Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

घेरू [गृहधूम =घेरहूअँ =घेरूअँ = घेरू ] घेरोसा असा हि शब्द आहे.

घेलचोद्या १ [ ग्रहिलचोदक: =घेलचोद्या ]

-२ [ गृहयालुचोदक: =घेलचोद्या ] बळजबरीनें संभोग करणारा.

घेवड [ ग्रहपदं =घेवड ]

घो [ गुह् ( वस्त्रादिकांनीं आच्छादन करणें ) धातूपासून गोहः = गोहो (आच्छादन करणारा, संरक्षक, नवरा, पुरस्कर्ता) = घो = घोव] ( स. मं. )

घोगरा, घोघरा [ घर्घरः = घोगरा, घोघरा]

घोघाव, घोघो [ घुङ्] ( धातुकोश-घोघाव २ पहा)

घोटणें १ [घृष्= घोटणें ] उगाळून बारीक करणें. औषध घोटणें. (भा. इ. १८३६)

-२ [ घुष् (घुष्ट) = घोटणें (बोलणें ) ] तेंच तें घेटणें म्हणजे तें च तें मोठ्यानें प्रसिद्धपणें सांगत बसणें. (भा. इ. १८३६)

घोंट, घोंटु [ घुट:, घोट: (घुट् प्रतिघाते) ] (ज्ञा. अ. ९ पृ. ६९)

घोटा [ घुंटिः, घुटिः ] (खोट १ पहा)

घोंटा [ घोंटा (सुपारीचें झाड ) = घोंटा ] घोंटा ही एक प्रकारची उत्तम सुपारी आहे.

घोंटाळणें [ गुंठ = घोंट, घोंटाळणें, गुंठाळणें ] लपणें, आंत ओढणें. (भा. इ. १८३३)

घोटून (गाणें) [ घुष्ट = घुट्ट = घोट] घोटून म्ह० घोष करकरून. (भा. इ. १८३४)

घोडक्या [घोटकिकः = घोडक्या. घोटकेन चरति घोटकिकः । चरति ( ४-४-८ )] घोड्यानें प्रवास करणारा.

घोडया १ [ गौतम ] (गोड्या पहा)

-२ [ गवोद्ध = घोडा ] घोडा म्ह० उत्तम बैल. प्रमादी मुलांना बैला म्हणून म्हणण्याच्या ऐवजीं घोड्या म्हणून म्हणतात. अर्थ एकच.

घोण [ घुणः (कीटकविशेष ) = घोण ]

घोणा १ [ घ्राणं गंधवहा घोणा । राजनिघंटुः ॥ ( स्त्री. ) घोणा = घोणा (पु.) ] नाकाचा घोणा फुटणें म्हणजे नाकाच्या आंतील दांड्याजवळील शीर फुटणें. (भा. इ. १८३७)

-२ [ घोणा = घोणा ] (स. मं. )

घोर १ [ घोरः = घोर ] मरणाच्या वेळचा शब्द-नाम.

-२ [ घोर = घोर ( विशेषण ) ] घोर ताप, संकट.

-३ [ घोरः = घोर ] घोरः म्हणजे भय.

-४ [ घुर् भीमार्थशब्दयोः ] ( घोरणें पहा)

घोरणें [ घुर भीमार्थशब्दयोः = घोरणें, घोर, अघोर ] (ग्रंथमाला)

घोरांदर [ घोरंदरं (च) = घोरांदर]

घोव [ गुह् - गोहः ] ( घो पहा )

घोसबाळी [ गुत्सवलयिका = घोसबाळी ] एक कानांतला दागिना.

घोसाळी [ घोषवल्ली = घोसाळी ] वनस्पतिविशेष, घोसाळीचा वेल.

घोळ १ [गुहिल ( अरण्य) = घोळ, घळ ] अरण्यांतील गुहा किंवा गृहाकृति रान.

-२ [ गुढा = गोळ्हा = घोळ. ढ = ळ्ह. ] Vegetable.

-३ [ गव्हरी = घवली = घोळ, घळ ]

घ्या [द्य (प्रातिलोम्ये निपातः ) = घ्य = घ्या ] (भा. इ. १८३४)