Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

वारा [ वातर: = वाअरा = वारा ] (ज्ञा. अ. ९ पृ.१९)

वारी १ [ वृ १० आवरणे. वारि = वारी ] खाण्यावारी = खादनवारि (खादनं वृणोति वारयति आच्छादयति एवं प्रकारेण). अर्जुनवारि पौरुषं ( नलचंपूः चतुर्थ उच्छ्वासः १८ श्लोक) ( धा. सा. श. )

-२ [ वरि:-री (प्रवाश्यांची टोळी) = वारी ] पंढरीची वारी म्हणजे पंढरीला जाणार्‍या प्रवाशांची टोळी.
वारकरी म्हणजे वारीला जाणारा प्रवाशी.

वारून - मी त्याला वारून आलों = मी त्याचा त्या कामापासून निषेध करून आलों.
वारयित्वा = वारून = बजावून, निषेधून.
निवारयित्वा = निवारून. (ग्रंथमाला)

वारूळ १ [ वामलूर = वाँरूळ = वारूळ. र च्या स्थलीं ळ आणि ळ च्या स्थलीं र, असा वर्णविपर्यय झाला आहे.] (भा. इ. १८३२ )

-२ [ श्लीपदं पादवल्मीकं ॥ वल्मीक = वारूळ ] (भा. इ. १८३४)

-३ [ वल्मीकूट ant-hill = ववींऊड = वारूळ. ल = र. ट = ड = ल = ळ ]

-४ [ वल्मीगृहं = वाळूर = वारूळ ] ant-hill.

-५ [ वामलूर = वावरूळ = वारूळ ]

वालभ [ पारिरंभ्यं ]

वाली [ व्री to support : व्रायः = वाली ] supporter. माझा वाली कोण ? who is my supporter ?

वाव १ [ व्यामः = वाव ( करसहितयो वाव्होरन्तरं) व्या + मा ३ माने ] (धातुकोश-वाव पहा)

-२ [ व्योम = वोवं = वाव ] (स. मं.)

-३ [ व्यापः = वाव (व्याप्ति, सवड). व्यामः = वाव ]

वांव १ [ व्यामः ] (वाव ३ पहा)

-२ [ व्याम (चार हात प्रमाण अंतर) = वांव] (भा. इ. १८३६)

वावडी १ [ व्यावृत्ति exclusion = वावडी ] वावडी होईल म्हणजे exclusion shall result.

-२ [ वाताटी = वावाडी = वावडी ] पतंग.