Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
घाटी [ घाटा = घाटी (घाटिका) ] मानेचा बट्टू.
घाण १ [ सिंघाणक स्तु नासोत्थः ॥ ] सिंघाणक = घाण. नाकांतली घाण म्हणजे सिंघाणक ऊर्फ शेंबूड. मुलाचें नाक पुसतांना घाण पुसली म्हणून शब्द योजतात. तेथें घाण हा शब्द सिंघाणक शब्दाचा अपभ्रंश होय. (भा. इ. १८३४)
-२ [ घ्राण = घाण ] घ्रा म्हणजे वास घेणें (नाम) घ्राण म्हणजे वास घेणें. घाण या शब्दाचा धात्वर्थ वास, मराठींत वाईट वास या अर्थी रूढ. (भा. इ. १८३६)
-३ [ हानिः = घाण. ह = घ ] संसाराची सगळी घाण करून टाकली = संसारस्य सकला हानिः कृता.
० घाण्या [ हानकः, घ्नः = घाणा, घाण्या. हन् २ घाते ]
स्त्रीघ्नः = स्त्रीघाण्या, महिलाघ्नः = बाइलघाण्या
मनुष्यघ्नः = माणूसघाण्या.
घातलें [ ग्रह् ] ( धातुकोश-घाल ७ पहा)
घाबरा [ ग्रहव्यग्रः = घाबिरा = घाबरा ] घाबरा म्हणजे ग्रहानें व्यग्र झालेला. ग्रह म्हणजे राहू इत्यादि दुष्ट ग्रह.
घाम्या [गेहेमेहिन् (घरांत मुतणारा ) - घाम्या ]
घायकूत १ [ घातिकुथ्] ( घायकूथ पहा)
-२ [ घातिकूर्दा = घाइकूद = घाइकूत, घायकूत ] घाति (killing) + कूर्द to play = जीवघेण्या खेळ, प्राणघेण्या हट्ट, कृति इ. इ.
घायकूथ [ घातिकुथ् = घायकृथ-त ] घाति म्हणजे घाई व कुथ् म्हणजे दु:ख देणें.
घायकूत म्हणजे अतिशय दुःख देणें, पीडा करणें.
घायकूद [ घातिकूर्दा ] (घायकूत २ पहा)
घायताव [ घातिताप ] ( घाइ पहा )
घायपात [ कक्खटपत्रक = खाअपात = घायपात ]
ह्याच्या दोर्या करितात.
घारगा [ घार्तिक: ( भोकें पाडलेलें एक खाद्य, पक्वान्न ) = घारिगा = घारगा (पंचतंत्र) ] एक खाद्य आहे. ( भा. इ. १८३६ )
घारवड [ गारुत्मतं = घारवड ] घारवड म्हणजे घारींचा कळप.
घारूड [ गारुतं = घारूड ] घारूड म्ह० घारींचा जमाव.
घालून पाडून (बोलणें) [ गल्हित्वा (गल्ह्, गर्ह् to censure ) = घालून. प्रत्यह्य (प्रति + अह् to reply ) = पाडून. ] पाडून म्हणजे उलट उलट बोलून. अह् हा पूर्ववैदिक धातू आत्थ, आहु: इत्यादि रूपांत दिसतो.