Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
राजी-होणें [ राध् राध्यति = राजी होणें ] to be affectionate towards. कृष्णाय राध्यति = कृष्णाला राजी होते.
राजे लोक [ राजलोकाः = राजे लोक ] राजांचें मंडळ. (भा. इ. १८३६)
राड [ द्राङ् तुकडे तुकडे करणें. द्राङ् = राड ] (भा. इं. १८३४)
रांडरुं [ रंडातरी = रांडरी, (प्रेमदर्शक ) रांडरूं ]
राडा [ ह्रदः = राडा ] रक्ताचा, शेणाचा, चिखलाचा राडा.
राणा [ राजन्यः = राअणा = राणा ]
राणीवसा [ राज्ञ्यावासः = राणीवसा ]
रातवा [ रात्रिपातः = रातवा ] रातवा म्हणजे रात्रीचा सर्व समय.
रात्रों औषींस, औषीं [ रात्रौ दोषसि = औषीं (द = अ ) ] (भा. इ. १८३३)
राप [ राद्धि] (राब पहा)
राब [राद्धि = राब्भी = राबी = राब = राप ] गुळाची राब म्हणजे शिजवून दाट केलेला रस.
रामरगडा [ रामह्रद: ] (रामराडा पहा)
रामराडा [ रामह्रद: = रामराडा. रामह्रदः = रामरहंडा = रामरघडा = रामरगडा ] रामह्रद म्हणजे परशुरामानें मारिलेल्या क्षत्रियांच्या रक्ताचा ह्रद म्हणजे हौद. त्यावरून कोणताहि वीभत्स पातळ पदार्थाचा सांठा.
रायभोगा [ राजभोगीनः ( तंडुलः ) ५-१-९ पाणिनि = रायभोग ( तांदूळ ) ] राज्ञे हिताः तंडुलाः राजभोगीनाः तंडुलाः
रायवळ [ राजपालित=रायवळ ] राजाचीं रानांतील लांकडें. रायावळा [ राजामलक: = रायावळा ]
रास [ रासः (गौळ्यांचें नृत्य) = रास ]
राहराहून [ रह् १ त्यागे ] ( धातुकोश-राह ५ पहा)
राहाटी [ राद्धि: ] ( धातुकोश-रहाळ पहा)
राहिलेपण [ रु to sound, hum णिच् रावय् निष्ठा रावित. रावित + ल = राइअल = राहिल. रावितत्वन (Vaidik ) = राहिलपण = राहिलेपण humming ]
सरलेयां गीता चा समारंभु । न वचे राहिलेपणा चा सोभु ( ज्ञानेश्वरी १८-४२१ )
राहिलेपण म्हणजे नादत्व, अनुरणन । गाणें संपलें तरी त्याचें अनुरणन मागें कांहीं काळ रहातें तसें.