Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
परत उत्तर [ प्रत्युत्तर = परत उत्तर ] ( भा. इ. १८३४)
परत जाणें [ प्रतियानं = परत जाणें ] (भा. इ. १८३४)
परतणें १ [ प्रति + ई = परत+णें = परतणें (अकर्मक)] परतणें म्हणजे उलट निघून जाणें. तो परतला म्हणजे उलट फिरला. (भा. इ. १८३५)
-२ [ प्रति + आयय् = परतणें (सकर्मक ) ] परतणें म्हणजे उलट फिरविणें. भाकरीं परतणें, भाजी परतणें म्हणजे भाकरी किंवा भाजी तव्यावर उलटसुलट फिरावणें. ( भा. इ. १८३५ )
-३ [ प्रत्त = परत ( परतणें ) ] परतणें म्हणजे परत देणें. ही वस्तू परतून ये. ( भा. इ. १८३६ )
-४ [ प्रती (प्रति + इ) = परतणें ] परतणें म्हणजे उलट येणें. तो परतला म्हणजे उलट आला. ( भा. इ. १८३६)
-५ [ प्रत्ययनं = परतअण = परतणें ] (भा. इ. १८३४)
-६ [ वृत १. परावृत्तं = परातलें, परतलें. परातणें (अशिष्ट) ] ( धा. सा. श. )
-७ [ अय् १ गतौ. प्रति + अय् (प्रत्ययते) प्रत्ययते = परततो ] ( धा. सा. श. )
परत भेट [ प्रत्यभ्यटनं = परत भेट ] (भा. इ. १८३४ )
परता [ प्रताम् (ग्लानौ निपातः ) = परता ] (भा. इ. १८३४)
परभारा १ [ भृ १ भरणें. परं विभर्ति इति परंभर: तस्य भावः पारंभर्य - पारंभर्येण = परभारा ] परभारा म्हणजे दुसर्याकडून, परस्पर. ( धा. सा. श. )
-२ [ ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायांत परवाहिर शब्द आला आहे. तो परवहि: ह्या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. परवहि: = परवहिर = परवाहिर = परभारा ] (स. मं.)
परभारें [ परिवर्हेण = परिभारें = परभारें ] परिबर्ह म्हणजे परिवार, सेवकजन. परभारें काम होईल म्हणजे खुद्द मालकाकडून नव्हे, तर सेवकजनाकडून काम होईल म्हणजे परस्पर इतरांकडून काम होईल.