Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
गोरालख्ख [ गौर: अवलक्षः = गोरालख्ख. अवलक्ष =( अव लोप) = लख्ख ] (भा. इ. १८३४)
गोरी - पी हळद आणि हो गोरी, या वाक्यांत गोरी ह्या शब्दाचा अर्थ पिवळी असा आहे.
पीतो गौरो हरिद्राभः (अमर) गौर = गोर ( रा-री-रें) ( भा. इ. १८३४)
गोर्हा [ गौः + उह्रः = गोर्हा ] गौः म्हणजे बैल व उह्रः म्हणजे बैल. गोर्हा म्ह० तरुण बैल.
गोवई [ गोपति = गोवई, गवई ] गवई गो ( असें एक गाणें आहे).
गोवण [ गोपनी = गोवण ]
गोवरी [ गोपुरीषं = गोउरी = गोवरी ]
गोष्ट [ गोष्टी (संस्कृत ) = गोष्ट ] गोष्टी या संस्कृत शब्दांत धातु गोष्ठ्. गोष्ठ् म्हणजे बोलणें. आवेस्ती, झंद, फारसी वगैरे भाषांत गोफ्तन् ह्या धातूचा अर्थ बोलणें असा आहे. (सं.) ष्ठ = (फा.) फ्त. संस्कृतांत गौः म्हणजे वाणी, भाषा. ( भा. इ. १८३३)
गोष्ठी करणें [ गोष्ठीं करोति ( पंचतंत्र ) ]
गोहो - ना पुमान् पुरुषो गोधो धवःस्यात् ॥ २८ ॥ धनंजय केश- (भा. इ. १८३३ )
गोळा १ [ गुल्म = गोळा ] त्याला गोळा आला म्हणजे गुल्म झालें.
-२ [ गुल्मस्तु जाठरो ग्रन्थिः ॥ (केयदेव-पथ्यापथ्य विचार)
पोटांत गोळा झाला आहे म्हणजे गुल्म झाला आहे.
गुल्मः = गुल्ला = गोळा ] (भा. इ. १८३४)
गोळी [ गुटी = गुली = गुळी ] (ग्रंथमाला)
ग्रंथ [ ग्रंथ् १ कौटिल्ये ] वांकडा तिकडा सांचलेला पुंजका. हा ग्रंथ कसा उकलायचा.