Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
घ
घई [ घाति = घाई = घै = घइ ] घाति म्हणजे पट. तिघई घर म्हणजे तिप्पट घर. पांचघई घर म्ह० पांचपट घर. ओसरी, माजघर, स्वयंपाकघर मिळून तीन घाति म्हणजे घई.
घंगाळ [गंगाधरं = घंघाळ] a bucket of गंगा water.
घघ (हसणें) [ घग्घ् = घघ्घ = घघ ] घघ हसतो. (भा. इ. १८३३)
घट्ट १ [ घट् to collect, to gather = घट्ट ]
-२ [ घृष्ट = घट्ट ] (भा. इ. १८३२)
घटमुट [ घृष्टसृष्ट=घटमुट ] मुलगी चांगली घटमुट आहे = कन्या चार्वंगी घृष्टा मृष्टा च । म्हणजे घासली पुसलेली आहे.
घंटा [ F घंटा pit with the thumb in the middle of the forefingers वैजयंती = घंटा masc. ] घंटा घ्या म्हणजे आघातक्रियादर्शक मूठ घ्या, असा अर्थ आहे.
घंटू, घंट्या [ घंटु: (हत्तीचें अवजड कर्णभूषण) = घंटू, घंट्या ] घ्या घंट्या, घंटू म्हणजे वागवावयाला अवजड अलंकार.
घठार [ घट + आगार = घठार ) a room where vessels of oil, ghee are kept.
उ० - तेथ उन्हाला आगि पुरा । तेलातूपाचेया घठारा ।
लागला आाणि वारा । सूटला जैसा ॥ ज्ञा. १६-३९३
घड १ [ घट् १० संघाते. घटा =घड, संघट्टि: = सांगड ] ( धा. सा. श. )
-२ [ घटा (झुंबका, जमाव) = घड ] अंब्यांचा घड म्हणजे जमाव.
घडघड १ [ गद्गद = घडघड ] गद्गदं वाचयति = घडघड वाचतो.
-२ [ घट् भाषायां ] ( घडाघडा १ पहा)
घडमाळ [ घटमाला = घडमाळ ]
घडवंची १ [ घाटमंचिका = घडवंची ] वर चढावयाचा माचा.
-२ [ घोटमंचिका = घोडवंचिआ = घडवंची ] घडवंची म्ह० मोठा थोरला माचा.
घडाघडा १ [घट् भाषायां = घडाघडा, घडघड ] घडघड म्हणजे स्पष्ट उच्चार करून एकसारखें बिनतूट बोलणें.
-२ [ घटघटं = घडाघडा ( वाचतो ) ]
घड़ीवँ [ घटेलिम = घडीवँ ]
घणघणित [ घन thick ] thick.
घणाघण [ हन् desid घनीघन् = घणाघण ] to beat intensely. घणाघण घाव मारतो.
घन [ गहन = घन ] एक घन रान होतें = आसीत् एकं गहनं अरण्यं.
घनदाट १ [ गहनदृढं = घनदाट ]
-२ [ घनंदृढं = घनदाट ]
घबघबित [ गह् ] (घवघवित पहा)
घबाड [ गर्भध = घबाड ] घबाड म्हणजे गर्भ धारण करण्याचा अवयव. (राधामाधवविलासचंपू पृ. १७२)