Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

राहुटी [ रथ्याकुटी = राहउटी = राहुटी ] राहुटी म्हणजे प्रवासांतील पटकुटी म्हणजे तंबू.

राळ १ [राला = राळ ]

-२ [ राद्धि from राध् to kill, exterminate राद्धि = राढि = राळि = राळ ] राळ करणें, उडवून देणें to exterminate.

रिठा १ [ रिष्टः = रिठा ]

-२ [ अरिष्टक = रिठा ( अलोप ) ] (भा. इ. १८३४)

रिणकरी [ऋणकारी = रिणकरी ]

रिणको [ ऋणकामः ] (धनको पहा )

रितें [ रिक्त = रित्त = रित = रितँ = रितें-ता-ती ] (ग्रंथमाला)

रिप् रिप् १ [ रिफ् to utter a grating sound = रिपरिप पाऊस पडतो ]

-२ [ रिप् to revile ] आतां रिपरिप् पुरे.

री १ [ री to howl ] री ओढणें to howl after any one.

-२ [ री (वृकशब्दः ) = री ] री म्हणजे कोल्ह्याचा शब्द. री ओढणें म्हणजे एक कोल्हें ओरडलें म्हणजे बाकीचीं जशीं ओरडतात तसें करणें.

री ओढणें [ री ९ गतौ. री (शब्द करणें) = री ओढणें] ( धा. सा. श. )

री री करणें [ री to howl ] 

री री करीत जाणें [ रि to go ]

रीस १ [ ऋक्ष = रीस ] अस्वल.

-२ [ ऋषभ = रिसह = रीस ] मराठींत अडाणी बेडौल माणसास रीस म्हणतात.
मूळ ऋषभ हा शब्द संस्कृतांत पुरुष-ऋषभ वगैरे सामासिक शब्दांत श्रेष्ठत्व दाखवितो. विपरीत लक्षणेनें मराठींत रीस कनिष्ठत्व, अधमत्व दर्शवितो. (भा. इ. १८३६)

रुई १ [ ऋतिः (मार्ग, रस्ता ) = रुइ = रुई ] ही बोलण्याची रुई नव्हे म्हणजे मार्ग नव्हे.

-२ [ रोहित् ( मृगविशेषः ) ( हसृरुहियुषिभ्य इतिः उणादि १०२ ) रोहित् = रोहिअ = रोही = रुई ] हरिण एक प्रकारचे. ( भा. इ. १८३३)