Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

वायिल [ व्यवहित + ल ] (वयििल पहा)

वार १ [ व्री to choose = व्रायः choice = वार ] a selection to a dinner given to a begger student.

-२ [ वारक = वार] वारक म्हणजे प्रतिदिवशींचें देणें, जेवण वगैरे. वाराने जेवणें म्हणजे प्रतिदिवशीं नेमलेल्या घरी जाऊन जेवणें.

-३ - पुणें, सातारा, सोलापूर वगैरे महाराष्ट्रांतल्या शहरांत कित्येक पेठांना रविवार, आदितवार, सोमवार, शनवार अशीं नांवें आहेत. हीं नांवें दिवस या अर्थी जो वार शब्द आहे त्यावरून पडलीं, अशी कित्येकांची समजूत आहे. आठवड्याच्या सात नांवांवरून पेठांचीं नांवें पडलीं म्हणावें, तर कित्येक शहरांत एकदोन दिवसांच्याच नांवानें पेठा आहेत. एकदोन पेठाच त्या शहरांत असतील म्हणून एकदोन दिवसांचीं नांवें पडलीं म्हणावें, तर सातांहूनही अधिक पेठा त्या शहरांत असलेल्या आढळतात. गांव किंवा शहर प्रथम वसलें त्या वेळीं फक्त एकदोन पेठा होत्या व तेवढ्यांना एकदोन दिवसांचीं नांवें दिलीं, असा एक पक्ष आणतां येण्याजोगा आहे. पण दिवसांचींच नांवें पेठांना कां दिलीं, ही शंका राहतेच. ह्या शंकेचें निराकरण करावयाला वार या शब्दाची प्राचीन परंपरा पाहिली पाहिजे. Epigraphica Indica च्या पहिल्या खंडांत सीयडोणी शिलालेख डा. कीलहार्नानीं छापला आहे, त्यांत वार हा शब्द खालील स्थलीं येतो:-

पंक्ति
२ द्वाविंसतिकच्छितराकयोर्व्वारे वारप्रमुख
४ वारस्वहस्ताय
७ वहुलूरुद्रगणयोर्व्वारे वारप्रमुखस्थानेन
१० वारप्रमुखस्थानसंवद्धकन्दुकानां
११ सीयडोण्यां वारप्रमुखस्थाने आइवुआनरसिंघयेर्व्वारे
१९ अ (इ) वुआनरासिंघयोर्व्वारे
२३ वारपपद्मयोर्व्वारे
२९ पाहूदेदेकयोर्व्वारे
३० तुण्डिप्रद्युम्नयोर्व्वारे
३६ पाहूदेदेकयोर्व्वारे

Epigraphica Indica च्या पहिल्या खंडांत डा. हुल्झ यांनीं ग्वालेर येथील वैल्लभभट्ट स्वामीच्या देवळांतील दोन शिलालेख छापले आहेत. पैकीं दुसर्‍या शिलालेखांत हा शब्द असा येतो :-
२।३ सार्थवाहप्रमुख सवियाकानां वारे