Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
पवाडा १ [ अपवादः = (अ लोप) पवाडा ] पवाडा म्ह० निंदा. अपवाद म्हणजे निंदा.
ज्ञानेश्वरीत निंदार्थक पवाडा शब्द येतो. अनिंदार्थक पवाडा शब्द प्रवाद ह्या शब्दापासून निघाला आहे. ( भा. इ. १८३७)
-२ [प्रवादः = पवाडा] कीर्ति, प्रसिद्धि. (भा. इ. १८३६)
पवारी [प्रवालवल्ली (विद्रुमलता) = पवारी ] एक सुगंधि द्रव्य.
पसरणी १ [ प्रसारिणी = पसरणी ] वनस्पतिविशेष. (भा. इ. १८३४)
-२ [स्त्रु १ गतौ. प्रास्रवणिका = पसरणी ] (धा. सा. श.)
पसरणें १ [ अपसरणें = (अ लोप) पसरणें (अकर्मक)] लोक पसरले म्हणजे जनाः अप्पासरन् परंतु लोकांनीं पाय पसरले = जनाः पादान् प्रासरन्, (भा. इ. १८३७)
-२ [ प्रसरण = पसरणें ] अंथरूण पसरणें = आस्तरणप्रसरणं. (भा. इ. १८३५ )
पसा [प्रसरक = पसअअ = पसा ] (स. मं.)
पसार १ [ अपसारः ] ( धातुकोश-पसार १ पहा)
-२ [ सृ १ सरणे. अपसारः = पसार. प्रसारः = पसारा. सरसरं = सरसर = सरसरा = सरासरा ] ( धा. सा. श.)
पसार होणें [ अपसारं भू = पसार होणें ] पसार होणें म्हणजे निघून जाणें. ( भा. इ. १८३५ )
पसारा [ प्रसारः = पसारा ]
पसीना [ प्रस्विन्नः = पसीना ] पसीना म्ह० घाम.
पहचणें [ प्रस्थानं = पहचणं = पहचणें = पोहोचणें ] ग्रामंप्रति प्रस्थाति = गावातें पोहोचतो. (भा. इ. १८३४ )
पहणें, पाहणें, बघणें - दृश् असा एक धातु संस्कृतांत आहे. त्याची कांहीं रूपें पशू, पश्य ह्या लुप्त धातूपासून होतात. हा पश् धातु स्पश् to spy ह्याचेंच एक रूप आहे. पश् म्हणजे पाहाणें. श् चा ह् होऊन, पश् चें पह् बनलें. पचा ब व हचा घ होऊन, बघ् बनले. पह व बघ अशीं हीं दोन्ही रूपें पश् धातूपासून निघालीं आहेत. पह् पासून पाहणें असें अनिश्चितार्थी रूप जुन्या मराठींत करीत. पहचें पाह हें प्रयोजक रूप आहे. ह्या प्रयोजक रूपापासून पाहिजे हें रूप निघालें आहे. मी ती वस्तु पाहतों म्हणजे बघतों. मला ती वस्तु पाहिजे, म्हणजे मला ती वस्तु दाखवावी, दाखविली जावी. पाहिजे हें रूप पह् ह्या धातूचें causal Passive आहे. पह रूप अडाणी लोक योजतात व तें बघ इतकेंच शुद्ध आहे. (स. मं.)