Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
गुडगुड [ गुडगुडायनं = गुडगुड ( घरघर) ] पोटांत गुडगुडतें म्हणजे गुडगुड आवाज होतो.
गुडगुडी [गुडगुडिका = गुडगुडी ] गुडगुड आवाज ज्या नळींतून येतो तो.
गुडदाणी [गुडधाना (गुडमिश्राः धानाः ) = गुडधाणी = गुडदाणी ] एका प्रकारचा गूळ व दाणे यांचा मेवा. (भा. इ. १८३३)
गुडदी [ गुडधिः = गुडदी. गुड रक्षायां + धि ] भांड्याचें तोंड रक्षण करणारें धि म्हणजे झांकण.
गुंडा १ [गुंडः ] ( धातुकोश-गुंड २ पहा )
-२ [गुंडकः = गुंडा (पात्रविशेष), गुंडी ]
गुडाकू-खू [ गुडाका (निद्रा, तंद्रा) = गुडाकू - खू. ] गुडाकू म्हणजे निद्रा, तंद्रा आणणारा एक धूम्रपानाचा पदार्थ.
गुंडाळलें [गुंड (गुंडयति) आच्छादने, वेष्टने ] माथें वस्त्रानें गुंडाळतो = वस्त्रेण मस्तकं गुंडयति. ( भा. इ. १८३३)
गुंडाळा [ गुंड: ] ( धातुकोश-गुंड २ पहा)
गुडी [गुरिका = गुडी, गुढी. गुर ६ उद्यमने ]
गुंडी १ [गुंडिका ] ( धातुकोश-गुंड २ पहा)
-२ [ कुंडिका (कमंडलू, घागर) = गुंडी ]
गुढघा [ टघु + घा = ढोंपराचा संधि ] (स. मं.)
गुढी १ [गुरिका ] (गुडी पहा)
-२ [ घृष्टिः = गुढी ] गुढी पाडवा म्हणजे ती प्रतिपदा ज्या प्रतिपदेस वराहध्वज उभारतात. घृष्टि = वराह. घृष्टिध्वज म्हणजे वराहाचें लांछन ज्या ध्वजावर आहे तो. तदनंतर घृष्टिध्वजाबद्दल नुसता घृष्टि शब्द ध्वजार्थी लावूं लागले. ( ज्ञा. अ. ९ पृ. १७७ )
गुणाचा (गुण्यः = गुणिज्जा = गुणाचा ]
प्रशस्ताः गुणाः यस्य गुण्यः ।
गुणाचा मुलगा म्हणजे प्रशस्त गुण आहेत असा मुलगा.
गुंतलेलें [ गुंथ ११ गुंथने. गुंथित = गुप्तलेलें ] ( धा. सा. श.)
गुंतवळ १ [ कुंतलावलि = गुंतवळ ]
-२ [ कुंतलवलयं = गुंतअवळअ = गुंतवळ ] भातांत गुंतवळ सांपडला म्हणजे केस सांपडला.
-३ [ कुंतल ] (गुंतळ पहा)
गुंतळ [कुंतल = गुंतळ, गुंतोळ, गुंतवळ ] भातांत गुंतवळ सांपडला.