घालीन = देवाची आण मी तुला घालीन यावत् = जावं = जवं = झवं.
तुला तुझ्या बापाची आज्ञा ऊर्फ आणि ऊर्फ शफथ मी घालीन, असा ह्या प्रयोगाचा अर्थ आहे. ह्या प्रयोगांत बाष्कळपणा बिलकुल नाहीं. संस्कृत यावतचा जो मराठी अपभ्रंश होतो त्याचा उच्चार दुसर्या एका मराठी क्रियापदासारखा होतो, त्यामुळें स्वरूपसाम्याच्या अपराधास्तव हा प्रयोग अपशब्दांत चुकीनें गणला गेला आहे. आग्रहानें व जोरानें बोलतांना महाराष्ट्रांतील ब्राह्मणादि सर्व लोक हा प्रयोग हरघडीस करतात. हा प्रयोग मूळचा अपशब्द असता तर स्त्रिया, मुलें व शिष्ट यांच्या समोर हा योजला गेला नसता. (भा. इ. १८३३)
तुटकें [ त्रुटत्कं = तुटकें ]
तुडवणें [ तुर्वणं = तुडवणें, तुर्व् हिंसार्थे ] तुडवणें म्हणजे नष्ट करणें, नाश करणें. ( भा. इ. १८३६)
तुणतुणणें [ तुण् कौटिल्ये] (ग्रंथमाला)