Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
तोंड [ तुंड = तोंड ] (स. मं.)
तोंडखीळ [ तुंडकीलिका = तोंडखीळ ]
तोडणें १ [तुड् फोडणें, फाडणें ] फोडणे. (भा. इ. १८३३)
-२ [ तुड्ड अवमाने. तुड्डन = तोडणें ] त्याला तोडूं नको = त्याचा अपमान करूं नको. ( भा. इ. १८३३)
तोंडली १ [ तुण्डिकेरी = तोंडएली = तोंडेली = तोंडली ]
-२ [ तुण्डिकावल्ली = तोंडली ] (भा. इ. १८३७)
तोडा [ तोडर = तोडअ = तोडा] पायांत घालावयाचा अलंकार विशेष. (भा. इ. १८३७ )
तोंडाळ [ तुंडिलः = तोंडाळ (मुखर ) ]
तोफ [ तुफा = तोफ. तुफ् हिंसायां ] तोफ आली म्हणजे क्रूर भांडखोर बाई आली. (तुफान पहा)
तोबरा [ ( खादाड ) तूबरः = तोबरा ]
तौसें [ त्रपुसं ] ( तवंसें पहा)
त्येणें [ त्य + अनेन ] ( एणें पहा)
त्यो [ सः = तो; स्यः = त्यो ] त्यत् या सर्वनामाची एकवचनी प्रथमा स्यः म्हणून देतात; परंतु त्यः असें हि रूप असावें. त्यः = त्यो. हा त्यो शब्द अशिष्ट लोक सध्यां योजतात. (भा. इ. १८३४)
त्रयस्थ [ तीरस्थ = तरस्थ = त्रयस्थ ]
त्रा - कित्येक जुन्या लेखांत गुर्जरत्रा असा शब्द येतो. ह्याचा अर्थ कित्येकांनीं गुर्जर लोकांनीं जिंकलेला किंवा वसाहत केलेला प्रांत असा केला आहे. त्याला सबळ आधार ते म्हणण्यासारखा कांहींच देत नाहींत. माझ्या मतें गुर्जरत्रा या शब्दाचा अर्थ गुर्जर लोकांतून किंवा गुर्जर लोकांत. गुर्जरत्रा हें नाम नाहीं, अव्यय आहे, किंवा क्रियाविशेषण आहे. अर्थात्, गुर्जरत्रा या अव्ययापासून गुजराथ, गुजरात, हें नाम निघणें अशक्य आहे. शिवाय या व्युत्पत्तीला दुसरी एक अडचण आहे. त्रा चें प्राकृत त्ता, ता होईल; त, थ होणार नाहीं. गुर्जरत्रासारखा च कुरुपंचालत्रा असा वेदभाषेत एक प्रयोग आढळतो; त्याचा अर्थ कुरू व पंचालांतून किंवा कुरू व पंचालांत असा होतो. तो च प्रकार गुर्जरत्रा या अव्ययाचा आहे. ( भा. इ. १८३५ )
त्रेधा [ त्रेधा = त्रेधा ] त्याची त्रेधा उडाली म्हणजे त्याला हें करूं कां तें करूं कां असें करूं, असे तीन प्रकार झाले. ( भा. इ. १८३७ )