Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

रेटा [ रीढा (अपमान) = रेटा, ( रेटणें म्हणजे अवमानानें पलीकडे लोटणें ) ]

रेड [रेडा, रेडी, रेडें, रेडकू, रेडकी ) रिष्यते इति रेट् । रिषति हिंसार्थः । यज्ञकर्मणि या रिष्यते सा रेट्. ज्या म्हसराला यज्ञकर्मात मारतात तें रेट्, रेड्, रेट् = रेड् = रेड (डा-डी-डें) रेडसि ६-१८ माध्यंदिनीय वाजसनेयसंहिता. ] ( भा. इ. १८३३)

रेती [रांति ( कीट, गंज) = रेती (कीटासारखी अती बारीक वाळू) किंवा रेता =रेती]

रेफ [ रिफ = कर्कश नाद करणें. (नाम) रेफ = कर्कश नाद = र (उच्चार) ] ! अलीफ = अलेफ = अरेफ = अ हा कर्कश नाद करणें. आसुरभाषांत अ चा उच्चार कंठांतून कपतात, तेव्हां अलेफ शब्द संस्कृत अरेफ ह्या शब्दाचा आसुर अपभ्रंश आहे. (भा. इ. १८३२)

रेरे [ रय् to go ] रेरे चालला आहे.

रेलणें [ लैण् श्लेषणे. लैणन =रेलणें. ल = र; ण = ल ] (धा. सा. श. )

रेव [ रेता = रेव (स्त्री) ]

रेवड [ रयपथः =रेवड ] नदीची रेवड म्हणजे वाळूची वाट.

रेवन्त - रेवन्त देवाचा उल्लेख वराहमिहिर-बृहत्संहिता अध्याय ५८ श्लोक ५६ व विष्णु पुराण ३ (२, ६, ७ श्लोक) येथें आहे. ही देवता घोड्यावर बसून मृगया करीत असलेली कोरीत किंवा घडवीत. हिच्या प्रतिमा महाराष्ट्रांत खेडोखेडीं सांपडतात. कलकत्त्याच्या Indian Museum मध्यें ह्या देवाची एक मृगयाक्रीड मूर्ति आहे. रेवन्त हा शब्द रैमत् = रेमन्तः (अनेकवचन) ह्या संस्कृत शब्दाचा महाराष्ट्री अपभ्रंश आहे. रैमत् म्हणजे श्रीमन्त, लक्ष्मीवान्; 'रेवन्त' ? ह्या प्राकृत रूपानें ज्या अर्थी हा शब्द बृहत्संहितेंत व विष्णुपुराणांत येतो, त्या अर्थी हे दोन्ही ग्रंथ प्राकृत-महाराष्ट्री प्रचलित झाल्यावर बर्‍याच किंवा कांहीं कालानें झाले असले पाहिजेत. बृहत्संहितचा काल प्रसिद्ध आहे. तोच विष्णुपुराणाचा काल असावा; कारण विष्णुपुराणांत गुप्तांचा उल्लेख आहे. (भा. इ. १८३२)

रोक [ लोक् ]

रोख १ [ रोषः = रोख (क्रोधस्थान ) ] आमच्यावर रोख कां? त्याचा रोख माझ्यावर आहे = तस्य रोषः ममोपरि.

-२ [ रोकः (रोखीची खरेदी) = रोख ]

-३ [ अपरोक्ष = रोख (अ आणि प यांचा लोप) ]
अपरोक्ष निंदा म्हणजे रोख निंदा. (भा. इ. १८३४)

-४ [ रोक (प्रत्यक्ष खरेदी ) = रोख ]