Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
घास [ तृणं स्यादर्जुनं घासे ( हेमचंद्र-निघंटुशेष-संवत् १२०८ ] (ग्रंथमाला)
घासानिघास [ घासः निघासः = घासनिघास ]
घासाघीस १ [ (हन्) जिघांसा जिघृक्षा (ग्रह्) = जिघांसा + जीघीषा = घाँसाघीसा ] slaying and clasping.
-२ [ जिघांसा (हन् desi ) + जिघीषा (हि to throw) = घासाघीस ] killing and throwing
घासारी [घर्षणकारिन् घासारी ] रत्नें घासणारा.
घिवर [घृतपूर =घिअऊर = घिऊर = घिवर] घिवर किंवा घृतपूर हें एक पक्वान्न असे. घृतपूरो गुरुः वृष्यो ( शार्ङधरसंहिता )
घीवर [घृतपूर (वैजयंती कोश) = घिऊर = घिवर]
घुंघुर्डा [ घृंङ्घृंङ्कीटकः = घुंघुर्डा ]
घुटी [ घृष्टिः = घुटी ] साहाणेवर घासून केलेलें औषध.
घुरम्याव् [ गुर्+ मीम् ] (गुरम्यांव् पहा)
घुस्सा १ [ गुध्-घुत्सा = घुस्सा. गुध् to be angry) ]
-२ [ गुत्सः (रोषः) हेमचंद्र-उणादिगणाविवृत्तिः ] घुस्सा आला म्ह. रोष झाला.
घूस [ गुहाशया = घूस ] बिळांत राहणारी.
घृतकल्या मधुकल्या - हे शब्द छांदस आहेत. त्यांचीं मूळ रूपें घृतकुल्या मधुकुल्या. कुल्या नाम नदी. घृतकुल्या म्हणजे तुपाची नदी, सडकून तूप. मधुकुल्या म्हणजे मधूची नदी, पुष्कळ मधु. घृतस्य कुल्या. माध्यंदिनीय वाजसनेयसंहिता ६-१२ (भा. इ. १८३३)
घेइजे [ गृण्हीयाम् किंवा गृह्येयम् (कर्तरि किंवा कर्मणि विधिलिङ्) ] (शा. अ. ९ पृ. १ )
घओं ये, घेइजे, घेइज = घेववें = गृह्येत ( लिङ्चा इ मराठींत ये होतो व आज्ञार्थक घेओंच्या पुढें तो येतो. ह्याचा अर्थ असा कीं, वैदिक Injunctive ला इ हें शक्यार्थक क्रियापद जोडलें जातें. म्हणजे लिङ् हा injunctive + इ धातू यांचा जोड आहे.
घेघे, घेघे मारणें [ हन् हन् = घे घे मार ] to strike and beat vigorously and violently.
घेरा [ गृहीतक =घेरअ =घेरा ] घेरलेला भाग. (स.मं.)
घेरी १ [ ग्राहिः ] (धातुकोश - घेर ४ पहा)
-२ [ ग्लै = ग्रै = गेरे = घेरी-)
घेरी म्हणजे अत्यंत ग्लान होऊन जाणें. (गाळण पहा)